Home Search
आषाढ - search results
If you're not happy with the results, please do another search
मेघदूत: आषाढस्य प्रथम दिवसे… (Meghdut- First day of the month of Ashadh)
आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाला सुजाण भारतीयांच्या मनात एक विशेष स्थान आहे. आश्चर्य म्हणजे हे स्थान कोणत्या एखाद्या सणामुळे किंवा घटनेमुळे नाही तर एका खंडकाव्यातील ओळीमुळे आहे. कविकुलगुरू कालिदास यांच्या ‘मेघदूत’ या खंडकाव्याच्या दुसऱ्या श्लोकात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा शब्दसमूह येतो. ‘मेघदूत’ या काव्याने अनेकांना भुरळ घातली आहे. बहुतेक सर्व भारतीय भाषांमध्ये आणि इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या युरोपिय भाषांमध्ये त्याची भाषांतरे झाली आहेत. मराठीतच किमान सहा भाषांतरे उपलब्ध आहेत. अशा या अद्वितीय खंडकाव्याचा परिचय गीता जोशी रसिकतेने आणि मर्मग्राही दृष्टीने करून देत आहेत...
निफाडचा तांब्याचा मारोती ! (My fascination with deity Maruti… and it’s copper idol)
आमच्या निफाडच्या अकोलखास गल्लीतील मारुती मंदिर माझ्या मनात गच्च रुतून बसलेले आहे. ते मंदिर म्हणजे गल्लीच्या मधोमध दुमजली माडी असलेली पवित्र वास्तू. दगडी जोत्यांवर आणि लाकडी खांबांवर वीटबांधकाम केलेली. मला ते मंदिर चांगले मोठे वाटायचे. मारुती मंदिरात दर्शनासाठी वगैरे भल्या पहाटेपासून लगबग सुरू होई. मंदिर तसे चोवीस तास उघडेच असे. आम्हा मुलांच्या शाळा-कॉलेजच्या परीक्षा असल्या की मुलांचे मंदिरात येणे हे व्हायचेच. “देवा, मला पास कर, चांगले मार्क्स मिळू देत” म्हणून मनोभावे पाया पडणारी मुले हमखास दिसत असत किंवा कोणाशी छोटेमोठे भांडणतंडण झाले किंवा एखादी खुन्नस झाली तर, आम्ही ‘जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली !’ असे काही तरी द्वाडपणे म्हणायचो. आम्ही मारुतीदेवावर कोठलाही भार टाकून निर्धास्त होत असू...
संतनगरी आकोट (Akot- City of Saints from Vidarbha)
आकोट हे गाव विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. ते संतनगरी म्हणूनच ओळखले जाते. तेथे श्री नरसिंग महाराज यांचे वास्तव्य होते. ते शेगावचे गजानन महाराज यांचे समकालीन संत व गुरुबंधू होते. त्या दोघांमध्ये स्नेहबंध घट्ट होता. गजानन महाराज नरसिंग महाराजांना भेटण्यास आकोट येथील त्यांच्या ‘झोपडी’त येत असत; त्या दोघांच्या आध्यात्मिक चर्चा चालत असत. त्या संबंधात विविध दंतकथा आहेत. गजानन महाराजांनी मनकर्णिका व दुसरी अकोलखेडची विहीर, या दोन विहिरींना पाणी आणून आकोट परिसरात सुबत्ता निर्माण केली अशीही कहाणी आहे...
आंबोळगड – प्रतिगोवा !
आंबोळगड हे आमचे गाव कोकणाच्या राजापूर तालुक्यात रत्नागिरीपासून पन्नास किलोमीटर आणि राजापूरपासून बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. ते तीन बाजूंनी समुद्राच्या कुशीत वसले आहे. एकीकडे डोंगरकड्याशी कठोर झुंजणाऱ्या सागरलाटा आणि दुसरीकडे वाळूशी पदन्यास करणाऱ्या सागरलाटा… दोन्ही विभ्रम एकाच ठिकाणाहून दिसतात. निसर्गराजाची अशी नानाविध रूपे तासन् तास न्याहाळत बसावे, असे आहे हे आंबोळगड गाव. गावाचे क्षेत्रफळ दोनशे एकर आहे. गावात शिवकालीन इतिहासाची शौर्य परंपरा, गौरवशाली संस्कृती यांची यशोगाथा सांगणारा पुरातन किल्ला आहे. किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर व तोफा आहेत. तटबंदी छोटी असली तरी मजबूत आहे. त्या किल्ल्यामुळेच गावाला आंबोळगड असे नाव पडले...
