Home शिक्षकांचे व्यासपीठ

शिक्षकांचे व्यासपीठ

शिक्षकांचे व्यासपीठ’ ही संकल्पना थिंक महाराष्ट्र डॉट कॉमतर्फे आकारास आणली आहे. आदर्श समाज घडवण्यासाठी शिक्षक त्या योग्यतेचे असणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक काळात असे शिक्षक होते व आहेत. तशा उपक्रमशील शिक्षकांना एकत्र गठित करण्यासाठी ‘शिक्षकांचे व्यासपीठ’ हा प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात आला आहे. त्याच्या सूत्रधार आहेत – शिल्पा खेर. शिक्षकांना विनंती अशीकी त्यांनी त्यांच्या उत्तम कार्यापैकी अविस्मरणीय अनुभव लेखरूपाने थिंक महाराष्ट्र डॉट कॉमकडे फोटोसहित (शिक्षकाचा फोटोउपक्रमाचा फोटो) पाठवावे. शिक्षकाच्या एखाद्या प्रयोगाने त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला असल्यास तसे अनुभव तर अवश्य कळवावे. शिक्षणविषयक अन्य प्रश्नही या प्लॅटफॉर्मवर चर्चेसाठी मांडलेले असतात.

गणितीय कूट रचनेचे मर्म (Concept of Mathematical Coherence)

1
शास्त्रीय संगीताविषयी आणि गणिताविषयी मालिका सुरू करण्याचे उद्दिष्ट हे आहे की काही अमूर्त सौंदर्य कल्पनांपर्यंत पोचण्याचा मार्ग सुकर व्हावा. सर्वसामान्यपणे शास्त्रीय संगीताप्रमाणेच गणिताविषयी मनात एक सूक्ष्म अढी असते पण दोन्ही समजल्यावर आंनंद होतो. गणिताविषयीच्या मालिकेत काही संकल्पना आणि काही कोडी अशी जाणीवपूर्वक रचना केली आहे जेणेकरून वाचायलाही गंमत येईल...

टीच – माणसे घडवणाऱ्या व्यवस्थेचा दिशादर्शक (TEACH Tool for School Inspection)

वर्गात शिकवण्याच्या पद्धतींच्या परिणामकारकतेवर लक्ष ठेवण्यासाठी जगभरातच कोणतीही प्रमाणित साधने वापरली जात नाहीत. असे साधन विकसित करण्याची गरज जागतिक स्तरावरील अभ्यासकांना तीव्रतेने जाणवली. त्यामधून जागतिक बँकेच्या शिक्षण गटाने TEACH हे प्रमाणित वर्गनिरीक्षण साधन विकसित केले आहे. या साधनामुळे शिक्षकांच्या अध्यापनाची गुणवत्ता, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके यांची परिणामकारकता तपासण्यासाठी एक समान आणि विश्वसनीय अशी मोजपट्टी उपलब्ध झाली आहे...

मुलांचे वाचन – एक विचार (Natural Learning a thought)

8
मुलांचे वाचन म्हणजे अर्थातच त्यांची वाचायला शिकण्याची प्रक्रिया. या विषयावर बोलायला सुरुवात अगदी प्राथमिक पातळीवरून करूया. वय वर्षे तीन ते सहा ह्या वयोगटातील मुलांच्या शिक्षणाला बालशिक्षण असे म्हणतात. ह्यालाच 2020 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत शिक्षण असे म्हटले आहे. ह्या पायाभूत शिक्षणाचे किंवा बालशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट मुलांचा सर्वांगीण विकास साधणे हे आहे...

अप्रकाशित हिऱ्यांना पैलू पाडणारी शाळा (The school that anvils undiscovered diamonds)

2
ग्रामीण किंवा निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना शहरातील अनेक गोष्टींबद्दल कुतूहल असते. किंबहुना ते अप्राप्य असल्याची जाणीवही मनात असते. उभरत्या मुलांच्या मनात कोणताही गंड राहू नये, या भावनेने त्यांना योग्य संधी, योग्य मार्गदर्शन देण्याची कळकळ शिक्षकांच्या मनात असेल, तर मुलामुलींचे निरोगी फुलासारखे फुलणारे व्यक्तिमत्त्व तयार होते. जितेंद्र पराडकर यांच्यासारखे शिक्षक पैसा-पैसा जमवून विद्यार्थ्यांसाठी ‘पैसा फंड कलादालन’ उभे करतात त्याची ही गोष्ट....

