Tag: सद्भावनेचे व्यासपीठ
सद्भावना संमेलन
काळ दुर्गतीला सोकावलेला असताना आपल्यासारखी सुखासीन संवेदनाशील माणसे एकवटली त्यामधून सत्शक्तीची चळवळ उभी राहिली तर ! म्हणून हे सद्भावनेचे संमेलन. संमेलनातून सामाजिक-सांस्कृतिक जीवनावर प्रभाव टाकणारा काही कृतिकार्यक्रम आखला जावा अशी उमेद मनाशी आहे...
गच्चीवरील गप्पा – मी कोण आहे? वगैरे (Chat on the terrace)
मनाचे स्वास्थ्य वेगवेगळ्या वयोगटांत, वेगवेगळ्या प्रसंगांत कोणाच्या शब्दाने, वागण्याने, मनात चाललेल्या संघर्षामुळे किंवा कधी असे करायला नको होते या विचारांनी विस्कटून जाते.ते जितके लपवू तितके ते अवजड होत जाते. पण जर त्या विचारांना, भावनांना तोंड फुटले तर लक्षात येते, की ‘हे फक्त आपल्या बाबतीत नाही; सगळ्यांच्याच बाबतीत असे होते.’ माणूस जितके स्वतःबद्दल बोलतो तितके ते वैश्विक असते. माणूस हे जाणतो पण तसे मोकळेपणाने बोलत नाही. ही कोंडी सोडवण्यासाठी मनीषा सबनीस यांनी पुण्यात ‘गच्चीवरील गप्पा’ असा मंच सुरु केला आहे...
कचऱ्यातून समृद्धी (Prosperity from Waste)
नागरिक शहाणे होत नाहीत तोपर्यत प्लास्टिक पिशव्या तयार होतच राहणार आणि त्या कचऱ्यात जात राहणार. त्यामुळे या समस्येवर उपाय शोधून काढायचे ठरवले. पंधरा वर्षांपूर्वी ओला कचरा घरातच खतात रूपांतर करता येईल का असा प्रयत्न केला. मग फक्त प्लास्टिक विकले जाईल ही कल्पना. तो प्रयत्न खूप संशोधनानंतर सफल झाला आणि कचरा खाणारी बास्केट म्हणजेच किचन कंपोस्ट बास्केट जन्माला आली...
माझं प्राणिविश्व (My world of Animals)
माणूस ज्या प्राण्यांचा सांभाळ करतो, ज्या पद्धतीने त्यांच्यावर प्रेम करतो, त्याच्या कितीतरी अधिक पटीने ते प्राणी कोणत्याही बंधनांशिवाय माणसावर प्रेम करतात. माणसाच्या सद्भावाचा तो एक विशेष घटक आहे. कुत्रा हा प्राणी त्याच्या स्वतःपेक्षा कित्येक पटींनी त्याची काळजी घेणाऱ्यावर प्रेम करतो. मांजरा-कुत्र्यांच्या माणसाबरोबर असण्याने आपलेपणा, प्रेम, संवेदनशीलता, जिव्हाळा, काळजी या भावना जागृत होतात. पुण्यातील संस्कृत भाषेच्या अभ्यासक सरोजा भाटे यांचा त्यांच्या लहानपणापासून आत्तापर्यंत किती वेगवेगळ्या प्राण्यांशी संबध आला आणि ते त्यांच्या आयुष्यात कसे आपलेसे झाले याबद्दल लिहिलेला हा लेख...
फिटे अंधाराचे जाळे ! – मनोबाधेसाठी एकलव्य (Eklavya vanishes the web of depression !)
माणसांना मन मोकळे करण्याची इच्छा बऱ्याचदा असते, पण त्यांना त्यांचे म्हणणे नीट, शांतपणे ऐकून घेतले जाईल याची खात्री नसते. शिवाय, त्यांना त्यांनी कोणाला काही सांगितले तर ते ‘जज’ करतील, नावे ठेवतील अशी भीतीही वाटते. मी भावना व्यक्त करता न आल्याने कोंडमारा सहन करत जगणारी माणसे आजुबाजूला बघितली होती. त्यामुळे मला मानसिक आरोग्य हा विषय किती गंभीर आहे याची कल्पना होती. म्हणूनच, माझी इच्छा त्या विषयाशी संबंधित क्षेत्रात काम करण्याची होती...
