म्युझियम म्हणजेच वस्तुसंग्रहालय हे अनौपचारिक शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या कलादालनात चित्रांचा अभ्यास करणारे विद्यार्थी पाहिले की या विधानाचा प्रत्यय येतो. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे मुंबई शहराचा मानबिंदू आहे. देशातील कला-इतिहास-संस्कृतीचा वारसा काळजीपूर्वक जतन करणारे आणि त्याचबरोबर समकालीन कला-संस्कृतीच्या वाढीकडेही तितक्याच डोळसपणे व कृतिशीलतेने पाहणारे ते देशातील एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे...
श्रीराम भिकाजी वेलणकर हे ‘पिनकोड’चे जनक म्हणून ओळखले जातात. ‘पिनकोड’शी प्रत्येक भारतीयाचे नाते घट्ट जोडलेलेआहे. त्याच्या नावासमोर नुसता पिनकोड नंबर लिहिला, तरी ती व्यक्ती देशाच्या कोणत्या भागात राहते हे कळून येते.
सिंधुदुर्गजिल्ह्यात वेंगुर्ल्याहूनशिरोड्याला जाताना वाटेत मोचेमाडची खाडी लागते. ती खाडी ओलांडली की डाव्या कुशीला लागतं आमचं न्हैचिआड. न्है म्हणजे नदीअथवा खाडी. त्यांच्या आड वसलेलं, म्हणून...
‘रापण’ हे कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारीचे मुख्य साधन होते; त्याच बरोबर ती गावची घटना होऊन गेली होती. आमच्या तांबळडेग गावाला पहाटे कोंबडा आरवला की जाग येत असे.
गीता गोरेगावकर-गोडबोले या ज्ञानव्रती आहेत. त्यांचा ध्यास वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यास व संशोधन हा आहे. गीता यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थमधून डॉ. दीपक मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली Ph.D. केली.
काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म 30 ऑगस्ट 1850 रोजी झाला. ते विविध पदांमुळे व त्यास अनुरूप कार्यामुळे ओळखले जातात - प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडित, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक,
दया डोंगरे यांचे नाव घेतले, की डोळ्यांसमोर येते ती ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ या चित्रपटातील सुनेच्या विरोधात गनिमी कावा करणारी, मुलाला मुठीत ठेवू पाहणारी अशी धूर्त, खमकी, कावेबाज सासू! त्यांचा करारी चेहरा,
मुंबईतील जोगेश्वरीची ‘सरस्वती बाग’. त्या गृहनिर्माण सोसायटीच्या स्थापनेला 2019 साली शंभर वर्षें पूर्ण झाली. गजबजत्या जोगेश्वरी स्थानकापासून पूर्वेकडे जेमतेम आठ-दहा मिनिटे चालले, की उजव्या हाताला ‘सरस्वती बाग’ ही दगडी बंगल्यांची वसाहत दिसते.
अमेरिकेत मराठी शाळा गेली काही दशके चालू आहेत. त्यांचे स्वरूप अनौपचारिक रीत्या भरवलेले वर्ग असे अनेक वर्षे होते. ते आता सुसूत्र संघटित केले जात आहे. त्यासाठी खास अभ्यासक्रम आखला गेला आहे.
कीर्तनपरंपरा म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे वैभव होय. कीर्तन परंपरा म्हणजे रंजन आणि शिक्षण यांचा अपूर्व समन्वय आहे. महाराष्ट्रात नारदीय आणि वारकरी अशा दोन कीर्तन परंपरा आहेत. मात्र अलिकडे नारदीय कीर्तन परंपरा दुर्बल झाली आहे.