अमरावती
Tag: अमरावती
अनाथांचा बाप – शंकरबाबा पापळकर (Achalpur’s Papalkar adopted hundred children!)
गाडगेबाबांनानंतरच्या पिढ्यांनी पाहिलेले नाही; परंतु गाडगेबाबांच्या समाजसेवेचा आदर्श घेतलेला, स्वत:च्या ऐषआरामाच्या जीवनावर पाणी सोडून अनाथांसाठी त्यांचे आयुष्य दान देणारा, मातृहृदयी, कृतिशील बाप बघायचा असेल तर तो शंकरबाबांमध्येच बघता येतो ! अचलपूरचे शंकरबाबा पापळकर ! त्यांची वैचारिक जातकुळी बुद्धाच्या तत्त्वज्ञानाशी जमते, म्हणून ते रोज बुद्धाचे स्मरण करतात.
तुकडोजी महाराजांची ग्रामगीता (Saint Tukdoji’s Gramgeeta)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला आणि महानिर्वाण 11 ऑक्टोबर 1968 रोजी झाले. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा महाराजांच्या जीवनातील काळ होता.
शेषराव घाटगे – पत्रे, देशभक्ताची व प्रेमवीराची (Patriot Sheshrao Ghatage)
शेषराव घाटगे यांच्या आयुष्याची चित्तरकथा मोठी रोमांचकारक आहे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करूनही त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. त्यांच्या चरित्रसाधनांवर 2011 ते 2012 या शताब्दी वर्षात प्रकाश पडला! त्यांचा चरित्रग्रंथ एकशेदोन वर्षांनी (मरणोत्तर एकोणसत्तर वर्षांनी) प्रसिद्ध झाला...
एका गाईच्या मदतीने तीस एकर शेती- सुभाष पाळेकर यांची ‘झिरो बजेट’ शेती
मुख्य पिकांचा उत्पादन खर्च आंतरपिकांच्या उत्पन्नातून भरून काढणे आणि मुख्य पीक बोनस म्हणून घेणे म्हणजे ‘झिरो बजेट’ अशी सुभाष पाळेकर यांची सहज-सोपी संकल्पना आहे....
राम (फड) नावाचा मेळघाटातील देवदूत
कुपोषण आणि बालमृत्यू यांच्या मेळघाटातून येणाऱ्या बातम्या 1995-96 च्या सुमारास समाजमन ढवळून काढत होत्या. त्या संकटावर मात करण्यासाठी काम उभे करण्याचे पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक...
बंड्या साने- पौर्णिमा उपाध्याय – मेळघाटातील लढवय्या दांपत्य
पौर्णिमा ती थेट मायानगरी, मुंबईतील. तिचे घर मुंबई शेजारच्या डोंबिवलीतील. वडिलांचे वजन-मापे विकण्याचे दुकान. घरी माफक सुबत्ता. तिने लग्न केले मेळघाटच्या बंड्या साने यांच्याशी....
मनोहर तल्हार यांच्यामधील माणूस शोधताना
मनोहर तल्हार यांची ‘माणूस’ ही कादंबरी नागपूर विद्यापीठात बी.ए.च्या पहिल्या वर्षाला लागली आणि ती अश्लील आहे अशी ओरड होताच लागलीच अभ्यासक्रमातून काढूनही टाकली गेली....
उत्तराच्या शोधात प्रश्नचिन्ह शाळा!
मतिन भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात पाटी-पुस्तक दिले आहे. त्या मुलांनी शिकारीची हत्यारे आणि फासे टाकून हातात पेन पेन्सिल धरली आहेत. मतिनकडे तशी...
गाडगेबाबांच्या… बालपणीच्या पाऊलखुणा शोधताना
अमरावती जिल्ह्यातील ‘शेंडगाव’ हे गाडगेबाबांचे जन्मगाव. गाडगेबाबांनी बालवयातील 1876 ते 1884 पर्यंतचा काळ तेथे व्यतीत केला. अमरावती ते शेंडगाव हे अंतर सत्तर किलोमीटरचे. डेबूच्या पाऊलखुणा इतरत्र दिसतात का ते शोधण्यासाठी गावात निघालो असता बाहेर एक तरूण भेटला. तो जानोरकर परिवारातील होता. त्याला गाडगेबाबांविषयी माहिती त्रोटक होती. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. तो शेती करतो. ज्या गाडगेबाबांनी त्यांचे आयुष्य शिक्षणाच्या प्रचार-प्रसारासाठी खर्ची घातले त्या दस्तुरखुद्द गाडगेबाबांच्या गावात आणि परिवारात शिक्षणाबद्दल ही अनास्था...
स्वप्नील गावंडे देतो आहे अंधांना प्रकाशाची दिशा
स्वप्नील गावंडे हा अमरावती जिल्ह्यातील तरुण त्याच्या वयाच्या तेराव्या वर्षापासून नेत्रदानासंबंधी जनजागृतीच्या कामाला लागला आहे. त्याने ‘दिशा ग्रूप’च्या माध्यमातून दहा वर्षांत दहा लाख लोकांपर्यंत...