Home Authors Posts by प्राचार्य विश्वास पाटील

प्राचार्य विश्वास पाटील

1 POSTS 0 COMMENTS
विश्वास पाटील हे हिंदी भाषेचे निवृत्त प्राध्यापक. शिक्षण- एम ए पीएच डी (पुणे विद्यापीठ). जन्म 11 मार्च 1952 रोजी नंदुरबार येथे झाला. त्यांचे इतिहास व संस्कृती हे आवडीचे विषय आहेत. त्यांनी गांधी जीवन व चरित्र या विषयात हिंदी व मराठी भाषांमध्ये विविध तऱ्हेचे लेखन केले आहे. त्यांनी नारायणभाई माधवभाई देसाई यांच्याबरोबर निरनिराळ्या कारणाने बराच काळ व्यतीत केला आहे. त्यांनी नंदुरबारचे हुतात्मा वीर शिरीषकुमार यांच्यावरील चित्रपटाची कथाही लिहिलेली आहे. त्यांनी मराठीत ललित लेखन व एकांकिका लिहिल्या आहेत. ते त्यांच्याशी संबंधित विषयांवर आकाशवाणी व दूरदर्शन या व्यासपीठांवर बोलत असतात.

माझे जीवन गाणे (My Life Story- Principal Vishwas Patil)

माझा जन्म एका शेतकरी परिवारात झाला. माझे वडील इयत्ता चौथीपर्यंत शिकलेले. आईने तर शाळेचा उंबरठाही ओलांडलेला नव्हता. तरीही माझे बालपण एका भावसमृद्ध वातावरणात गेले. मला माझे बालपणीचे चित्र आठवते...