Home Search
भारतीय समाज - search results
If you're not happy with the results, please do another search
परदेशातील भारतीयांना एकत्र जोडणारा गणेशोत्सव
गणेश हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. विघ्नविनाशक, सिद्धिविनायक म्हणून त्याला मराठी मनात एक विशेष स्थान आहे. अमेरिकेत ‘एशियन एक्सक्लूजन अॅक्ट’ नावाचा कायदा १९२४ पर्यंत होता. त्यानुसार...
भारतीय लोकशाहीचे भवितव्य
- श्रीधर गांगल
भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही समजली जात असली तरी येथे लोकशाहीसाठी पूरक वातावरण नव्हते व नाही. अनेक भाषा, धर्म, जाती-पंथ...
अवकाश निर्मिती – समाजहिताची तळमळ
शाळेचा वर्ग चालू आहे. मुलांचे चेहरे उत्फुल्ल, त्यांच्या डोळ्यांत चमकतोय शिकण्याचा, कुतूहलशमनाचा, काहीतरी छान समजल्याचा आनंद. मुलं इतकी उत्साहात, ती जणू कोणतातरी खेळच खेळतायत!...
कृतिशील समाजचिंतक फादर फ्रान्सिस दिब्रिटो
फादर दिब्रिटो हे कॅथलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरू आहेत. त्यांचा जन्म वसईतील मराठी भाषिक ख्रिस्ती कुटुंबातील. विरार-आगाशी परिसरातील नंदाखाल हे त्यांचे जन्मगाव. मराठी साहित्यातील एक सिध्दहस्त...
देव/नवस/बकरे… आणि धाराशिवचा दर्गा
धाराशिवजवळ दहा-पंधरा किलोमीटर अंतरावर गड देवधरी नावाचे लहानसे खेडे आहे. डोंगराच्या खाली, अगदी दरीत असावे असे. त्या ठिकाणी नव्याने निर्माण झालेला दर्गा होता. आधी तेथे काही नव्हते, पण एका हुशार माणसाने त्याची वार्षिक जत्रा सुरू केली. त्याला गावच्या जत्रेचे स्वरूप मिळाले. म्हणायला तो देव कुणाचा तर मुस्लिमांचा आणि कंदुरी कोणाची तर वरिष्ठ हिंदूंची ! भारतीय समाज असा संमिश्र कौतुकाचा, भाविकतेने भारलेला आहे ! दर्ग्याला नवस बोलून कंदुरी करणारी हजारो कुटुंबे आहेत. त्यांच्या मनात, डोक्यात कोणताही धर्म नसतो. मजा अशी की देव, धर्म, इच्छा, नवस, बकरे, श्रद्धा यांचे अफलातून संयुग तयार झाले आहे...
एकविसाव्या शतकातील स्त्री-पुरुष संबंध
जागतिकीकरणाच्या तीन दशकांत झालेल्या अनेक बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा व मूलभूत बदल भारतीय समाजाच्या लैंगिकताविषयक धारणा व प्रत्यक्ष व्यवहार ह्यांत घडून आला आहे. ह्या परिवर्तनामुळे लैंगिकता व लैंगिक संबंध ह्यांचा पोतच नव्हे, तर आशयदेखील बदलला आहे. जागतिकीकरणानंतर भारतात अनेक पातळ्यांवर परिवर्तन झाले. त्यांपैकी काही बदल उत्पाती व प्रपाती स्वरूपाचे आहेत. त्यांतील मूलभूत स्वरूपाचा, पण सर्वात दुर्लक्षित बदल हा भारतीयांच्या लैंगिकताविषयक जाणिवा, धारणा व व्यवहार ह्यांत झाला आहे. त्या प्रक्रियेची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व त्याचे लक्षणीय परिणाम एकविसाव्या शतकात जाणवू लागले. ती प्रक्रिया अजून संपलेली नाही...
तत्त्ववेत्ता अ.भि. शहा (A. B. Shah – Reformist, Philosopher)
भारतीय समाजात सेक्युलर आणि मानवी मूल्यांची रुजवणूक करण्याची मोहीम साठ-सत्तरच्या दशकात जोर धरू लागली. मोजक्या व्यक्ती, संस्था आणि संघटना त्यासाठी कार्यरत होत्या. त्यांत प्रा.अ.भि. शहा यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांची ओळख इंडियन सेक्युलर सोसायटीचे संस्थापक किंवा सोसायटीमार्फत चालवल्या गेलेल्या नियतकालिकांचे लेखक-संपादक यांपुरती मर्यादित नाही.
गुरव म्हणजे शंकराचे पुजारी (Gurav – ShivShankar’s Speciel Priests)
गुरव जातीची निर्मिती भारतीय समाजात विशिष्ट परिस्थितीत झाली. गुरवकीचा व्यवसाय ग्रामदेवतांची पूजाअर्चा रोज व्हावी, नंदादीप लावला जावा,मंदिराची स्वच्छता राखली जावी या गरजेतून निर्माण झाला व त्यासाठी देण्याच्या सेवामूल्याची तरतूद बलुता पद्धतीत करण्यात आली.
भांगवाडी थिएटर (Bhangwadi Theater)
भांगवाडी ही मुंबईच्या काळबादेवी विभागातली एक वाडी. तेथे पूर्वी आसपास भांग विकणारी दुकाने होती म्हणून त्या भागाचे नाव भांगवाडी. अशा ठिकाणी गुजराती संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ 1874 मध्ये रोवली गेली. तेथे गुजराती नाटके 1968 पर्यंत होत होती. एका विशिष्ट पद्धतीची नाटके तेथे होत असत त्यामुळे त्या पद्धतीच्या नाटकांना भांगवाडी थिएटर म्हटले जाऊ लागले. अजूनही गुजराती नाटकांच्या सादरीकरणावर या पद्धतीचा काहीसा प्रभाव आहे. गुजराती रंगभूमीवरचे ज्येष्ठ दिग्दर्शक, नट आणि निर्माते मनोज शहा यांची भांगवाडी थिएटरविषयी एक विस्तृत मुलाखत तेजस्वी पाटील आणि तन्वी गुंडये यांनी घेतली आहे...
ॲनिमल चित्रपटाच्या निमित्ताने… (Movie Animal – A Turning Point ?)
ॲनिमल या चित्रपटाने हिंदी चित्रपटातील नायकाची प्रतिमा बदलली. सहृदय ही नायकाची प्रतिमा मागे सारून रासवट, नरपुंगव अशी प्रतिमा या सिनेमाने पुढे आणली आहे. ‘अल्फा-मेल’ अशी संज्ञा या प्रतिमेच्या निमित्ताने चर्चेत आली आहे. हा नायक सभ्य, सुसंस्कृत वागणुकीवर विश्वास ठेवत नाही की शासनव्यवस्थेची पत्रास बाळगत नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारा, संवेदनाहीन आणि केवळ हिंसेवर निष्ठा असलेला हा नायक समाजाच्या बदलत्या मूल्यभानाचे प्रतिक ठरत आहे का...