Home Search
सिनेमा - search results
If you're not happy with the results, please do another search
मैं वो झेलम नहीं हूँ (I am not that Zelum)
‘मोगरा फुलला’ या दालनाचे उद्दिष्ट आहे, जाणीव जागृती आणि संवेदनशीलतेचा जागर. आज भोवताली घडणाऱ्या अनेक घटनांकडे ‘हे असेच चालायचे’ किंवा ‘माझा काय संबंध’ असे म्हणत दुर्लक्ष केले जाते. हे वाईट घटनांच्या बाबतीतच घडते असे नाही तर अनेक चांगल्या, सकारात्मक घटनाही दुर्लक्षिल्या जातात. आजचा लेख ‘मैं वो झेलम नहीं हूँ | ‘ हेच घटीत अधोरेखीत करत आहे...
तू सिंगल आहेस?…
एकटेपणा ही संकल्पना ‘इंटरेस्टिंग’ आहे. एकट्या व्यक्तीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन, मानसिकता याचा क्वचित त्रास होऊ शकतो; तो एकटे असल्यामुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यात दुसरे कोणी लुडबुड करत आहे या गोष्टीचा. ‘तू सिंगल आहेस?’ या प्रश्नामागे असलेली उत्सुकता, कुतूहल, आकर्षण किंवा बोटचेपेपणाची वृत्ती, या साऱ्याला समोर ठेवून ऋता बावडेकर यांनी केलेला विचारांचा उहापोह...
गंधगान (Whispers on the Wind !)
‘मोगरा फुलला’ हे सदर सुरू करून दोन महिने झाले आहेत. दालन सुरू करताना संवेदना उजागर करणे आणि जाणीवसमृद्धी असे दोन उद्देश समोर ठेवले होते. पंचेंद्रियांना जे जाणवते ते शब्दांत पकडण्याचा प्रयत्न करणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. आजचा डॉ. मंजुषा देशपांडे यांचा ‘गंधगान’ हा लेख पंचेंद्रियांना जे जाणवते त्यापलिकडे जाऊन अबोध नेणिवेत रुतून बसलेल्या जाणिवांविषयी सांगत आहे. एक ज्ञानेंद्रिय विकल असेल तर इतर ज्ञानेंद्रिये अधिक सजग होतात आणि विकल ज्ञानेंद्रियामुळे आलेले न्यून दूर करण्याचा प्रयत्न करतात...
ॲनिमल चित्रपटाच्या निमित्ताने… (Movie Animal – A Turning Point ?)
ॲनिमल या चित्रपटाने हिंदी चित्रपटातील नायकाची प्रतिमा बदलली. सहृदय ही नायकाची प्रतिमा मागे सारून रासवट, नरपुंगव अशी प्रतिमा या सिनेमाने पुढे आणली आहे. ‘अल्फा-मेल’ अशी संज्ञा या प्रतिमेच्या निमित्ताने चर्चेत आली आहे. हा नायक सभ्य, सुसंस्कृत वागणुकीवर विश्वास ठेवत नाही की शासनव्यवस्थेची पत्रास बाळगत नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारा, संवेदनाहीन आणि केवळ हिंसेवर निष्ठा असलेला हा नायक समाजाच्या बदलत्या मूल्यभानाचे प्रतिक ठरत आहे का...
रुक्ष, ओसाड बरड : पालखीचा तेवढा विसावा ! (Barren Barad)
माणूस ज्या भूमीत, ज्या गावात-खेड्यात जन्मला त्या भूमीचा एकेक कण त्याला काशी, गया, मथुरा ह्यासम पवित्र-पावन असतो. तेथील काटेरी बोरीबाभळींना त्याच्या हृदयी पाईन-देवदारपेक्षाही वीतभर जास्तच उंची लाभलेली असते ! गाववेशीवरील म्हसोबा, वेताळ अन बिरोबा ही तर त्याची खरीखुरी ज्योतिर्लिंगे असतात ! बरड हे माझे गाव माझ्यासाठी प्रेमाचे तशा प्रकारे आहे. अन्यथा बरड गाव नावाप्रमाणे वैराण, उजाड आहे. ते सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडे आहे. ते गाव पुणे-पंढरपूर ह्या राज्य महामार्गावर फलटणपासून पूर्वेस अठरा किलोमीटर अंतरावर आहे...
