Home Authors Posts by प्रदीप पाटील

प्रदीप पाटील

1 POSTS 0 COMMENTS
प्रदीप पाटील हे ‘मिडिया वॉच पब्लिकेशन’चे प्रबंध संपादक आहेत. त्यांनी दैनिक 'पुण्य नगरी’मध्ये 2016 साली ‘वेगळ्या वाटेवरची माणसं’या विषयावर स्तंभलेखन केले आहे. पाटील अमरावतीचे राहणारे आहेत. त्यांनी बीए व मास कम्युनिकेशन डिप्लोमा असे शिक्षण घेतले आहे. पाटील यांचा सहभाग ‘मराठा सेवा संघ' आणि 'आम्ही सारे फाऊंडेशन’ या संस्थांमध्ये होता. लेखकाचा दूरध्वनी 9860831776
_Gadgebabnchya_Paulkhuna_1.jpg

गाडगेबाबांच्या… बालपणीच्या पाऊलखुणा शोधताना

अमरावती जिल्ह्यातील ‘शेंडगाव’ हे गाडगेबाबांचे जन्मगाव. गाडगेबाबांनी बालवयातील 1876  ते 1884 पर्यंतचा काळ तेथे व्यतीत केला. अमरावती ते शेंडगाव हे अंतर सत्तर किलोमीटरचे. डेबूच्या पाऊलखुणा इतरत्र दिसतात का ते शोधण्यासाठी गावात निघालो असता बाहेर एक तरूण भेटला. तो जानोरकर परिवारातील होता. त्याला गाडगेबाबांविषयी माहिती त्रोटक होती. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. तो शेती करतो. ज्या गाडगेबाबांनी त्यांचे आयुष्य शिक्षणाच्या प्रचार-प्रसारासाठी खर्ची घातले त्या दस्तुरखुद्द गाडगेबाबांच्या गावात आणि परिवारात शिक्षणाबद्दल ही अनास्था...