गडचिरोली
Tag: गडचिरोली
पालडोह शाळा, वर्षाचे तीनशेपासष्ट दिवस ! (Paldoh School, 365 days a year!)
‘पालडोह’ हे चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील घाटवळणावरचे गाव… ते गाव शेतीचे वाद, कौटुंबिक भांडणतंटे, भुरट्या चोऱ्या, अंधश्रद्धा, बालविवाह अशा कारणांनी तालुक्यात बदप्रसिद्ध होते. राजेंद्र परतेकी यांनी गावच्या या शिक्षणविषयक उदासीनतेवर मात करण्याचे ठरवले. राजेंद्र यांनी विद्यार्थी, पालक, गाव, शाळा यांचा मेळ परस्परांशी घालण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी गावतरुणांची क्रिकेट, व्हॉलिबॉल, खो-खो टीम गावाशेजारच्या जत्रेमध्ये जमवली, त्या संघाकडून खेळणे, टीम जिंकण्यासाठी निकराची लढाई करणे अशा गोष्टी गावच्या मुला-तरुणांमध्ये सुरू केल्या...
कथा ग्लासफर्डपेठा गावाची (Story of Glasfurdhapeta)
भारत देशात अशी काही गावे आहेत जी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावावरून ओळखली जातात. त्या गावांशी निगडित कथा तितक्याच सुरस व रंजक आहेत. ‘ग्लासफर्ड’ हा मूळ स्कॉटिश शब्द आहे. त्याचा अर्थ ‘ग्रीन फॉरेस्ट’ असा होतो. ते गाव प्राणहिता नदीच्या तीरावरील घनदाट जंगलात आहे. इंग्रजी सत्तेच्या काळात ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने हे गाव वसवले त्याच्या नावावरून त्या गावास नवे नाव मिळाले. त्या अधिकाऱ्याचे पूर्ण नाव होते - चार्ल्स लॅमन्ट रॉबर्टसन ग्लासफर्ड. त्याने नागपूरजवळ काही शिलावर्तुळे शोधून काढल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे ग्लासफर्डचे नाव विदर्भातील बृहदश्म किंवा महापाषाणयुगीन संस्कृती यांच्या आद्य अभ्यासकांमध्ये घेतले जाते...
कथा, सामा वेलादीच्या पराक्रमाची ! (The story of Adiwasi youth who got British Albert...
राज्यातील अतिमागास, दुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात ‘जॉर्जपेठा’ व ‘ग्लासफर्डपेठा’ नावाची दोन गावे आहेत. ‘जॉर्जपेठा’ हे नाव ब्रिटिश वन अधिकारी ह्यू शॉ जॉर्ज यांच्या नावावरून पडले आहे. ‘जॉर्ज’ यांच्या जीवनातील ही सत्यकथा रोमहर्षक आणि तितकीच चित्तथरारक आहे. ती 1924 च्या सुमारास, म्हणजे शंभर वर्षांपूर्वी घडली. ती सत्यकथा गडचिरोली (विभाजनपूर्व चांदा) जिल्ह्यातील अतिदुर्गम, घनदाट जंगलातील गर्द, निबिड अरण्यात अशा प्रकारे गुडूप झाली की तिचा पुढे मागमूसही उरला नाही ...
कोरोनामधून शिकलो ते स्मशानवैराग्यच ठरेल? (Corona lessons neglected by the rulers)
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने 2 सप्टेंबर 2021ला असा निर्णय घेतला, की यापुढे वैद्यकीय महाविद्यालये ही पीपीपी - ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ मार्गाने सुरू करण्यात येतील ! त्याला उपरोधाने ‘पब्लिक मनी फॉर प्रायव्हेट प्रॉफिट’ असे म्हटले जाते. ते धोरण स्पेशालिस्ट आणि आयसीयूमधील तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यास उपयोगी ठरेल अशी धारणा सरकारची आहे. भारतातील सर्व प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष आरोग्यसेवेकडे ‘बाजारात खरेदी-विक्रीला मांडलेली वस्तू’ असे बघत आहेत...
झाडीपट्टी रंगभूमी अजूनही चैतन्यमय (Vidharbha’s Folk Theatre Still Lively)
झाडीपट्टी रंगभूमीला एकशेबत्तीस वर्षें पूर्ण झाली आहेत. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यांची ‘झाडीपट्टी’ म्हणून ओळख आहे. त्या प्रदेशांत हिरव्याकंच झाडीने, जंगलांनी व्याप्त निसर्गाची लयलूट आहे.
शिक्षक विनीत पद्मावारचे आदिवासी स्वप्न (Teacher Changes Face of Adivasi Village)
विनीत पद्मावार गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कोयनगुडा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेवर मुख्याध्यापक आहेत. भामरागड हा आदिवासीबहुल तालुका. तेथील आदिवासीपाड्यांत माडिया ही बोलीभाषा बोलली जाते. मुलांना प्रमाणभाषा समजत नाही. त्यामुळे शिक्षणात मुख्य अडसर भाषेचा येतो.
चुकते कई बातल आयो!
माडिया मुलांसाठी इंग्रजी शाळा
प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्पा’ची आगळीवेगळी एक शाळा नेलगुंडाला आहे. नेलगुंडा हे छोटेसे आदिवासी खेडे गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसाच्या पुढे सत्तावीस...
विद्यार्थ्यांसाठी जीवतोड मेहनत
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात जिल्हा परिषदेची अशी एक शिक्षिका आहे जी तेथील माडिया गोंडांच्या गरीब मुलांना जीव तोडून शिकवते. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ...
गडचिरोलीत सकारात्मकतेचा उदय
उदयच्या कामाची सुरूवात झाली ती गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून. मात्र उदयची धडपड ढोबळ प्रयत्नांच्या पुढे जात राहिली. तो त्याच्या मनाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना सामोरा जात...
कोरची अपंग संघटनेची गगनभेदी भरारी!
‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था फेब्रुवारी १९८४ पासून मागस भागात कार्यरत आहे. संस्थेच्या कामाचे क्षेत्र गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा या तीन जिल्ह्यांत आहे. संस्था...