नवा मानुष वाद
एकविसाव्या शतकाने लैंगिकतेच्या उधाणाचे, नातेसंबंधांच्या बाजारीकरणाचे आणि क्षणभंगुरतेचे वादळ आणले आहे, हे खरे आहे. परंतु ते पचवले जाईल आणि स्त्री-पुरुष व अन्य ह्यांनी परस्परांसोबत प्रेम, आदर व जिव्हाळा या भावनेने राहवे, शोषण व नियंत्रण ह्यांपासून मुक्त, निरामय जीवन जगावे ही आस कोणत्याही शतकात कायमच राहील. ‘नवा पुरुष’ समाज आणि साहित्य ह्यांच्या दृष्टिक्षेपात यावा व तो इतका व्यापक व्हावा की त्याचे ‘नवे’पण सार्वजनिक होऊन जावे...
एकविसाव्या शतकातील स्त्री-पुरुष संबंध
जागतिकीकरणाच्या तीन दशकांत झालेल्या अनेक बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा व मूलभूत बदल भारतीय समाजाच्या लैंगिकताविषयक धारणा व प्रत्यक्ष व्यवहार ह्यांत घडून आला आहे. ह्या परिवर्तनामुळे लैंगिकता व लैंगिक संबंध ह्यांचा पोतच नव्हे, तर आशयदेखील बदलला आहे. जागतिकीकरणानंतर भारतात अनेक पातळ्यांवर परिवर्तन झाले. त्यांपैकी काही बदल उत्पाती व प्रपाती स्वरूपाचे आहेत. त्यांतील मूलभूत स्वरूपाचा, पण सर्वात दुर्लक्षित बदल हा भारतीयांच्या लैंगिकताविषयक जाणिवा, धारणा व व्यवहार ह्यांत झाला आहे. त्या प्रक्रियेची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व त्याचे लक्षणीय परिणाम एकविसाव्या शतकात जाणवू लागले. ती प्रक्रिया अजून संपलेली नाही...
ट्रेंडिंग काय? – लिव्ह इन रिलेशनशिप ! (Is Live In Relationship good alter active...
भारतात लग्नपद्धत अजून टिकून आहे, पण प्रत्येकाच्या मनाच्या तळाशी पाहिले तर सत्य लक्षात येते. ते हे, की जोडप्यांमध्ये एकाची सहनशक्ती संपलेली आहे ! पती-पत्नींच्या नात्याचे नाविन्य टिकत नाही. लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज ही वैयक्तिक निवड आहे – प्रेम ही संकल्पना जुन्या काळापासून आहे. विवाहाचे रूपांतर प्रेमात आणि वैवाहिक संबंध म्हणजे दोन घरे एकत्र येणे हे लग्नात पूर्वी अपेक्षित असे. तरुणाईची मते बदलली आहेत- त्यांचा लग्नावर विश्वास राहिलेला नाही असे निरीक्षण आहे...
अनुश्री भिडे यांची हृदयाची भाषा ! (Anushree Bhide’s Language of Heart )
कोणत्याही कृतीपेक्षा त्यापाठीचा विचार, ती व्यक्ती नर आहे की नारायण (अथवा राक्षस) ते ठरवतो. गोष्टीतील श्रीमंत बाईसारखे अनेक लोक आजूबाजूला असतात. स्वतःसाठी लक्षावधी रुपयांची उधळण करणारे, पण दुसऱ्याला शंभर रुपये देतानाही हात मागे घेणारे. त्याचबरोबर, दुसऱ्याच्या वेदनेने दुःखी होणारे, स्वतः उपाशी राहून स्वत:चा घास भुकेल्या जीवांना देऊन तृप्त करणारे पुण्यात्मेही याच जगात दिसतात ! अशा ‘देवमाणसां’तील विठ्ठल-रखुमाईचा एक जोडा म्हणजे आनंद भिडे आणि अनुश्री भिडे...
घरकुल – समाजाच्या स्वायत्ततेचे लक्षण (Gharkul – An Autonomous Community !)
भारतात विशेषत: महाराष्ट्रात एक माणूस – एक संस्था अशी घट्ट परंपरा आहे; त्याच वेळी, संस्थाजीवन हे त्या त्या संस्थांमध्ये गुंतलेल्या ध्येयप्रवृत्त माणसांच्या पलीकडे बहरले पाहिजे असेही समाजाला वाटत असते, ‘काडी काडी वेचताना...’ हे अविनाश बर्वे यांचे पुस्तक वाचत असताना या दोन्ही समजुतींचा प्रत्यय येतो आणि विचाराला टोक येऊ शकते. डोंबिवलीजवळच्या खोणी येथील ‘घरकुल’ या त्यांच्या संस्थेची कहाणी ‘काडी काडी वेचताना...’ या पुस्तकात आहे...