Tag: पंजाब
मनमाड आणि गुप्तसर साहिब गुरुद्वारा
महाराष्ट्रातील नांदेड खालोखाल मनमाडमधील गुरुद्वाराला अखिल शीख समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे स्थान आहे. ते गुरुद्वाराला प्रेरणा आणि प्रार्थना स्थळ म्हणून फार मानतात. गुरु गोविंद सिंह नांदेड येथे का आले असावेत याबाबत दोन मतप्रवाह आढळून येतात. एक म्हणजे, महाराष्ट्रातील संत नामदेव यांचे पंजाबमधील महत्कार्य आणि त्यांना तेथे, पंजाब प्रांतात मिळालेला ‘संत शिरोमणी’ असा दर्जा. यांमुळे गुरू गोविंद सिंह संत नामदेवांच्या मूळ स्थानी, नांदेडमध्ये आध्यात्मिक किंवा धार्मिक कारणामुळे आले असावेत असे मानले जाते...
दलिप सिंघ सौन्द – आशियाई वंशाचे पहिले अमेरिकन सांसद
कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या तेव्हा त्या मूळच्या भारतीय वंशाच्या महिला म्हणून भारतात सर्वत्र कौतुक दाटून आले होते. अमेरिकेतील पहिले अ - अमेरिकन सिनेटर दलिप सिंग सौन्द हे होते ही नोंद येथे महत्त्वाची ठरेल...
घुमान – नामदेवांचे तीर्थक्षेत्र (Saint Namdev in Punjab)
पंजाबमधील घुमान ही संतशिरोमणी नामदेव महाराजांची कर्मभूमी. नामदेवांनी घुमान हे गाव वसवले. तेथे तब्बल चोवीस वर्षे तपश्चर्या केली. तो परिसर त्यांच्या वास्तव्याने आणि तपाचरणाने पावन झाला. घुमान हे गाव संत नामदेवांचे गाव म्हणून ओळखले जाते...
निळोबारायांची अभंगार्तता
ज्ञानदेवांनी जी भक्ती कल्पना मांडली, संत नामदेवांनी ज्या भक्तीचा प्रसार पंढरी ते पंजाबपर्यंत केला, तुकोबांनी ज्या भक्तीचे गोडवे गायले; निळोबांनी त्याच भक्तीचा प्रसार पुढे, दोन शतकांनंतर केला. देव आणि भक्त एक होऊनही भक्तीच्या सुखासाठी वेगवेगळे राहतात ही अद्वैतातील भक्तीची त्यांची कल्पना. त्या भक्तीमुळे आत्मज्ञान प्राप्त होते असा साऱ्या संतांचा अनुभव आहे...
माझे जीवन गाणे (My Life Story- Principal Vishwas Patil)
माझा जन्म एका शेतकरी परिवारात झाला. माझे वडील इयत्ता चौथीपर्यंत शिकलेले. आईने तर शाळेचा उंबरठाही ओलांडलेला नव्हता. तरीही माझे बालपण एका भावसमृद्ध वातावरणात गेले. मला माझे बालपणीचे चित्र आठवते... लहानगा मी बाबांचे बोट मुठीत धरून चालत आहे. रस्त्याने त्यांना अक्षरश: दुतर्फा लोक अभिवादन करत आहेत. ते कधी माझी मूठ उंचावल्यासारखे करत, तर कधी डावा हात उंचावून, कधी भुवया उंचावून तर कधी स्मिताने अभिवादन स्वीकारत आहेत. कधी थांबून चौकशी करत आहेत. कधी काळजी व्यक्त करत आहेत. कधी मदतीचा हात पुढे करत आहेत ...
आर्केओगिरी : माझा पुरातत्त्वाचा शोध (Archaeogiri – My Passion)
‘आर्केओगिरी’ या संकल्पनेचे पहिले बीज माझ्या मनात नेस्पेरेन्नूब या, तीस शतकांपूर्वी मरण पावलेल्या इजिप्शियन धर्मगुरूने रोवले...