Home Authors Posts by मिता मोहन शेणॉय

मिता मोहन शेणॉय

1 POSTS 0 COMMENTS
मिता मोहन शेणॉय यांचे शिक्षण एम कॉम, एलएल बी व तत्त्वज्ञान विषयात एम ए, पीएच डी असे उच्च श्रेणीत, विविध पारितोषिकांसह झाले. त्यांनी नोकरी सिंडिकेट बँकेत व्यवस्थापक पदी केली, परंतु अभ्यास तत्त्वज्ञान विषयाचा चालू ठेवला. त्यातच त्यांनी ग्रंथ रचना (आनंदतीर्थ तथा मध्वाचाऱ्य काँट्रिब्युशन टू फिलॉसॉफिकल थॉट अॅण्ड कल्चर) केली. त्या तत्त्वज्ञान विषयाशी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी संबंधित असून, जागतिक चर्चा-परिसंवादांत सहभागी होत असतात, त्या मुंबईत अंधेरीला राहतात.

श्रीमद्भागवत – परमसत्याच्या अनुभूतीसाठी !

‘श्रीमद्भागवत महापुराण’ ही रचना महर्षी वेदव्यास यांची आहे. अन्न-वस्त्र-निवारा या लौकिक गरजांपलीकडे मानवी जीवनाचे उद्दिष्ट आहे, ते म्हणजे परमसत्याचा शोध. त्याचा एक मार्ग म्हणजे विष्णुदेवतेच्या लीलांचे वर्णन ऐकणे. तेच भागवत ग्रंथाचे सार आहे. त्यात भक्ती, ज्ञान, वैराग्य व ध्यानयोग यांचे विवेचन केले गेले आहे. त्यामुळे त्यास भक्तिशास्त्राचा ग्रंथ असेही म्हणतात...