Tag: Kolhapur
राजाराम महाराजांचे इटालीमध्ये स्मारक ! (Rajaram Maharaj Memorial In Italy)
कोल्हापूरचे महाराज राजाराम (दुसरे) ह्यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, 1870 मध्ये युरोपात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जनसामान्यांत आणि काही कुटुंबीयांतही नाराजी उमटली. समुद्र ओलांडण्याला सनातनी हिंदुधर्मात मान्यता नाही असा समज होता ना ! पण राजाराम महाराज ती सर्व नाराजी ओलांडून निर्धाराने युरोपात गेले, कारण त्यांना युरोपीय शिक्षणपद्धत समजाऊन घेऊन ती स्वतःच्या संस्थानात सुरू करायची होती. राजाराम महाराज स्वतः इंग्रजी शिकलेले होते. त्यांनी उत्तम संभाषण इंग्रजीत करण्याइतकी पात्रता मिळवली होती. ब्रिटिशांनी राजाराम महाराजांना राज्यकारभार व शालेय शिक्षण, दोन्ही चांगल्या प्रकारचे देण्याची व्यवस्था केली होती...
गल्लीतली दिवाळी सुट्टी (Diwali Vacation in Good Old Days!)
आमची गल्ली म्हणजे राजारामपुरी अकरावी गल्ली, कोल्हापूर. आमच्या लहानपणी आम्ही या गल्लीत राहत असू. सहामाही परीक्षा संपली की शाळेला दिवाळीची सुट्टी लागायची. त्यावेळच्या दिवाळी सुट्टीचे, दिवाळीच्या अगोदरची आणि दिवाळीच्या नंतरची सुट्टी असे सरळ सरळ दोन भाग करता येत. त्या काळातल्या आठवणींनी डोळे क्षणभर पाणावतात. केवळ क्षणभरच... आजच्या सुट्टीतली मजा विकत घेतलेली असली तरी... सोयीची आहे... कालसुसंगत आहे... हे जाणवत राहतं...
कोल्हापूर-गगनबावड्याचे मोरजाई पठार !
मोरजाई परिसरातील भटकंती म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा, पर्वतांचा, संस्कृतीचा, पाण्याचा, अरण्यांचा, स्थापत्यांचा अस्सल अनुभव ! तो अनुभव इतिहासातही जिवंत असण्याचा भाव निर्माण करू शकतो. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर आसळज गावापासून तीन-चार किलोमीटर डावीकडील बाजूस सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक ओढा आहे. मुख्य रस्ता सोडून थोडे आत... गर्द वनराई, निवळशंख पाणी आणि त्यासोबत काही हिनयान पंथीय छोटी, पण टुमदार लेणी असे ते विलक्षण नैसर्गिक पण माणसाचा यथायोग्य हस्तक्षेप झालेले ठिकाण आहे...
सामानगड – वेडात दौडले वीर मराठे सात ! (Samangad – The fort known for...
कोल्हापूरजवळच्या सामानगड या किल्ल्याचे स्थान आणि महत्त्व, दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो वल्लभगड, महिपालगड, भुदरगड, रांगणा अशा लढाऊ किल्ल्यांच्या बेचक्यात, अगदी मधोमध आहे. त्यामुळे त्या किल्ल्याचे महत्त्व रसद पुरवठ्यासाठी फार जाणवून गेले. त्यावरूनच कदाचित किल्ल्यास सामानगड हे नाव पडले असावे ! अवघा महाराष्ट्र शिवराज्याभिषेकात 1674 मध्ये न्हाऊन निघाला होता. तेव्हा त्या किल्ल्याच्या परिसरात वेगळ्याच घटना घडत होत्या. स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजर यांना मात्र त्या शिवराज्याभिषेक समारंभापासून वंचित राहवे लागले...
अंधांना डोळे आणि डोळसांना दृष्टी – अत्याळची चळवळ
‘नेत्रदान’ हे श्रेष्ठ दान आहे ही जाणीव गडहिंग्लज तालुक्याच्या ‘अत्याळ’ गावातील लोकांमध्ये जागी झाली आहे. तेथे गेल्या दहा वर्षांपासून (2012) ‘अंधांना डोळे व डोळसांना दृष्टी’ या ब्रीदवाक्यावर आधारित चळवळ सुरू आहे. कौतुक म्हणजे अत्याळमधील चळवळीशी वर्षागणिक नवी गावे जोडली जात आहेत. चळवळीच्या माध्यमातून त्या छोट्या छोट्या गावांतून अकरा वर्षांत शहाण्णव जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे ! परस्परांपासून दुरावत चाललेली माणसे एकमेकांना जोडली जावीत ही भावना हा चळवळीचा गाभा होऊन गेला आहे. ज्या अंधांना नेत्र प्रत्यारोपणातून दृष्टी मिळू शकत नाही अशा दृष्टीहीनांचा समाजातील वावर सुकर व्हावा म्हणून कार्यशाळा आणि त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती केंद्र असे जादा उपक्रमही चळवळीमार्फत चालतात...
एड्सग्रस्तांना जपणारी जाणीव ! (Couple recovered from Aids helps the Community to stand...
कोल्हापूरच्या सुषमा बटकडली आणि रघुनाथ पाटील या दोघांनी, ती दोघे स्वत: एड्ससह आयुष्य जगत असताना एकत्र येऊन ‘जाणीव’ या संस्थेची स्थापना केली. ती दोघे एच.आय.व्ही. बाधित रुग्णांना औषधोपचाराविषयी मार्गदर्शन आणि महाविद्यालयांमधून एड्सविषयी जनजागृती असे काम करत आहेत. त्याखेरीज त्यांनी एड्स रुग्णांसाठी तात्पुरते आसरा स्थळ चालवले आहे...
सखा कलाल – एका कथाकाराची अखेर
सखा कलाल गेले आणि पंचेचाळीस वर्षांचा स्नेह सरला. सखा कलाल स्वत:विषयी फार कमी बोलायचे, त्यामुळे त्यांची जीवनकथा त्यांच्यासमवेत गेली. त्यांचे ‘ढग’ आणि ‘सांज’ हे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले...
शालेय शिक्षणक्रमात नैतिक मूल्ये !
समाजात गुन्हेगारी वाढू नये याकरता मुलांना शालेय वयापासून नैतिकतेचे धडे देणे आवश्यक आहे असे म्हणणे कोल्हापूर येथील कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांचे आहे. ते राष्ट्रपती पदकाने तसेच विविध पुरस्कारांनी सन्मानित अधिकारी आहेत...