-
प्रत्येक मराठी माणसाने त्याच्या/तिच्या परिसराची सत्य माहिती द्यावी –
- कर्तबगार व्यक्ती - उपक्रमशील संस्था
- संस्कृतीचे वैभव – यात्रा, जत्रा, बाजार, किल्ले, लेणी... अगदी स्थानिक खाद्यपदार्थसुद्धा.
हे लिहून द्यावे, टिपावे, फोटोग्राफ, व्हिडिओत बद्ध करावे, ऑडिओ आधारे श्रवणपरंपरा जपावी... क्राऊड सोअर्सिंग हा लोकशाही यशाचा मंत्र आहे. (लिहिण्याकरता – लिंक) प्रत्येक जाणत्या, समंजस, संवेदनशील, विचारी माणसाने त्यचा भवताल याप्रमाणे टिपला तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा केवढा तपशीलवार व सूक्ष्म ‘डेटा’ संग्रहित होईल ! त्याची संगती शोधणे, अर्थ लावणे हे विद्वानांना मोठे काम होईल !
प्रत्येक मराठी माणसाने त्याचे किमान फक्त एक हजार रुपये या प्रकल्पास सहाय्य करावे. तर प्रकल्प पाच वर्षांत साकार होईल आणि तेव्हा संगणकाच्या/मोबाईलच्या पडद्यावर जणू महाराष्ट्राचे म्युझियम साकारलेले असेल. एका क्लिकवर महाराष्ट्राबाबत हवी ती माहिती उपलब्ध होईल. पक्षीय राजकारण व गुंडगिरी वगळून. तुमच्या सहकार्याविना ते स्वप्न अधुरे राहील.
कृती - ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर दोन नवीन माहितीपर लेख रोज प्रसिद्ध करावे अशी मनीषा आहे. ते मुख्यत: व्यक्ती - संस्था - संस्कृतिवैभव या तीन प्रकारांत व तालुका हे माहितीसंकलन केंद्र समजून संकलित केलेले असतील. -
मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्र साकार करू पाहणारा ध्येयनिष्ठ प्रकल्प.
नागपूरचे जुने मध्यवर्ती संग्रहालय
नागपूरचा ‘अजब बंगला’ म्हणजे नागपूरचे मध्यवर्ती संग्रहालय. त्या म्युझियमची स्थापना इंग्रज सरकारने 1863 मध्ये केली. ते भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात जुन्या संग्रहालयांमध्ये गणले जाते. नागपूर शहर हे त्यावेळी मध्यप्रांत आणि वऱ्हाड यांची (Central Province And Berar) राजधानी होती. संग्रहालयात दहा दालने आहेत. त्यांत विविध प्रकारचे पुरावशेष, झाडांचे जीवाश्म, शिल्पे, चित्रे, भुसा भरलेले प्राणी, शिलालेख अशा अनेकविध वस्तू आहेत. त्याकरता संग्रहालयात वेगवेगळी दालने आहेत- निसर्गविज्ञान, पाषाणशिल्पे, शस्त्र, पुरातत्त्व, आदिवासी कला व संस्कृती, प्राणी, पक्षी व सरीसृप, शस्त्र, हस्तशिल्प कला, चित्रकला व नागपूर हेरिटेज अशा विषयांचा त्यांत समावेश आहे...
कवी द.रा. बेंद्रे : मातृभावातील दिव्यत्व (Strength of Motherhood : Marathi-Kannad...
दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांची मातृभाषा मराठी, पण त्यांनी ‘ज्ञानपीठ’ हा साहित्यातील अत्युच्य सन्मान कन्नड भाषेत लेखन करून मिळवला ! ते कवी होते. द.रा. बेंद्रे यांना ‘ज्ञानपीठ’ हा पुरस्कार मिळून पन्नास वर्षे पूर्ण झाली. बेंद्रे यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराच्या वेळी जे प्रशस्तिपत्र देण्यात आले त्यात लिहिले आहे, की “पुरस्कारपात्र ‘नाकुतन्ती’ या कन्नड काव्यसंग्रहातून वर्तमानाचे उपहासात्मक रूप, सांस्कृतिक भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा सशक्त प्रतीकांद्वारे निष्कर्ष; तसेच, स्थायी व समग्रात्मक मूल्यांचे समर्थन प्रस्तुत केले गेले आहे. बेंद्रे यांच्या काव्यात एखाद्या गोष्टीचे प्रकटीकरण व रूपांतरण करण्याची क्षमता आहे. त्यात व्यक्तीपासून समष्टीपर्यंतच्या सर्व गोष्टींचा समावेश आहे.” बेंद्रे यांच्या नंतरच्या वर्षीचा 1974 चा पुरस्कार मराठी भाषेतील लेखक वि.स. खांडेकर यांना मिळालेला आहे...
म्हणी- मराठी भाषेचे अंतरंग (Proverbs – Heart of Marathi Language)
म्हण’ या शब्दाची निर्मिती संस्कृतमधील ‘भण’ या धातूचा अपभ्रंश होऊन झाली आहे. म्हण ही लोकांच्या तोंडी सतत येऊन दृढ होते. न.चिं. केळकर यांनी म्हणीची व्याख्या ‘चिमुकले, चतुरणाचे, चटकदार असे वचन अशी केली आहे. कोशकार वि.वि. भिडे म्हणतात, ‘ज्यात काही अनुभव, उपदेश, माहिती, सार्वकालिक सत्य किंवा ज्ञान गोवलेले आहे, ज्यात काही चटकदारपणा आहे आणि संभाषणात वारंवार योजतात असे वचन म्हणजे म्हण होय.’ दुर्गा भागवत यांनी ‘जनतेने आत्मसात केलेली उक्ती म्हणजे म्हण’ असे म्हटले आहे. वा.म. जोशी म्हणतात, ‘थोडक्यात व मधुर शब्दांत जिथे पुष्कळ बोधप्रद अर्थ गोवला जातो, त्या वाक्यांना म्हणी असे म्हणतात’...
नवे लेख
आवाहन
लोकप्रिय लेख
पर्वतातील गाव – वसईचे गिरीज !
गिरीज हे पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील नयनरम्य ठिकाण. तेथे बऱ्याच टेकड्या पोर्तुगीजपूर्व काळात होत्या. काही उंच, काही ठेंगण्या. त्या सर्व लहानमोठ्या टेकड्यांमध्ये वसलेले गाव म्हणून त्याचे नाव गिरीज. ‘गिरी’ म्हणजे पर्वत आणि ‘ज’ म्हणजे जन्मलेले. पर्वतातील गाव गिरीज ! पोर्तुगीज वसाहतवादी वसईत सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी आले. त्यांनी शेषवंशी क्षत्रिय भंडारी भोंगाळे राज्याची वसई खाडीवरील गढी जिंकली. पोर्तुगीज सोजिरांची नजर आजुबाजूच्या गावांवरही गेली. त्यांतील एक गाव गिरीज...

सद्भावनेचे व्यासपीठ
व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प