Home Authors Posts by समृद्धी लखमदे

समृद्धी लखमदे

2 POSTS 0 COMMENTS
समृद्धी लखमदे या होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्या हर्णे येथे सतरा वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहेत. त्यांचे पती संदेश लखमदे एम डी (होमिओपॅथी) डॉक्टर आहेत. ते बावीस वर्षांपासून हर्णे येथील संजीवनी मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करत आहेत.

हर्णे – मानव आणि निसर्ग एकरूप

हर्णे म्हटले, की निळाशार समुद्रकिनारा, नाठाळ वारा, सागरी लाटांची गाज आणि दूरवर गेलेली गलबते ! हर्णे म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी माडा-पोफळींची झाडे, चौपाटीवर साठलेल्या माशांच्या राशी आणि त्यांची उस्तवार सांभाळणारे मच्छिमार बांधव व कोळणी ! ‘हर्णे’ रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील एक गाव. त्याचे रूप आणि थाट तालुक्यासारखेच; तरी डोंगरावरील दापोलीच्या कोर्टकचेऱ्यांच्या अधीन असणारे...

एक सुवर्णदुर्ग – रक्षणा तीन उपदुर्ग !

सुवर्णदुर्ग हा दापोली तालुक्याच्या हर्णे बंदर गावात सागराच्या दिशेने उभा आहे. तो भव्यदिव्य आहे. त्यामुळे तो पर्यटकांना पहिली साद घालतो. सुवर्णदुर्ग किनाऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. तो किल्ला म्हणजे कोकणच्या सौंदर्यात पडलेली जडजवाहिराची खाणच जणू ! त्याने आठ एकर जागा व्यापली आहे. किल्ल्याच्या तटबंदीची उंची तीस फूट आहे. किल्ला सागर किनाऱ्याचे रक्षण करत ताठ मानेने उभा आहे...