Home Authors Posts by ज्योती निसळ

ज्योती निसळ

2 POSTS 0 COMMENTS
ज्योती निसळ या लेखिका आणि अभिनेत्री आहेत. त्यांनी व्यावसायिक आणि झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटके, दूरदर्शनवरील मालिका, मराठी व हिंदी चित्रपट यांत वैविध्यपूर्ण दर्जेदार भूमिका केल्या आहेत. त्याशिवाय त्यांनी कबड्डी आणि खो-खो या खेळांत राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी नाट्यपरीक्षक म्हणून महाराष्ट्रभर विविध स्पर्धांना हजेरी लावली आहे. त्या मुक्त पत्रकार होत्या. त्यांनी महत्त्वाच्या दिवाळी अंकांत लेखन केले आहे. तसेच, त्यांची चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. (C/o डॉ. भा.वि. निसळ, 536, कमलसागर सोसायटी, भांडुप (पूर्व) मुंबई 400042)

अचलपूर – आधुनिक नाट्यपंढरी (Achalpur – The origin of Marathi stage)

अचलपूरला समृद्ध नाट्यपरंपरा लाभली आहे. विदर्भातील कालिदास आणि भवभूतींसारख्या नाट्य विभूतींनी नाट्यक्षेत्रात अजरामर कार्य केल्यानंतर तेथे आधुनिक रंगभूमी रुजली. अचलपुरातील बहुतेक नाट्यगृहे ही नाटके सादर करणाऱ्या मंडळांची स्वतःची आहेत. विशेष म्हणजे अचलपूरच्या जुन्या संस्था रंगमंचाची पूजा करताना नाटकांतील स्त्रीपात्रांचीही पूजा करत. कालौघात ती नाट्यगृहे नाहीशी झाली, पण नाट्यगृहांच्या समोरील मंदिरे जोरात चालू आहेत…

वीतभर कपडा टीचभर पोट – वास्तव, झाडीपट्टी रंगभूमीचे ! (Experiences of Zadipatti stage by...

‘झाडीपट्टी रंगभूमी’ नावाची एक अनोखी रंगभूमी आहे असे ऐकले होते- वाचलेही होते. त्यामुळे उत्सुकता होती, की ती रंगभूमी कशी आहे ते बघावे. कारण प्रायोगिक रंगभूमी, हौशी रंगभूमी, समांतर रंगभूमी, बाल रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी हे प्रकार मला माहीत होते.