नरसिंग महाराजांच्या नाना लीला
अकोला जिल्ह्यातील आकोटजवळच्या जळगाव (नाहाटे) गावात एक ब्राह्मण वतनदार पाटील होता. ही 1720 पूर्वीची गोष्ट. गावात गवळी लोकांची वस्ती जास्त होती. वतनदार पाटलांच्या पूर्वजांनी तेथे एक गढी बांधली होती. त्या गढीच्या उत्तर बाजूला एक दरवाजा होता. गढीत असलेल्या पाटलाच्या वाड्याला ‘चंदनाचा वाडा’ असे म्हणत. त्यापैकी वाडा वगळता गाव, कोट, बुरूज, विहीर व दरवाज्यांचे अवशेष कायम आहेत. त्याच नाहाटे वंशात पुंजाजी पाटील नामक गृहस्थ होते. त्यांना दोन पत्नी होत्या. ज्येष्ठ पत्नी यमाबाई व कनिष्ठ पत्नी राजुबाई. राजुबाईंचे माहेर जळगाव(नाहाटे)पासून तीन मैलांवरील शिरसोली ग्राम हे होते...
गजानन महाराज – नरसिंग महाराज स्नेहबंध !
महाराजांच्या घरी श्रीमंती होती. त्यांच्याकडे मूळ गावी शेकडो एकर जमीन होती. पुढे ते आकोटला आले व आकोटचे नरसिंग महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. गजानन महाराज हे नरसिंग महाराज यांना त्यांचे बंधू मानत असत. ते त्यांचे पट्टशिष्य भास्कर महाराज यांना समवेत घेऊन आकोटला नरसिंग महाराज यांना भेटण्यास येत असत. भास्कर महाराज हे नरसिंग महाराज यांचे पूर्वीचे नातेवाईकच होते. नरसिंग महाराज आकोट जवळच्या अरण्यात एकांतवासात राहात असत. तेथे मोठमोठे वृक्ष असल्याचे वर्णन त्याच ग्रंथात व त्याच अध्यायामध्ये आहे...
मुरुडचा भूलभुलैया चौक (Murud’s 400 year old Magic Square)
गावात, शहरात चौक असतात. पण एखाद्या गावात चौकटीत किंवा चौकाच्या व्याख्येत न बसणारा असा; तरीही तो चौकच असतो, हे वाचून अचंबा वाटेल. असा चौक आहे दापोली तालुक्यात मुरुड या गावी. मुरुड हे टिंबाएवढे गाव. नकाशात त्याचे अस्तित्व ते काय दिसून येणार ! परंतु त्या गावाची ख्याती ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वेगळेपणामुळे सर्वदूर पोचली आहे. गावाची रचना विचारपूर्वक करण्यात आली असल्याचे जाणवते. दोन्ही बाजूंना घरे आणि मधोमध रस्ता. सुमारे चारशे वर्षांपूर्वीची ही रचना स्वत:चे रूप अजूनही टिकवून आहे...
तळवलकरांनी वाचक घडवला
गोविंद तळवलकरांनी त्यांच्या अग्रलेखांतून सातत्याने पाश्चात्य ज्ञानविज्ञानाचा, ग्रंथांचा, उत्तम शास्त्रीय नियतकालिकांतील अभ्यासकांच्या लेखांचा, अभ्यासक विद्वानांचा परिचय नेहमीच करून दिला. अग्रलेखावर लेखकाचे नाव नसल्याने नेमके कोणते अग्रलेख तळवलकरांनी लिहिले हे कळणे कठीण असले तरी त्यांची शैली लक्षात घेता त्यांचे म्हणून लक्षात आलेले लेख, ग्रंथरूपात प्रकाशित झालेले अग्रलेख व अन्य ग्रंथ वाचून अनेक विषयांची, शोधप्रबंधांची, शोधनिबंधांची, ग्रंथांची, शास्त्रीय नियतकालिकांची ओळख झाली...
