Tag: अध्यात्म
स्मिता पाटील – मूड आणि स्विंग्स !
स्मिता पाटील हिला केवळ एकतीस वर्षांचे आयुष्य लाभले होते; त्यात तिची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द जेमतेम अकरा वर्षांची. परंतु त्या काळात तिने निर्माण केलेले अभिनयविश्व व त्यापलीकडे जाऊन तयार केलेले माणसांचे भावबंध विलक्षण आहेत. तिचे व्यक्तिमत्त्व तिच्या भावविश्वात आलेल्या व्यक्तींच्या अंतरंगात मिसळून जात असे, त्या व्यक्तीच्याही नकळत...
श्रीमद्भागवत – परमसत्याच्या अनुभूतीसाठी !
‘श्रीमद्भागवत महापुराण’ ही रचना महर्षी वेदव्यास यांची आहे. अन्न-वस्त्र-निवारा या लौकिक गरजांपलीकडे मानवी जीवनाचे उद्दिष्ट आहे, ते म्हणजे परमसत्याचा शोध. त्याचा एक मार्ग म्हणजे विष्णुदेवतेच्या लीलांचे वर्णन ऐकणे. तेच भागवत ग्रंथाचे सार आहे. त्यात भक्ती, ज्ञान, वैराग्य व ध्यानयोग यांचे विवेचन केले गेले आहे. त्यामुळे त्यास भक्तिशास्त्राचा ग्रंथ असेही म्हणतात...
आधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य
पंढरीची वारी ही भागवत धर्माची जगातील एकमेवाद्वितीय परंपरा. ती आठशे वर्षांपासून नुसती टिकूनच राहिलेली नाही तर वृद्धिंगत होत आहे. वारी सर्वसमावेशक असल्याने तिचे औचित्य आधुनिक विज्ञानयुगातही आहे. कर्म, ज्ञान, भक्ती यांचा यथायोग्य मेळ आणि व्यवस्थापन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पंढरीची वारी. परम संगणककार विजय भटकर यांनी विज्ञान व आध्यात्म यांचा पायाच मुळात श्रद्धा आहे, ती अंध असू शकत नाही असे सांगून, त्यांची परस्पर पूरकता लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे...
जगाचा आध्यात्मिक पुनर्जन्म आवश्यक (Spiritual Rebirth of the World – Need of the Hour)
अन्यायाविरूद्ध न्याय मिळवण्यासाठी युद्ध हा पर्याय नाही. माणुसकी किंवा मानवतावाद आणि राजकारण यांचा पराजय म्हणजे युद्ध. या जगात प्रत्येकाच्या जीवनाला एक अर्थ आहे. तो परस्पर प्रेम, मैत्री व समंजसपणा यांमुळे प्राप्त होतो. अशी नैतिक मूल्ये रुजवण्यास जगाचा आध्यात्मिक पुनर्जन्म आवश्यक आहे…
भारूड (Bharud)
भारूड या लोककलेचे ग्रामीण महाराष्ट्रात तमाशाखालोखाल आकर्षण आहे. भारूडाचे आयोजन स्वतंत्रपणे वार्षिक ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण, यात्रा आणि तशा इतर उत्सवांमध्ये केले जाते. त्या कलेत लोकमानस जिंकण्याची ताकद आहे, तेवढी ती रंगतदारही आहे. प्रबोधन हा त्या कलेचा गाभा आहे. भारूड नाट्य, वक्तृत्व आणि संगीत यांच्या मिलाफातून रंगत जाते. ते अध्यात्माच्या प्रसाराचे महत्त्वाचे माध्यम आहे. संत एकनाथ हे या कलाप्रकाराचे जनक मानले जातात...
मोक्ष –ज्ञानदेवतेशी एकतानता!
संगणकावर आंतरजाल म्हणजे इंटरनेट अवतरले ते सुमारे वीस वर्षांपूर्वी. मुंबईतील नेहरू सेंटरने त्याच सुमाराला त्या संबंधीचे एक प्रदर्शन भरवले होते. ती सारी दुनिया नवीच...
अध्यात्म आणि धर्म
(पुरूषोत्तम क-हाडे यांनी दिनकर गांगल यांच्या ‘अध्यात्म’ लेखावर घेतलेले आक्षेप व गांगल यांनी केलेले त्याचे निराकरण)
दिनकर गांगल यांचा अध्यात्म हा लेख वाचला. मी भगवद्गीता...
अध्यात्म
महात्मा गांधी यांच्या तोंडचे एक वाक्य मला फार मोह घालते. म्हणे, ते ब्रिटिशांना उद्देशून असे म्हणाले होते, की ‘तुम्ही कोण मला स्वातंत्र्य देणारे? मी...