Tag: हर्णे
दापोलीचे केशवराज मंदिर (Dapoli’s unique Keshavraj Temple)
केशवराज मंदिर हे दापोलीचे मोठे आकर्षण आहे. त्याला धार्मिक व भाविक असे महात्म्य लाभले आहेच; त्याबरोबर, पर्यटनाच्या दृष्टीनेही ते ठिकाण विलोभनीय वाटते. मंदिरातील विष्णुमूर्ती सुंदर आहे. त्या विष्णुमूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्म या आयुधांच्या धारण करण्याच्या क्रमावरुन चोवीस प्रकार पुराणात (अग्नी, पद्म, स्कंद) सांगितलेले आहेत...
सामाजिक दायित्व जपणारी दापोली अर्बन बँक (Dapoli Bank – An institute that belongs to...
दापोली अर्बन सहकारी बँकेची स्थापना 29 फेबुवारी 1960 रोजी झाली. बँक स्थापनेमागे उद्देश दापोली शहराच्या व्यापाराची व सर्वसामान्य माणसाची आर्थिक गरज भागवावी आणि शहराचा विकास साधावा हा होता. दापोली तालुक्याेत कोकण कृषी विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, सायन्स-आर्टस् कॉलेज अशा विविध शैक्षणिक सुविधा बनत गेल्या. मात्र तरी दापोलीच्या तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुणे-मुंबई यांसारख्या शहरांकडे जावे लागे. ती उणीव बँकेने हेरली व सदतीस लाख रुपये एवढी देणगी देऊन दापोली अर्बन सिनिअर सायन्स कॉलेजची स्थापना केली !
हर्णे – मानव आणि निसर्ग एकरूप
हर्णे म्हटले, की निळाशार समुद्रकिनारा, नाठाळ वारा, सागरी लाटांची गाज आणि दूरवर गेलेली गलबते ! हर्णे म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी माडा-पोफळींची झाडे, चौपाटीवर साठलेल्या माशांच्या राशी आणि त्यांची उस्तवार सांभाळणारे मच्छिमार बांधव व कोळणी ! ‘हर्णे’ रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील एक गाव. त्याचे रूप आणि थाट तालुक्यासारखेच; तरी डोंगरावरील दापोलीच्या कोर्टकचेऱ्यांच्या अधीन असणारे...
एक सुवर्णदुर्ग – रक्षणा तीन उपदुर्ग !
सुवर्णदुर्ग हा दापोली तालुक्याच्या हर्णे बंदर गावात सागराच्या दिशेने उभा आहे. तो भव्यदिव्य आहे. त्यामुळे तो पर्यटकांना पहिली साद घालतो. सुवर्णदुर्ग किनाऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. तो किल्ला म्हणजे कोकणच्या सौंदर्यात पडलेली जडजवाहिराची खाणच जणू ! त्याने आठ एकर जागा व्यापली आहे. किल्ल्याच्या तटबंदीची उंची तीस फूट आहे. किल्ला सागर किनाऱ्याचे रक्षण करत ताठ मानेने उभा आहे...
जी.व्ही. – आप्पा मंडलीक – गरिबांचे डॉक्टर (G V Mandalik- Dapoli’s doctor with heart)
डॉ.जी.व्ही. ऊर्फ आप्पासाहेब मंडलीक यांचे शिक्षण मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून झाले. त्यांनी त्यांचा वैद्यकीय व्यवसाय एम बी बी एस झाल्याबरोबर, 1939 साली सुरू केला. डॉ. जी.व्ही. हे दापोलीतील पहिले एम बी बी एस डॉक्टर होत. डॉ. जी.व्ही. यांचा विवाह पुण्याच्या शकुंतला गोखले यांच्याशी 1939 सालच्या डिंसेबर महिन्यात झाला. तो प्रेमविवाह होता. दोघेही एकमेकांना ओळखत होते. लग्नानंतर त्या शैलजा ऊर्फ शैला मंडलीक झाल्या. कोकणासारख्या ठिकाणी त्या काळी वैद्यकीय व्यवसाय करणे खूप कठीण होते. दापोली हे जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी खेडेगावासारखे होते. डॉक्टर आप्पांना सायकलने वा पायी जाऊन त्यांचे रुग्ण तपासावे लागत होते...
