Home Tags शिवमंदिर

Tag: शिवमंदिर

खिद्रापूरचा कोपेश्वर – छोटे खजुराहो !

कोल्हापूरनजीकच्या खिद्रापूर येथील कोपेश्वर शिवमंदिर म्हणजे श्रद्धा व शिल्पकला यांचे उत्तम मिश्रण आहे. तेथील प्राचीन वैभव सुस्थितीत आढळते. शिलाहारांनी अनेक देवळे बांधली, त्यांतील अंबरनाथ, पेल्हार, वाळकेश्वर येथील मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक आहे खिद्रापूरचे शिवमंदिर. रामायण, महाभारत, भौगोलिक विश्वसंस्कृती, प्रेम, साहित्य, पर्यावरण, वन्यजीव, स्थापत्यशास्त्र अशा बहुविषयांना स्पर्श केलेली शिल्पे मंदिरात आहेत...

महाराष्ट्राच्या सीमेवरील होट्टलची बुट्टीजत्रा (Hottal fair brings Lingayats from three states together)

होट्टल गावाची ख्याती शिवमंदिरांचे गाव म्हणून सर्वदूर आहे. तेथे चार भव्यदिव्य शिवमंदिरे आढळतात- सिद्धेश्वर, रेब्बेश्वर, सोमेश्वर आणि परमेश्वर अशी त्यांची नावे. शिवमंदिरांची उभारणी अकराव्या शतकात झाली. नितांतसुंदर अशा शिल्पकलेने नटलेली अशी ती शिवमंदिरे आहेत. होट्टल ही कल्याणीच्या चालुक्यांची उपराजधानी होती. बदामी ही मुख्य राजधानी होती. होट्टलची बुट्टीजत्रा ही आगळीवेगळी आहे...

लासूरचे आनंदेश्वर शिवमंदिर

लासूर नावाचे खेडेगाव अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे. ते प्रसिद्ध आहे तेथील आंनदेश्वर शिव मंदिरासाठी. आकर्षणाची गोष्ट म्हणजे ते शिवमंदिर आठशे वर्षे जुने, बाराव्या शतकात बांधलेले आहे. मंदिर उंचावर आहे. त्याचा परिसर रम्य आहे. मंदिराचे संपूर्ण दगडी बांधकाम. ते मोठमोठ्या शिळांवर कलात्मक रीत्या रचलेले. तो हेमाडपंथी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो...

कमलादेवीचा कार्तिकोत्सव

रंभाजीराव बंडखोर वृत्तीचे होते. त्यांनी उत्तर आयुष्यात हातातील समशेर खाली ठेवली व लेखणी हातात घेतली. त्यांनी आदिशक्तीचे कलापूर्ण मंदिर करमाळा येथे बांधले. कमलादेवीच्या उत्सवाचा मुख्य दिवस कार्तिक वद्य चतुर्थीस असतो. त्या पूर्वी चार दिवस म्हणजे कार्तिकी पौर्णिमेपासून यात्रेची सुरुवात होते...

श्रीक्षेत्र नारायणपूर – नारायणेश्वराचे मंदिर (Narayaneshwar Temple of Narayanpur)

नारायणपूरचे नारायणेश्वर मंदिर यादवकालीन आहे. सहसा मंदिरे पूर्वाभिमुख असतात, पण ते पश्चिमाभिमुख मंदिर आहे. तेथे गर्भागृहात स्वयंभू शिवलिंग आहे. इतिहासाची साक्ष देणारे शिलालेख मंदिर परिसरात दृष्टीस पडतात. संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर शिल्पकला व नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना आहे...

पालशेतची ‘पुराश्मयुगकालीन गुहा’ – कोकणातील पहिली (Palshet’s Paleolithic cave – first in Konkan)

0
रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील सुसरोंडी-पालशेतची ‘पुराश्मयुगकालीन गुहा’ हे आश्चर्यच ठरले आहे ! तिचा शोध पुण्याच्या डेक्कन पोस्ट ग्रज्युएट रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रा. डॉ. अशोक मराठे यांनी 2001 साली लावला. ती किमान नव्वद हजार वर्षे जुनी असावी. भारताच्या साडेसात हजार किलोमीटर लांब समुद्र किनाऱ्यावरील ती पहिली गुहा आहे. ती मानवनिर्मित गुहा आहे...

भेंडवडे येथील पुरातन शिवमंदिर (Shiv temple at Bhendavade Dist. Sangli)

भेंडवडे हे सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्‍यातील दोन-अडीच हजार लोकसंख्येचे छोटेसे खेडेगाव. भेंडवडे गाव विट्याच्या पूर्वेला, विट्यापासून साधारण आठ-दहा किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. भेंडवडे हे गाव 1989 पर्यंत एकच होते...
_shiv_gaura

शिवगौरा – मूर्तिरूपातील शंकर, उरणजवळ

खोपटे हे उरण तालुक्यातील अरबी समुद्रालगतच्या खाडीकिनारी वसलेले, विस्ताराने मोठे गाव. ते गाव सात पाड्यांनी मिळून बनले आहे. गावात इतर गावांसारखाच गणेशोत्सव साजरा होतो,...
-bhadrapad-vrate

भाद्रपद महिन्यातील व्रते

भाद्रपद महिन्यात येणारी 'धार्मिक व्रते' हा श्रावण महिन्याच्या जोडीने समाजमनाच्या आस्थेचा विषय बनतो. ती क्रमाने एकापाठोपाठ येणारी स्वतंत्र व्रते आहेत. परंतु, ती पाठोपाठ येत...
-nathsanpraday

नाथसंप्रदाय : उदय आणि विस्तार

नाथसंप्रदाय हा संप्रदाय स्वरूपात केव्हापासून प्रचलित झाला हे सांगणे अवघड आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचा काळ हा नाथसंप्रदायाच्या प्रवर्तनाचा काळ मानला जातो. नाथसंप्रदाय हा...