नयन बारहाते यांचे व्यक्तिमत्त्व एकच एक उपाधी लावून वर्णन करणे कठीण आहे. नयन हे कमर्शियल आर्ट व पत्रकारिता या दोन्ही विषयांतील पदवीधर. त्यांचा संचार त्यांच्यात दडलेला चित्रकार, पत्रकार, मुखपृष्ठकार, कवी, संपादक आणि ‘फिलॉसॉफर’ अशा सर्व पातळ्यांवर लीलया होत असतो.