विनया खडपेकर
भाषेतील भर आणि प्रदूषण
भाषा ही नदीसारखी असते. नदी उगमापासून तुटत नसते. पण तिला ओढे, छोट्या नद्या येऊन मिळत राहतात आणि ती पुढे वाहत राहते. पण नदी प्रदूषित होऊ नये म्हणून जागरूक राहणेही आवश्यक असते. नाहीतर काय होते, ते नुकसान आधुनिक मराठी भाषा अनुभवत आहे. भाषा ही प्रदूषित होऊ नये म्हणून जागरूक असले पाहिजे...
सरोजिनी वैद्य : संशोधनाची नवी वाट
सरोजिनी वैद्य या लेखक व समीक्षक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. एकोणिसाव्या शतकात जेव्हा संशोधन सामग्री अपुरी होती, त्या काळात संशोधनाच्या नव्या वाटा धुंडाळून त्यांनी भोवती वलय नसलेल्या व्यक्तींवर लिहून त्यांचे कार्य प्रकाशात आणले. त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक विचारांची घुसळण आत्मीयतेने शब्दबद्ध केली. ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर यांनी सरोजिनी यांच्या साहित्यिक कारकीर्दीचा आढावा या लेखात घेतला आहे...
ऋणानुबंध मालतीबाई बेडेकर यांचा (Maltibai Bedekar)
मालतीबाई बेडेकर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1905 आणि निधन 6 मे 2001. पंच्याण्णव वर्षांचे आयुष्य. त्यांची लेखणी कथा, कादंबरी, संशोधन अशा सर्व लेखन प्रकारांत...
निसर्गकवी बालकवी (Balkavi)
बालकवी यांची शंभरावी पुण्यतिथी झाली. बालकवींचा मृत्यू तिशीच्या आत झाला. बालकवी यांचे अपघाती निधन 17 एप्रिल 1918 या दिवशी झाले. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या...
श्यामची आई
महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांवर संस्कार करणारे पुस्तक ‘श्यामची आई’! त्या पुस्तकाबद्दल लिहिताना पुस्तकाचे लेखक साने गुरुजी यांचे उद्गार प्रथम आठवतात. पुस्तक प्रकाशित होत असताना त्यांनी...