Home Authors Posts by सोनाली जोग-पानसरे

सोनाली जोग-पानसरे

1 POSTS 0 COMMENTS
सोनाली जोग-पानसरे या मेरीलँड (अमेरिका) येथे वीस वर्षांपासून राहतात. त्या अमेरिकन फेडरल सरकारमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करतात. त्यांना चित्रकला,लेखण व सामाजिक कार्य असे विविध छंद आहेत. त्याखेरीज त्यांना आध्यात्माची ओढ आहे. त्या दहा वर्षांपासून इस्कॉनशी जोडलेल्या आहेत. त्यांचाजन्म व शिक्षण औरंगाबाद येथे झाले. त्यांनी जवाहरलाल नेहरू इंजिनीयरींग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर त्यांनी प्राध्यापक म्हणून वाडिया कॉलेज (पुणे), जवाहरलाल नेहरू इंजिनीयरींग कॉलेज (औरंगाबाद), इव्हीपी कॉलेज (चेन्नई) अशा तीन ठिकाणी अध्यापन केले. त्यानंतर त्या अमेरिकेत गेल्या. त्यांचे पती रणजित जोग हे आहेत आणि त्यांना वेदांत आणि सिद्धांत अशी दोन मुले आहेत. सोनाली जोग यांचे आजोबा दादा पानसरे हे पावसचे स्वामी स्वरूपानंद यांचे निकटचे शिष्य आणि भक्त होते.

कोरोना काळात गवसली आनंदाची गुरुकिल्ली: सोनाली जोग (Lockdown In Search Of Spirituality)

अमेरिकेत सरकारी पातळीवर कोरोना वायरसशी सामना करण्यासाठी हालचाली 1 मार्चच्या सुमारास सुरू झाल्या. तोपर्यंत करोनाग्रस्तांचा आकडा तसा कमीच होता, परंतु त्याच्यापुढे येऊ घातलेल्या परिणामांची चाहूल लागल्याने, आम्हाला घरून काम करण्याचे आदेश 10 मार्चच्या सुमारास मिळाले.