सध्या जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. लोकांना त्याच्या बातम्या, हकिकती वर्तमानपत्रे, टीव्ही आणि समाजमाध्यमे यांवरून कळतात. पण त्या सर्वांवरच वाचक/प्रेक्षकांचा विश्वास बसतो असे नव्हे. शिवाय प्रत्यक्षदर्शी हकिकतीस वेगळे वजन प्राप्त होते. भारतातील हकिकती आपल्याला विविध मार्गाने कळत असतात. परदेशस्थ जी मराठी मंडळी आहेत त्यांना तेथील प्रत्यक्ष परिस्थिती अनुभवातून लिहिण्याबाबत आम्ही सुचवत आहोत.