केरवाडी-परभणी येथील सूर्यकांत कुळकर्णी हा सतत अस्वस्थ व म्हणून संतप्त असतो. तो एकूण सामाजिक निष्काळजीपणाबद्दल हतबलता व्यक्त करत राहतो - मात्र तेवढ्यापुरता. तो त्याच्या सत्तराव्या वर्षीदेखील ‘अँग्री यंग मॅन’ वाटतो...
रत्नागिरी जिल्ह्यातील मुटाट गावातील डॉ.श्रीधर रघुनाथ लेले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात बोरोसिलिकेट ग्लास निर्माण केली. प्रखर उष्णतेला टिकणारी आणि कोणत्याही रसायनांचा परिणाम न होणारी ती काच विज्ञानक्षेत्राला वरदान ठरली !...
समाजात गुन्हेगारी वाढू नये याकरता मुलांना शालेय वयापासून नैतिकतेचे धडे देणे आवश्यक आहे असे म्हणणे कोल्हापूर येथील कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांचे आहे. ते राष्ट्रपती पदकाने तसेच विविध पुरस्कारांनी सन्मानित अधिकारी आहेत...
महाराष्ट्रातील मुसलमानांची मातृभाषा मराठी असून संस्कृती महाराष्ट्रीय आहे, असे प्रतिपादन करणारा कॉ. अमर शेख यांचा लेख ‘किर्लोस्कर’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. आजच्या भाषिक आणि सांस्कृतिक जागृतीच्या काळात प्रसिद्ध झालेला हा लेख महत्त्वपूर्ण आहे, तथापि तो परिपूर्ण नाही...
सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांत शिक्षणाचे फार मोठे काम केले, पण त्यांच्याच काळात अनेक अनाम एकाकी स्त्रियांनी देशाच्या कानाकोपऱ्यात राहून तसेच काम केले आहे ! त्यापैकीच एक माझी पणजी सरस्वती नाईक. म्हणून मी म्हणते, "मी सरस्वती नाईकांच्या लेकीच्या लेकीची लेक आहे"...
शालेय मुलांचे ऑनलाईन शिक्षण लॉकडाऊनमुळे 2020 मध्ये सुरू झाले, परंतु स्थलांतरित मुलांच्या शिक्षणाची मोठी अडचण निर्माण झाली. तशा मुलांच्या अनेक झोपड्या नांदूर गावात कोरोनाच्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने जुलै 2020 महिन्यात दिसून आल्या. परंतु ऊसतोडीला पालकांबरोबर दिवसभर गेलेली ती मुले संध्याकाळीच माघारी येत. त्यांचे सर्वेक्षण करणे कठीण होते...
‘ज्यावेळी, मरणारा माणूस उपासमारीनंतर येणाऱ्या अतिसाराच्या विकाराने दगावतो, तेव्हा अतिसाराच्या जंतूंपेक्षा, अन्नाचा अभाव हे त्या मृत्यूचे कारण असते. ----’ हे पुस्तक म्हणजे वेदनेचा चित्कार, करुणेचे आर्जव, अश्रूंची आणखी एक लाट याहून काहीतरी अधिक आहे...
नानावाडा ही जुना पेशवेकालीन इमारत पुण्यात शनिवार वाड्याला लागून आहे. तेथे ‘नूतन विद्यालय’ नावाची महानगरपालिकेची पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण असणारी शाळा दुसऱ्या मजल्यावर दोन...
सात मुलांची धावण्याची शर्यत होती. शर्यत सुरू होऊन, सर्वांनी धावण्यास सुरुवात केली. एक मुलगा अडखळला आणि धपकन खाली पडला. त्याच्या ओरडण्याने, बाकीच्या मुलांनी वळून...