Home Search
आगरी समाज - search results
If you're not happy with the results, please do another search
गोपीनाथ पाटील : ठाणे-कळव्याचे ध्यासपर्व (Gopinath Patil’s dedicated work for Kalawa area)
ठाण्याजवळच्या कळवा गावचे गोपीनाथ पाटील हे ध्येय व ध्यास घेऊन सार्वजनिक जीवनात वावरले. त्यांच्या कार्यासाठी त्यांचे परवलीचे सूत्र होते, सहकार ! तेच कार्यसूत्र, खरे तर, स्वातंत्र्योत्तर काळातील संस्था, उपक्रम यांच्या स्थापनेत होते. गोपीनाथ यांच्यामुळे अनेक उपक्रम स्वतःच्या पायावर कळवा परिसरात भक्कमपणे उभे आहेत. ती त्यांच्या कार्याची पावती होय.
ते ज्या कळवा गावात राहत होते ते गाव ठाणे या शहराला लागून असूनसुद्धा अनेक सुविधांपासून दूर होते. कळवावासीयांना दैनंदिन व्यवहारिक गरजा भागवण्यासाठी ठाण्याची वाट तुडवण्याला पर्याय नव्हता. कळव्यातील ते अंधारयुग नष्ट करण्यासाठी आंतरिक तळमळीने उभे राहिले ते गोपीनाथ पाटील. त्यांच्या सार्वजनिक कार्यातून उभ्या राहिल्या अनेकानेक संस्था...
कवितेचा जागल्या ! (A Tribute to Dr. M. S. Patil)
डॉ. म.सु. पाटील हे 1980 नंतरच्या मराठी समीक्षकांमधले अग्रगण्य नाव. ते समीक्षक असण्याबरोबरच विद्यार्थी प्रिय प्राध्यापक होते. ते मनमाड महाविद्यालयाचे वीस वर्षे प्राचार्य होते. त्यांनी त्या काळात अनेक विद्यार्थी घडवले. ते महाविद्यालय नावारूपाला आणले. त्यांनी मराठी साहित्याच्या नकाशावर अस्तित्वात नसलेल्या मनमाड या गावाला साहित्यिक चळवळीचे केंद्र बनवले. त्यांच्या तिथल्या वास्तव्यात विविध चर्चासत्रे, व्याख्याने, ‘अनुष्टुभ’ सारख्या दर्जेदार मासिकाची चळवळ असे मनमाडचे साहित्यजीवन विविध अंगांनी बहरले. अनेक नामवंत साहित्यिकांचा राबता वाढला. त्यांचे निधन 31 मे 2019 रोजी झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या, ज्येष्ठ कवयित्री, कथाकार, कादंबरीकार नीरजा यांनी त्यांच्याविषयी ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश प्रकाशित करत आहोत...
वाडवळी बोली – अम्लान लेणे (Dictionary of Wadvali Dialect)
वाडवळी ही उत्तर कोकणपट्टीतली प्रचलित बोली. कोंकणी, पोर्तुगीज, लॅटीन, फारसी, अरबी आणि मराठी अशा विविध भाषांमधले शब्द सामावून घेणारी ही एक मनोज्ञ बोलीभाषा आहे. या बोलीभाषेचा शब्दकोश मूळचे वसईचे असलेले आणि सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले रिचर्ड नुनीस यांनी संपादित केला आहे. मराठीला कोशवाङ्मयाची समृद्ध परंपरा आहे त्या परंपरेत हा शब्दकोश मोलाची भर घालेल. या शब्दकोशाला डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. त्या प्रस्तावनेतला हा संपादित अंश...
वैभवशाली वसई आणि घाटी लोकसंस्कृती (How Western Maharashtra’s ‘ghati’ people influenced Vasai’s mainly Christian...
वसईच्या एकूण लोकसमुदायामध्ये घाटी म्हणजे देशावरील माणसे बहुत आहेत. तशी पंचवीस हजारांपेक्षा जास्त कुटुंबे त्या भागात असावीत असा अंदाज आहे. ते लोक मुख्यत: सातारा जिल्ह्याच्या माणदेशातील आहेत. ते गेल्या दोन-तीन शतकांपासून तेथे वास्तव्यास येत गेलेले आहेत. ते लोक मेंढपाळ म्हणून भटकंती करत ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम आले व पुढे येऊन वसईत स्थिरावले. वसई ही त्यांच्या पारंपरिक लोकगीतांमध्ये वत्सापूर, बांदुपुरा, बहादुरपुरा, गुलछनाबाद आणि बाजीपूर अशा नावांनी आलेली दिसते...
आम्ही वसईकर – वाडवळ, पानमाळी, भंडारी, कोळी… (Vasai – The picture of integration)
होय. आम्ही वसईकर आहोत. कारण आमचा धर्म, गोत्र, जात, आर्थिक परिस्थिती, रंग, रूप, काहीही असले, तरी आम्हाला बांधते ते एकच नाते - आम्ही वसईकर ! भारत देश किती मोठा आणि विस्तीर्ण; आणि किती विविधतेने भरलेला आहे !
मराठी प्रमाण भाषा व बोली यांची परस्पर परावलंबिता (Spoken languages make language perfect)
प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांतील फरक काय? सर्वसामान्यपणे असे बोलले जाते की प्रमाण भाषा ती असते जी लिहिली आणि बोललीदेखील जाते. बोलीभाषा ही फक्त बोलली जाते.
चुनाभट्टीचा इतिहास (History of Chunabhatti)
निवृत्त पत्रकार नीला उपाध्ये यांचा वावर मुंबईच्या मराठी सांस्कृतिक जीवनात सभासमारंभांना हक्काने हजेरी लावणाऱ्या म्हणून आहे. त्यांना स्वतःला मराठी भाषासंस्कृतीची विलक्षण आस्था...
सुजलाम सुफलाम गाव – मुरुड-जंजिरा (Murud Janjira Village)
मुरुड-जंजिऱ्याला सिद्दी संस्थानचा इतिहास आहे, छत्रपतींनी ते सर करण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. तेव्हा दर्यासारंग दौलतखानाने बाजूलाच, कासा खडकावर पद्मदुर्ग उभा केला...
मुरुड-जंजिरा...
तेलवण विधी
तेलवण हा महाराष्ट्रातील लग्नविधीतील एक लोकाचार. ब्राह्मणेतर जातींत विवाहाच्या आदल्या दिवशी वधूच्या अंगाला तेल-हळद लावली जाते आणि उरलेली तेल-हळद (उष्टी हळद!) घेऊन वधुपक्षाकडील मंडळी...
महाराष्ट्र धर्म म्हणजे काय?
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. महाराष्ट्र हे नाव त्या राज्यास कसे प्राप्त झाले? महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अगोदर त्या प्रदेशाची स्थिती काय...