पी. व्ही. मंडलीक : सार्वजनिक कार्याचा आदर्श (P V Mandalik- Doctor with socialistic ideals)
वासुतात्या मंडलीक यांच्या दोन मुलांनी नाव काढले- पैकी डॉ. पुरुषोत्तम वासुदेव (पी.व्ही.) मंडलीक यांनी मुंबईत प्रॅक्टिस केली आणि मोठे सार्वजनिक काम उभे केले. पी.व्ही. यांनी 1924 पासून खेतवाडी परिसरात आठव्या गल्लीच्या नाक्यावर वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. ते 1957 सालच्या विधानसभा निवडणुकीत, दापोली-मंडणगड मतदार संघातून प्रजासमाजवादी पक्षातर्फे व 1962 साली दापोली-गुहागरमधून उभे राहिले आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आले. ते समाजवादी विचाराच्या अनेक संस्थांशी जोडलेले होते...
रावसाहेब मंडलिक – अव्वल इंग्रजी अमदानीतील रामशास्त्री
माणूस एखाद्या वैशिष्ट्यानेही अमर होऊन राहतो ! मूळ दापोलीचे रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांच्या येण्याजाण्यावरून लोक घड्याळ लावत असत ! ‘मंडलिकी टाइम’ अशी संज्ञाच दापोलीत प्रसिद्ध होती ! रावसाहेब मंडलिक आले की समारंभाची वेळ झाली असे समजले जाई. रावसाहेबांनी ज्यांच्यासमोर वकिली केली त्या न्यायाधीशांनाही वेळेच्या बाबतीत सवलत नसे...
दापोलीतील पाखरपहाट
मी दापोलीत 1996 मध्ये स्थिरावलो. मी राहतो त्या दापोलीच्या ‘वडाचा कोंड-लालबाग’ परिसरातील पाखरांची संख्या व विविधता गेल्या पंचवीस वर्षांत कमी होत गेली आहे, कारण झाडांची संख्या कमी झाली आहे ! आमच्या सोसायटीच्या आवारातील शिवणीचे गारवा, सावली देणारे झाडही माझ्या विरोधाला न जुमानता पाडण्यात आले ! त्यामुळे मी कितीतरी पक्षी व त्यांचे स्वर यांना मुकलो...
मुर्डी : दापोली तालुक्यातील उद्यमनगरी
दापोली तालुक्यातील मुर्डी हे परंपरा आणि नवता एकत्र असलेले गाव. ते स्वतःचे असे खास अस्तित्व जपत असते. गाव त्याच्याच तोऱ्यात आणि मिजाशीत असते असे म्हटले तरी चालेल. ते छोटेसे टुमदार गाव; डोंगराच्या कुशीत वसले आहे. लोकमान्य टिळक यांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले त्या वेळेस मुर्डीत कृष्णशास्त्री पेंडसे यांच्या घरी दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू झाला. तो खाजगी असला तरी तो सर्व गावाचा वाटावा असे त्याचे स्वरूप सार्वजनिक होते. गावचे खोत, पेंडसे यांची आठ-नऊ घरे गावात राहती होती. खोती प्रतिवर्षी प्रत्येक घरी बदलती असे...
इंजिनीयर विजय गोळे – ‘केल्याने प्रवास-पर्यटन मनुजा चातुर्य येतसे फार’
इंजिनीयर विजय गोळे नोकरीउद्योगाच्या निमित्ताने देशभर फिरले, पण अखेरीस स्वगावी, दापोलीला येऊन स्थिरावले. त्यांना परदेशी जायचेच नव्हते, त्यामुळे तो मुद्दा त्यांच्या जीवनात पुढे आला नाही. त्यांचे मूळ गाव हर्णे, दापोलीपासून पंधरा किलोमीटरवर. तेथे त्यांचे दोनशे वर्षांपूर्वीचे जुने घर आहे...