पाखरा – जव्हार पाड्याच्या मुलांचे पुस्तक !

पालघर जिल्ह्याच्या जव्हार पाडा भागातील मुलांनी पक्ष्यांविषयी लिहिले, त्यांना दिसणाऱ्या पक्ष्यांविषयी तेच ‘पाखरां’ नावाच्या पुस्तकात छापले गेले आहे. त्यांची निरीक्षणे संशोधनातून मांडलेल्या पक्षीपुस्तकापेक्षा कमी नाहीत...

भाषादूत मॅक्सिन बर्नसन

2
मॅक्सिन बर्नसन या मूळ अमेरिकन रहिवासी. त्या मॅक्सिनमावशी म्हणून सातारा जिल्ह्याच्या फलटण परिसरात माहीत आहेत. त्यांनी तेथील लहान मुलांना शिकवले. नंतर प्रौढपणी, त्या ‘टीआयएसएस’च्या हैदराबाद शाखेत प्राध्यापक या नात्याने भाषाविषयक कौशल्ये शिकवत आहेत. त्या त्यांची मायभूमी अमेरिका सोडून कायमच्या भारतात आल्या आणि त्यांना मराठी भाषेचे प्रेम लागले. त्यांनी मराठीकरता मोठे कार्य करून ठेवले आहे...

शेवगावचे रमेशसर – विविधांगी कर्तृत्व

शेवगावचे रमेश भारदे यांना शिक्षणसम्राट होणे सहज शक्य होते, तसे राजकीय संबंधही त्यांचे होते; पण ते शिक्षक झाले ! आणि नंतर सेवाभाव, ध्येयनिष्ठ असे शिक्षणसंस्था चालक बनले. त्यांच्या या कर्तबगारीचा केवळ शेवगाव नव्हे तर नगर जिल्ह्यावर एक वेगळा ठसा उमटला आहे. रमेश भारदे यांनी ज्ञानदानाचे व्रत अखंड जपले...

कं चे भा गु बे व – आयुष्याचे गणित

मी माझ्या आयुष्यातील जवळपास एकोणचाळीस वर्षे गणित ह्या विषयाचे अध्यापन केले. माध्यमिक शाळेत असताना पदावली (पॉलिनॉमीयल्) सोडवण्याची उदाहरणे असत. त्यासाठी सूत्र होते ‘कं चे भा गु बे व’ ! तेच आयुष्याचेही सूत्र आहे...

राजा-रेणू दांडेकर – चिखलगावचे ध्येयप्रेरित जोडपे

राजा दांडेकर हे दापोली तालुक्यातील चिखलगावचे. त्यांनी शिकून- डॉक्टर होऊन परत स्वत:च्या गावी यायचे ठरवले होते. ते ध्येयवादाने झपाटलेले व्यक्तिमत्त्व. भारताचा इतिहास व भारतीय संस्कृती यांच्यावरील प्रेम त्यांच्यात ठासून भरलेले आहे. त्यांनी लोकसाधना संस्थेच्या माध्यमातून शाळा काढली. तेथे शासनाचा अभ्यासक्रम सांभाळून प्रत्येक मुलाला प्रयोगशील उत्पादक शिक्षण कसे देता येईल असा प्रयत्न असतो...

मुराद बुरोंडकर यांचे आंबा संशोधन

0
मुराद महम्मद बुरोंडकर यांचे कर्तृत्त्व दापोलीत, विशेषत: कोकण कृषी विद्यापीठात बहरले; परंतु नियतीचा भाग असा, की मुराद बुरोंडकर यांनी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून 2021 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्याच वर्षी त्यांचे कोल्हापूर येथे आकस्मिक निधन झाले...