Home Search
गांधीजीं - search results
If you're not happy with the results, please do another search
परमवीरचक्र विजेते रामा राघोबा राणे (Paramveer Chakra honoured Rama Raghoba Rane)
रामा राघोबा राणे यांचा जन्म धारवाड जिल्ह्याच्या हवेली या गावी 1918 साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा बोर्डाच्या शाळेत व पुढील शिक्षण उत्तर कन्नड जिल्ह्यातील चेंदिया या गावात झाले. त्यांचे वडील राघोबा राणे हे पोलिस दलात कॉन्स्टेबल होते.
हैदराबादचा स्वातंत्र्यलढा (Hyderabad’s freedom struggle)
भारतात सुमारे चारशेसाठ देशी संस्थाने होती. त्यांपैकी पंधरा-सोळा संस्थाने बरीच मोठी होती. हैदराबाद, म्हैसूर व काश्मीर ही तीन त्यांपैकी. हैदराबादचे एकूण क्षेत्रफळ ब्याऐंशी हजार सहाशेअठ्ठ्याण्णव चौरस मैल आणि तेथील लोकसंख्या एक कोटी त्रेसष्ट लाख अडतीस हजार होती.
सोलापूरचे मार्शल रामकृष्ण गणेशराम जाजू (Ramkrishna Jaju- Solapur’s martial in Freedom Struggle)
‘मार्शल’ हे खरे तर लष्करी संबोधन, परंतु तेच संबोधन महात्माजींना दैवत मानून ज्याने अहिंसेची व अनात्याचाराची शपथ घेतलेली आहे अशा जाजू नावाच्या सोलापूरातील गांधीवादी समाजसेवकाच्या नावापुढे पाहून मोठा विरोधाभास वाटतो. रामकृष्ण गणेशराम जाजू !
पोटजातींच्या एकीकरणाची आवश्यकता आणि शक्यता (Integration of Subcastes – Need and Possibility)
महाराष्ट्रात निरनिराळ्या मुख्य जातींना जवळच्या अशा पोटजाती आहेत. त्या मुख्य जातींनी त्यांच्या पोटजातींच्या एकीकरणाच्या चळवळी चालवल्या पाहिजेत. जातिभेदनाशाची पहिली व्यवहार्य व परिणामकारक पायरी म्हणून व पोटजातींच्या सामाजिक गरजा भागवण्यासाठी म्हणून पोटजातींच्या एकीकरणाची आवश्यकता आहे !
भावचिन्हांची स्वतंत्र भाषा शक्य? (Will There Be New Language of Emojis)
भावचिन्हे म्हणजे आधुनिक भाषेत ‘इमोजी’. म्हणजेच जगातील तमाम लोक मोबाईलवर दिवसरात्र फेकत असलेले अंगठे, हसरे-रडवे चेहरे, फुले, बदामी हृदये, फुलपाखरू, मोर आणि सूर्य, चंद्र, तारे... काय म्हणाल ते !
चौदावे साहित्य संमेलन (Fourteenth Marathi Literary Meet 1928)
ग्वाल्हेर येथे भरलेल्या चौदाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते लोकनायक माधव श्रीहरी ऊर्फ बापूजी अणे. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारताचार्य चिंतामणराव वैद्य हे स्वत: पुणे येथे 1908 साली भरलेल्या सहाव्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. माधव श्रीहरी अणे यांनी विशेष कोठल्याही प्रकारचे लेखन केलेले नाही.
पारोळा – झाशीच्या राणीचे गाव (Parola – A town with history and Mythology)
पारोळा हे ‘मेरी झांसी नही दुंगी’ असे बाणेदार उद्गार काढणारी मर्दानी झाशीची राणी यांचे माहेर. तांबे हे त्यांचे माहेरचे आडनाव. त्यांचे वंशज पारोळ्यात राहत आहेत. कंगना राणावतने रंगवलेल्या ‘मणिकर्णिका' चित्रपटातील झाशीच्या राणीच्या तडाखेबंद भूमिकेने केवळ एकोणतीस वर्षे आयुष्य लाभलेल्या त्या मर्दानीचा इतिहास पुन्हा जगासमोर आला...
अस्पृश्यता निवारणाचे सातवे सोनेरी पान ! (Untouchability: Sawarkar, Gandhi And Ambedkar)
महाराष्ट्राच्या इतिहासात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मान्यवर नेत्यांमध्ये जे राजकीय, सामाजिक संघर्ष झाले त्याला, राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ नाटकामधील भाषेचा आधार घेत ‘आकाशातील नक्षत्रांच्या शर्यती’ असे संबोधले जाते.
महात्मा गांधीजी आणि व्यंगचित्रे (Gandhi in World Cartoons)
भारतीय गूढ तत्त्वज्ञानाने पाश्चिमात्य जगाला नेहमीच भारून टाकले आहे; तसेच, कुतूहल भारतीय जादूटोणा, तांत्रिक-मांत्रिक, साधू-फकीर यांनी तेथे निर्माण केले आहे. अखिल आधुनिक पाश्चिमात्य जगावर मोहिनी घालणारा खराखुरा ‘नंगा फकीर’ म्हणजे मोहनदास करमचंद गांधी! महात्माजींना ‘नंगा फकीर’ ही पदवी दिली, ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नसे अशा इंग्लंडच्या अत्यंत प्रभावी पंतप्रधानांनी, म्हणजे चर्चिल यांनी...
सुरेश लोटलीकर याची अर्कचित्रे (Caricaturist Suresh Lotlikar)
सुरेश लोटलीकर हा हौशी व्यंगचित्रकार आहे. त्याचे विचार प्रगल्भ असतात आणि टिप्पणी मार्मिक. त्यामुळे तो अचूक वर्म पकडून व्यक्तीचे वा घटनेचे मर्म सूक्ष्मतेने चितारून टाकतो. त्या दृष्टीने त्याची राजकीय व्यंगचित्रे व अर्कचित्रे पाहण्यासारखी आहेत.