ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतील सौंदर्यभाव जसा खुलवून सांगितला, तितक्याच महात्म्याने साहित्यातील विवेकमूल्याची निकड प्रतिपादन केली. त्यांच्यानंतरच्या संतपरंपरेने मराठी साहित्याला व विचारविश्वाला विवेकाचा पाया घालून दिला. म्हणूनच सदानंद मोरे त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून ज्ञानेश्वरीमधील बाराव्या अध्यायातील नमनाच्या काव्यपंक्तींना ‘मराठी भाषेचा जाहीरनामा’ म्हणत आहेत…
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ‘निबंधमाला’ सुरू केली ती बहुश्रुतता व योग्य पुस्तकांची लोकांना माहिती देऊन मराठी भाषा समृद्ध करण्याच्या उद्देशाने. त्यांनी ‘निबंधमाले’तून सकस, वैचारिक आणि दर्जेदार लेखांचे सलग आठ वर्षे लेखन करून 1881 पर्यंत विविध छापखान्यांतून चौऱ्याऐंशी अंक छापून प्रसिद्ध केले. विष्णुशास्त्री यांनी ‘निबंधमाले’तून मनोरंजन न करता लोकजागृती, विचारक्रांती आणि मराठी भाषेची अभिव्यक्ती याची कास धरली...
विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आधुनिक मराठी गद्याचे जनक आणि मराठी भाषेतील श्रेष्ठ ग्रंथकार होत. त्यांना ‘सामाजिक सुधारणेचा वाहता झरा’ ही उपमा दिली गेली. त्यांचे ‘निबंधमाला’ हे नियतकालिक फार गाजले. त्यांना अवघे बत्तीस वर्षांचे आयुष्य लाभले होते. तेवढ्या अल्प आयुष्यात त्यांनी साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान अजोड आहे...
स्वतःमधील क्षमतांचा परिचय करून घेणे, त्या दिशेने पुढे चालणे व जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण करणे म्हणजे शिक्षण ! ते शिक्षण नर्मदाघाटीत मेधा पाटकरांच्या जीवनशाळा देतात. त्यांच्या या उपक्रमामुळे मुले हातात शस्त्र न घेता जीवनशाळांमध्ये जाऊन शिक्षण घेत आहेत. योग्य शिक्षण, योग्य मार्गदर्शन कशा प्रकारे समाजाची उन्नती साधू शकते हे जीवनशाळेला भेट दिल्यावर जाणवते...
लेखक-अनुवादक उमा कुळकर्णी यांची मुलाखत तेजश्री कांबळे यांनी पुणे आकाशवाणीवर घेतली. कन्नड-मराठी साहित्य, अनुवादातील अडचणी, उमा कुळकर्णी यांचे स्वत:चे साहित्य-आत्मचरित्र अशा विविध लेखन-अनुवाद संबंधित विषयांवर बोलणे झाल्यानंतर तेजश्रीने भाषेच्या अभिजाततेचा मुद्दा उपस्थित केला...
मराठी भाषकांना त्यांच्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला की ते कृतकृत्य होऊन जातील, असा सुखवाद सध्या महाराष्ट्र देशी साद घालत आहे ! अभिजाततेचा हा प्रश्न नेमका काय आहे?
मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सुरुवातीला त्यावर केवळ एक चॅनेल होते. त्यावर कोकणी बातम्या नियमित व सिंधी कार्यक्रमही होत असत. पण त्याचा मराठी प्रेक्षकांना फारसा आनंद लुटता येत नसे...
महाराष्ट्रातील मुसलमानांची मातृभाषा मराठी असून संस्कृती महाराष्ट्रीय आहे, असे प्रतिपादन करणारा कॉ. अमर शेख यांचा लेख ‘किर्लोस्कर’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. आजच्या भाषिक आणि सांस्कृतिक जागृतीच्या काळात प्रसिद्ध झालेला हा लेख महत्त्वपूर्ण आहे, तथापि तो परिपूर्ण नाही...
पंकजा मुंडे वडिलांचा उल्लेख मुंडेसाहेब असा करतात, सुप्रिया सुळेही वडिलांचा उल्लेख तसाच साहेब म्हणून करतात, राजकीय नेते एकमेकांना विधानसभेत साहेब म्हणतात व कार्यकर्तेही त्यांच्या नेत्यांना साहेब म्हणतात. हे नवीनच विचित्र नाव पुढे आले आहे...
'नाकी नऊ येणे' ह्या वाक्प्रचाराचे अर्थ शब्दकोशात अतिशय दमणे, कंटाळणे, श्रमाने थकणे असे दिलेले आहेत; तसेच, मरणाच्या दारी असणे, नऊ इंद्रियांची शक्ती नाकात येणे...