तिरुपतीचे बालाजी कुऱ्हा येथील बाळासाहेब (Tirupati Balaji’s temple in Kurha, Maharashtra)
कुऱ्हा हे गाव अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यात आहे. तेथे लोकवस्ती पंधरा हजार आहे. कम्युनिस्टांचा बालेकिल्ला म्हणून गावाची ओळख. परंतु तेथेच तिरुपती व्यंकटेश दोन ठिकाणी सुमारे साडेतीनशे वर्षांपासून विराजमान आहे ! त्या दोन ठिकाणच्या देवांना लहान बाळासाहेब व मोठे बाळासाहेब या नावांनी ओळखले जाते; इतकी ती देवता गावाशी एकरूप होऊन गेली आहे...
रुक्ष, ओसाड बरड : पालखीचा तेवढा विसावा ! (Barren Barad)
माणूस ज्या भूमीत, ज्या गावात-खेड्यात जन्मला त्या भूमीचा एकेक कण त्याला काशी, गया, मथुरा ह्यासम पवित्र-पावन असतो. तेथील काटेरी बोरीबाभळींना त्याच्या हृदयी पाईन-देवदारपेक्षाही वीतभर जास्तच उंची लाभलेली असते ! गाववेशीवरील म्हसोबा, वेताळ अन बिरोबा ही तर त्याची खरीखुरी ज्योतिर्लिंगे असतात ! बरड हे माझे गाव माझ्यासाठी प्रेमाचे तशा प्रकारे आहे. अन्यथा बरड गाव नावाप्रमाणे वैराण, उजाड आहे. ते सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडे आहे. ते गाव पुणे-पंढरपूर ह्या राज्य महामार्गावर फलटणपासून पूर्वेस अठरा किलोमीटर अंतरावर आहे...
फलटणचे हरिबुवा समाधी मंदिर (Haribuva Samadhi Mandir at Phaltan)
फलटणच्या भूमीतील अनेक सत्पुरूषांपैकी सद्गुरू हरिबुवा यांचे स्थान वेगळे आहे. ते फलटणमधील लोकांच्या उद्धारासाठी प्रकट झाले अशी लोकभावना आहे. लोक त्यांना ईश्वरी अवतारच मानतात. हरिबुवा यांची मूळ समाधी जेथे बांधण्यात आली आहे तेथील समाधीचा आतील गाभारा स्वच्छ आहे. महाराजांची समाधी त्या मधोमध आहे. त्यांच्या दोन पादुका त्यावर कोरलेल्या आहेत...
अधिक व निज श्रावण मास !
अधिकमास कसा आणि का येतो? हिंदू पंचांग गणना चांद्र महिन्यानुसार होते. चांद्र महिना एकोणतीस दिवसांचा असतो. इंग्रजी कॅलेंडर आणि भारतीय ऋतुचक्र हे मात्र सौर महिन्याशी जोडलेले आहे. सौर महिना तीस/एकतीस दिवसांचा असतो. यामुळे प्रतिवर्षी चांद्र आणि सौर या दोन पद्धतींमधील वर्षाच्या एकूण दिवसांमध्ये तेरा ते चौदा दिवसांचा फरक पडतो. तो फरक भरून काढण्यासाठी हिंदू पंचांगामध्ये दर तीन वर्षांनी अधिकमासाची योजना करण्यात आली आहे...
हर्णे – मानव आणि निसर्ग एकरूप
हर्णे म्हटले, की निळाशार समुद्रकिनारा, नाठाळ वारा, सागरी लाटांची गाज आणि दूरवर गेलेली गलबते ! हर्णे म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी माडा-पोफळींची झाडे, चौपाटीवर साठलेल्या माशांच्या राशी आणि त्यांची उस्तवार सांभाळणारे मच्छिमार बांधव व कोळणी ! ‘हर्णे’ रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील एक गाव. त्याचे रूप आणि थाट तालुक्यासारखेच; तरी डोंगरावरील दापोलीच्या कोर्टकचेऱ्यांच्या अधीन असणारे...
संभव फाऊंडेशन : मनोयात्रींना मानवी प्रवाहात आणणारा अवलिया
वाढलेले केस, अंगावर जखमा आणि नग्नावस्थेत; रस्त्याच्या कडेला फुटपाथवर, एखाद्या उकिरड्याच्या बाजूला; एस टी स्थानक किंवा रेल्वे-स्टेशनवर असलेल्या मनोरुग्णांकडे नुसते पाहणेही त्रासदायक होते. मात्र, सोलापूरचे अतिश आणि त्यांची पत्नी राणी या दांपत्याने अशा लोकांना दिलासा देत मुख्य प्रवाहात आणण्याचे काम 2016 साली सुरू केले...