Home Authors Posts by नरेंद्र लांजेवार

नरेंद्र लांजेवार

1 POSTS 0 COMMENTS
नरेंद्र लांजेवार हे तीस वर्षांपासून मुक्त पत्रकार म्हणून लेखन करतात. त्यांनी महाराष्ट्रातील नामवंत दैनिकांमध्ये स्तंभ लेखन केले आहे. त्यांची एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा, वाचू आनंदे, एकाच नाण्याची तिसरी बाजू, सल उकल, प्रश्न आणि प्रश्नचिन्ह?, शिक्षणावर बोलू काही.., शेतकरी आत्महत्या: चिंता आणि चिंतन, वाचन संस्कृती: वास्तव आणि अपेक्षा अशी पुस्तके प्रकाशित आहेत. ते बुलडाणा येथील भारत विद्यालयात ग्रंथपाल असून सध्या ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा‘चे सहसंपादक आहेत. त्यांनी पालक-बालक समुपदेशक म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी वाचनसंस्कृती वृद्धींगत करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोगही केले आहेत.9422180451

अनाथांचा बाप – शंकरबाबा पापळकर (Achalpur’s Papalkar adopted hundred children!)

गाडगेबाबांनानंतरच्या पिढ्यांनी पाहिलेले नाही; परंतु गाडगेबाबांच्या समाजसेवेचा आदर्श घेतलेला, स्वत:च्या ऐषआरामाच्या जीवनावर पाणी सोडून अनाथांसाठी त्यांचे आयुष्य दान देणारा, मातृहृदयी, कृतिशील बाप बघायचा असेल तर तो शंकरबाबांमध्येच बघता येतो ! अचलपूरचे शंकरबाबा पापळकर ! त्यांची वैचारिक जातकुळी बुद्धाच्या तत्त्वज्ञानाशी जमते, म्हणून ते रोज बुद्धाचे स्मरण करतात.