Tag: भाषा
अभिजात दर्जा मिळाला… आता पुढे काय?
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. त्यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठरवलेले होते. 2004 मधील निकष 2005 मध्ये सुधारित करण्यात आले. ते चार निकष जी भाषा पूर्ण करेल, त्या भाषेला हा अभिजाततेचा दर्जा मिळतो. त्यानुसार आतापर्यंत प्रारंभी तमिळ (2004) आणि संस्कृत (2005) भाषेला असा दर्जा मिळाला.
त्यानंतर तेलुगु (2008), कन्नड (2008), मल्याळम (2013) आणि उडिया (2014) याही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. हे निकष 2024 मध्ये सुधारित करण्यात आले. त्यानुसार मराठीसोबत पाली, प्राकृत, बांगला आणि आसामी या भाषांनाही हा अभिजात दर्जा देण्यात आला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर दोनशे-तीनशे कोटी रुपये वगैरे मिळणार नाहीत. दूरदृष्टी ठेवून प्रकल्प आखावे लागतील तेव्हाच काही कोटी रूपये मिळू शकतील. त्यासाठी अभ्यासकांनी विचार करण्यास हवा...
प्रवास शब्दांचे आणि अर्थांचे
नंदिनी आत्मसिद्ध या बहुभाषाविद्वान आहेत. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर प्रभुत्व आहे. त्याचबरोबर त्यांचा कन्नड, बांग्ला, उर्दू आणि फार्सी या भाषांचाही अभ्यास आहे. त्या ‘मोगरा फुलला’च्या वाचकांसाठी शब्दांच्या व्युत्पत्ती, त्यांचा प्रवास याविषयी लिहिणार आहेत. या मालिकेचे शीर्षक आहे ‘शहाणे शब्द’. त्यातील हा पहिला लेख...
शब्द – भटके-विमुक्त (Wandering Words)
या जगात सगळ्यात जास्त भटके-विमुक्त कोण असतील, तर ते म्हणजे भाषेतील शब्द. मानव समाज स्थिर झाल्यानंतर नवनव्या अवजारांचे, नवनव्या तंत्रांचे शोध लागत गेले. गरजेपेक्षा जास्त उत्पादन होऊ लागले. माणसाला शिकारी अवस्थेतील खडतर जीवनापासून थोडी मुक्ती मिळाली, कला-कौशल्ये विकसित झाली आणि साहजिकच व्यापाराला चालना मिळाली. भाषांची, शब्दांची देवाणघेवाण व्यापारामुळे जेवढी झाली तेवढी इतर कोठल्याही घटकामुळे झाली नसेल. व्यापारमार्गावर झालेल्या भाषिक देवाणघेवाणीमुळे भारतीय भाषांमध्ये फारसी, अरबी, तुर्की, मंगोल, पोर्तुगीज, फ्रेंच, स्पॅनिश भाषांमधील शब्द आढळतात. इंग्रजी शब्दांबद्दल तर बोलायलाच नको...
भाषेतील भर आणि प्रदूषण
भाषा ही नदीसारखी असते. नदी उगमापासून तुटत नसते. पण तिला ओढे, छोट्या नद्या येऊन मिळत राहतात आणि ती पुढे वाहत राहते. पण नदी प्रदूषित होऊ नये म्हणून जागरूक राहणेही आवश्यक असते. नाहीतर काय होते, ते नुकसान आधुनिक मराठी भाषा अनुभवत आहे. भाषा ही प्रदूषित होऊ नये म्हणून जागरूक असले पाहिजे...
मुरुडकरांची भाषा !
माझ्या मुरुड गावच्या गावकऱ्यांची भाषा अगदी रोखठोक ! ते बोलताना नाकाचा वापर करतात की काय, असे ऐकणाऱ्याला वाटेल. त्यांनी बरेचसे शब्द मोडून घेऊन मुखात बसवलेले आहेत. म्हणजे घ्यायचं, द्यायचं, करायचं असे म्हणायचे असेल तर ते घैचं, दैचं, कराचं असे बोलतात...
कुशल अभिनेत्री स्मिता पाटील
स्मिता पाटील या अभिनेत्रीने तिच्या केवळ एकतीस वर्षांच्या आयुष्यातील, दहा वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत पार फ्रान्स या देशाच्या नभांगणापर्यंत तिच्या उत्तुंग अभिनयाचे चांदणे नेले, हे लोकविलक्षण कर्तृत्व होय. तिची भूमिका समजून घेण्याची कुशाग्रता आणि भूमिकेची अभिनय कुशल बुद्धिवान मांडणी ही बलस्थाने होती...
बाबा आमटे-रमेश गुप्ता – कवितांचे शब्दांकन
दत्तप्रसाद दाभोलकर यांनी ‘अन्वयाची अक्षरलिपी’ या कवितासंग्रहाचे परीक्षण करत असताना एक किस्सा कथन केला आहे. बाबा आमटे यांच्या ‘माती जागवील त्याला मत’ या गाजलेल्या कवितासंग्रहावर ‘शब्दांकन- रमेश गुप्ता’ असे आहे. आता, कवितांचे शब्दांकन म्हणजे काय? मग ही कवितानिर्मितीची प्रक्रिया कोणती? कविता बाबा आमटे यांची की रमेश गुप्ता यांची?...
कोल्हापूरची शतमानपत्रे : शतकभराचा इतिहास
जी.पी. माळी यांचे ‘कोल्हापूरची शतपत्रे’ हे पुस्तक म्हणजे एक ऐतिहासिक ठेवा आहे. गेल्या शतकभरातील 101 मानपत्रे ‘जशी होती तशी’ दिल्याने त्या त्या काळची शब्दकळ व मानपत्रांतील बदलत गेलेली भाषा लक्षात येते. ती मानपत्रे तो सगळा काळ वाचकापुढे उभा करतील. अभ्यासकांना तो फारच मोठा फायदा आहे...
लोकनेता वसंतदादा (Vasantdada Patil – Man of the Masses)
वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते अल्पशिक्षित होते, परंतु मुलींना मोफत शालेय शिक्षण, मुक्त विद्यापीठाची स्थापना, विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी / वैद्यकशास्त्राची महाविद्यालये काढण्याचा निर्णय यांमुळे शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. ‘मायबाप सरकार’ हा शब्दप्रयोग दादांना समोर ठेवूनच प्रचारात आला की काय असे वाटावे, अशी दादांची कार्यशैली असे...
रमेश जोशी – वृक्षसावलीने दिला जीवनाला आयाम !
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धामणगाव गढी येथे सर्व लोक आकर्षित होतात ते तेथील रमेश जोशी यांच्या रोपवाटिकेबाबत ऐकून. धामणगाव गढी येथील साधा अल्पशिक्षित मोटर मेकॅनिक ते जोशी रोपवाटिकेचे संचालक रमेश जोशी या भन्नाट व्यक्तिमत्त्वाची ती किमया आहे. त्यांनी लाख-दीड लाख रोपट्यांची वाटिका तयार केली आहे ! त्यांच्या रोपवाटिकेमध्ये क्वचितच एखादे असे रोपटे असेल जे तुम्हाला मिळणार नाही...