कहीं ये वो तो नहीं ?… भाग दोन (Musings)
ज्या प्रेक्षकाकडे पूर्वानुभव असतो त्याच्यापर्यंत दृश्यात सूचित होणाऱ्या या संवेदना दृश्य आणि ध्वनीतून पोचतात. चंद्रमल्लिकेचा, चंदनाचा गंध, चाफ्याच्या रंगाच्या साडीचा रंग, जवळिकीतून होणारा अस्पष्ट स्पर्श, येणारा अंगगंध या संवेदना दृश्यातल्या संवादातून आणि दृश्याच्या रचनेतून प्रेक्षकापर्यंत पोचतात. त्यातून संयत शृंगार रसाची निष्पत्ती होते. विविध कलांचा अनुभव देणाऱ्या संवेदनांचा अनुभव देणारा सिनेमा. आज विश्वाच्या संवेदनांना व्यापून राहिलेल्या ‘सिनेमा’तले हे काही सुंदर क्षण. किती वेचावेत, किती मोजावेत...
कहीं ये वो तो नहीं?… (Musings)
हिंदी सिनेमाचे सगळ्यांच्याच मनात एक आढळ असे स्थान आहे. त्यातही हिंदी सिनेमाच्या सुवर्ण युगातील गाणी आणि संवेदन हे जणु हातात हात घालून प्रकटते. जसा पावसाआधी मातीचा सुगंध येतो आणि मग पाऊस प्रकटतो तसे एखाद्या खास गाण्याचे सूर काहीतरी आठवण मनात प्रकट करुन जातात आणि असे एखादे गाणे प्रत्येक संवेदनशील मनकोपऱ्यात असतेच असते... ‘ओ रात के मुसाफिर’मधल्या लता-रफी यांच्या सुरांना चांदण्याचा रंग असतो. गुरुदत्तच्या ‘जाल’मधलं ‘ये रात ये चांदनी फिर कहाँ’ ऐकताना चांदण्याला उधाणलेल्या समुद्राचा खारा वास येतो...
कॅलिफोर्नियाची उपमा कोकणास का? (Can Kokan area in Maharashtra take clue from California?)
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात सोने पावणेदोनशे वर्षांपूर्वी सापडले. कोणीही जावे आणि सोन्याचे पोते घेऊन यावे असा समज सर्वत्र पसरला. सोने मिळते म्हटल्यावर जो तो सोने हाती लागेल या आशेने कॅलिफोर्नियाला जाण्यासाठी धावत सुटला. अमेरिकेतील माणसे आली, चीनमधून बोटी भरून आल्या. त्याला ‘गोल्ड रश’ असे म्हणतात. ‘मॅकेनाज गोल्ड’ नावाचा सिनेमा त्या हकिगतीतूनच निर्माण झाला होता. तेथील स्टॅनफर्ड विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांची नावे बघितली तर त्या शिक्षणसंस्थेची थोरवी मनात अधिकच ठसून जाते...
नवा मानुष वाद
एकविसाव्या शतकाने लैंगिकतेच्या उधाणाचे, नातेसंबंधांच्या बाजारीकरणाचे आणि क्षणभंगुरतेचे वादळ आणले आहे, हे खरे आहे. परंतु ते पचवले जाईल आणि स्त्री-पुरुष व अन्य ह्यांनी परस्परांसोबत प्रेम, आदर व जिव्हाळा या भावनेने राहवे, शोषण व नियंत्रण ह्यांपासून मुक्त, निरामय जीवन जगावे ही आस कोणत्याही शतकात कायमच राहील. ‘नवा पुरुष’ समाज आणि साहित्य ह्यांच्या दृष्टिक्षेपात यावा व तो इतका व्यापक व्हावा की त्याचे ‘नवे’पण सार्वजनिक होऊन जावे...
ओतूरची सांदुरी पुरी
पुण्याजवळील ओतूर हे माझे आजोळ. कपर्दिकेश्वराचे मंदिर व संत तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य यांची संजीवन समाधी ही गावाची श्रध्दास्थाने. या दोन्ही मंदिरांना वळसा घालून वाहणारी मांडवी नदी ही ओतूरची जीवनरेखा आहे. पूर्वी उन्हाळ्याच्या सुटीच्या दिवसांत गावी हमखास नात्यात लग्नं असायची. ओतूर भागातील लग्नप्रथा लिहावी तर - महिनाभर आधीपासूनच घरात पाहुणे-रावळे येत. लग्नात सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा घटक म्हणजे लग्नातील रुखवत. त्या साऱ्या पदार्थांमध्ये दर्दी लोकांचे लक्ष मात्र राळ्याचे सारण भरलेल्या पुऱ्यांवर असे...