Home Tags पुणे शहर

Tag: पुणे शहर

सामुदायिक आनंदाची नाशिकची दिवाळी

नाशिक हे मंदिरांचे गाव. तेथे असंख्य आळ्या, पेठा नि वाडे. तेथे ‘दिवाळी तोंडावर आली’ हा शब्दप्रयोग ऐकू येई तो भाजणीच्या खरपूस वासानं ! पूर्वी देवदिवाळी ही नाशिकची खरी खासीयत. श्रद्धा असणारे भाविक नाशिक या मंदिराच्या गावात दिवाळीत आले की हात जोडतात नि अप्रूपाने त्रिपुरी पौर्णिमेला एक पणती प्रवाहात सोडतातच...

इंदापूर – इतिहासातच राहिलेले शहर (Indapur Still Lives in History)

इंदापूर हे प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांचे जन्मगाव. ते ऐतिहासिक महत्त्व असलेले पुणे जिल्ह्यातील सुंदर शहर. बालुशाहीसारखा दिसणारा खाजा, तिखटामध्ये केवळ वासाने भूक लागल्याची जाणीव करून देणारी पुरी भाजी आणि उजनी धरणाच्या गोड्या पाण्यातील मासे हे या शहराचे आकर्षण...

शिवाजी विद्यापीठाच्या जलसंधारणाची यशस्वी कहाणी (Shivaji University’s Fruitful Water Conservation Efforts)

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला आठशेत्रेपन्न एकरांचा परिसर लाभला आहे. विद्यापीठाला पाणीपुवठा राजाराम तलाव आणि दोन विहिरी यांतून सुरुवातीला होई. त्यातील एका विहिरीचे पाणी प्रयोगशाळांसाठी आणि दुसऱ्या विहिरीचे पाणी उद्यानासाठी वापरले जात असे.

दया डोंगरे (Actress Daya Dongre)

दया डोंगरे यांचे नाव घेतले, की डोळ्यांसमोर येते ती ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ या चित्रपटातील सुनेच्या विरोधात गनिमी कावा करणारी, मुलाला मुठीत ठेवू पाहणारी अशी धूर्त, खमकी, कावेबाज सासू! त्यांचा करारी चेहरा,

पुण्याच्या पानपट्टीचा अनोखा ब्रँड (‘Traditional Eatable Paan’ In Modern Brand)

0
पुण्याच्यामाऊली पानपट्टीने पुणेकरांच्या जीवनात दोन-पाच वर्षांत वेगळेच स्थान मिळवले आहे. पौड रोडवरील पानाच्या टपरीपासून सुरू झालेला पानपट्टीचा तो ब्रँड आता पुण्यात पाच ठिकाणच्या दुकानात मिळतो. थुंकण्याची गरज नसलेले व पचनाला पोषक अशा

धडवईवाले यांचे इंदुरी मराठीकारण (Dhadwaiwale: Cause of Marathi Language In Madhya Pradesh)

अनिलकुमार धडवईवाले हे इंदूर शहरी जन्मापासून राहतात, पण मराठी भाषेचा सन्मान आणि संवर्धन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा व अभिमानाचा विषय आहे. त्यांनी ‘मराठी रक्षण समिती’ या संस्थेची स्थापना तेथे केली.

उषा तांबे – काँक्रीट व लालित्य यांचे कसदार साहित्यमिश्रण (Usha Tambe – Writer Who...

उषा तांबे या खरोखरच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती आहेत. प्राध्यापक, मुलाखतकार, समीक्षक, लेखक, इंग्रजी-मराठी - मराठी-इंग्रजी अशा दुहेरी अनुवादक आणि पुन्हा त्या दोन्ही भाषांत मूळलेखन करणाऱ्या, संपादक, साहित्य संघ पदाधिकारी,

रामदासांची रामोपासनेतून बलोपासना (Saint Ramdas & His Work)

समर्थ रामदास स्वामी हे संत पंचायतनातील ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्या मालिकेतील त्यांच्याच तोडीचे समर्थ रामदास स्वामी हे संत होत. रामदास हे रामाचे दास होते. ते समर्थ होते, म्हणजे ते बलवान, प्रभावी, शक्तिशाली, कर्तृत्ववान असे पुरुषार्थी होते.

अजिंठा लेणी – ऱ्हासाच्या दिशेने! (Fading Art of Ajintha Caves)

अजिंठा लेणी जगाला 1819 मध्ये माहीत झाली. ती खोदली गेली इसवी सनपूर्व दुसरे शतक ते इसवी सन चौथे शतक अशा सहाशे वर्षांत. म्हणजे त्यांचा शोध जवळ जवळ तेराशे वर्षांनी लागला! शोध लागूनही दोनशे वर्षें होऊन गेली आहेत.

रा.गो. भांडारकर – क्रियाशील सुधारक (Great Scholar R.G. Bhandarkar)

0
रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संस्कृतचे प्रकांड पंडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक आणि कर्ते धर्म व समाजसुधारक होते. त्यांचे मूळ आडनाव पत्की होते. त्यांचे पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते. म्हणून त्यांना ‘भांडारकर’ हे नाव पडले. त्यांचे आजोबा लाडो विठ्ठल हे शिरस्तेदार म्हणून इंग्रजीत पुढे आले. त्यांचे वडील महसूल खात्यात होते...