महाराष्ट्रातील पहिले वर्तमानपत्र – साप्ताहिक दर्पण
बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रातील पहिले वर्तमानपत्र - इंग्रजी, मराठी साप्ताहिक ‘दर्पण’ आणि पहिले मराठी मासिक ‘दिग्दर्शन’ काढले. त्यांच्याच प्रेरणेने, साह्याने व मार्गदर्शित्वाने भाऊ महाजन यांनी ‘प्रभाकर’, ‘धूमकेतु’ ही साप्ताहिके व ‘ज्ञानदर्शन’ नामक त्रैमासिक चालवले. अर्थात स्वतः वृत्तपत्र व मासिक काढूनच नव्हे, तर दुसऱ्यांसही तशी प्रेरणा करून बाळशास्त्री यांनीच आधुनिक महाराष्ट्राला वृत्तपत्रांचे व मासिकांचे महत्त्व पटवून दिले असे दिसून येईल...
विद्याधर गोखले : एक हजरजबाबी व्यक्तिमत्त्व !
आपल्याकडे पराभूत उमेदवारानं संमेलनाकडे फिरकायचं नसतं, अशी रीत आहे. त्या दृष्टीनं गोखले बंडखोर, पुरोगामी प्रवृत्तीचे; रीतीभातींना ते जुमानत नाहीत ! खिलाडूपणा रोमरोमी भिनलेला...
कुसुमाग्रजांची स्वप्नाची समाप्ती आणि कवी बोरकर
कुसुमाग्रज यांच्या रसिकमान्य, वाचकप्रिय कवितांपैकी 'स्वप्नाची समाप्ती' ही एक कविता आहे. त्या कवितेच्या ओळी जाणत्या मंडळींच्या ओठांवर ऐकण्यास मिळतात. अनेकांनी या कवितेविषयी सांगितले तरी ती कविता वाचण्यास सुरूवात केली तरीदेखील या क्षणाला नवा आनंद देते. 'स्वप्नाची समाप्ती' या कवितेविषयीची एक छान आठवण कवी बा.भ. बोरकर यांनी 'कौतुक तू पाहे संचिताचे' या त्यांच्या आत्मकथेत रसाळपणाने कथन केली आहे...
रुक्मिणी स्वयंवर (Rukmini Swayamvar)
मध्ययुगीन मराठी साहित्यात रुक्मिणीच्या स्वयंवराची कथा वारंवार लिहिली गेली. आद्य मराठी कवयित्री महदाइसा उर्फ महदंबा हिने ‘मातकी रुक्मिणी स्वयंवर’ हे आख्यानकाव्य लिहिले आहे. रामदेवराय यादवाने त्याच्या पदरी असलेल्या कवी नरेन्द्राकडे, त्याने लिहिलेले ‘रुक्मिणी स्वयंवर’ त्याच्या नावावर करावे म्हणून आग्रह धरला मात्र नरेन्द्र व-हाड प्रांतात निघून गेला अशी आख्यायिका आहे. नंतरच्या काळात लिहिलेले आणि आजही लोकप्रिय असलेले रुक्मिणी स्वयंवर म्हणजे संत एकनाथांचे ‘रुक्मिणी स्वयंवर’...
लोककलांचा वारसा: भारूड आणि कीर्तन (Folk Arts – A Cultural Heritage)
महाराष्ट्राला लोककलांची समृद्ध परंपरा आहे. लोकनाट्य, वगनाट्य, दशावतार, तमाशा, कीर्तन, भारूड, पोवाडा अशा लोककलांशी सर्वसाधारण मराठी माणसाचा परिचय असतो. या सर्व कला ही मनोरंजनाची साधने आहेत. सहजता, उस्फूर्तता ही लोककलांची वैशिष्ट्ये. अशा अनेक लोककलांनी महाराष्ट्र समृद्ध आहे. त्यांपैकीच दोन लोककला म्हणजे 'भारूड' आणि 'कीर्तन'. मनोरंजनातून प्रबोधन हे ह्या दोन्ही लोककला प्रकारांचे वैशिष्ट्य आहे. लेखात भारूड आणि कीर्तन या लोककलांच्या विविध प्रकारांचा परिचय करून दिला आहे...
वंदे मातरम् – हैदराबाद मुक्ती संग्रामातील पहिली ठिणगी
‘वंदे मातरम’ या गीताला भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1876 मध्ये लिहिलेल्या ‘आनंद मठ’ या कादंबरीतील आहे. ते रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम देशापुढे आणले. त्या गीताला प्रसिद्ध संगीतकार पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी स्वरबद्ध केले आणि ते गीत अजरामर ठरले ! ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात वाराणसी येथे 1905 साली स्वीकारले गेले...