ग्रंथालये नव्हे, सांस्कृतिक केंद्रे ! (Book Libraries will be cultural Centers)
पुस्तकांचा संग्रह आणि त्यांची देवघेव करण्याचे ठिकाण म्हणजे ग्रंथालय, एवढाच विचार लोकमानसात असतो. परंतु बदलत्या काळ-परिस्थितीत ग्रंथालयांना तेवढेच कार्य करून पुरेसे ठरणार नाही. त्यांना सांस्कृतिक केंद्राचे नवे, विस्तारित रूप घ्यावे लागेल. तेथे केवळ वाङ्मय नव्हे तर विविध विद्याशाखांचा पाठपुरावा करावा लागेल- वेगवेगळी माध्यमे वापरावी लागतील- ज्ञान संकलन व ज्ञान प्रसारण हे त्यांचे मुख्य कार्य राहील असा अभिप्राय चिपळूण येथे ‘लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर’ आणि ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ यांनी आयोजित केलेल्या ‘ग्रंथालय मित्र मंडळ’ मेळाव्यात व्यक्त झाला...
अंगण (Courtyard)
एखाद्या शब्दासरशी आपल्या मनात रूप, रंग, गंध, नाद; अशा अनेक संवेदना जाग्या होतात. ओल्या फुलाचे परागकण हाताला चिकटून यावेत तशा आठवणी जाग्या होतात. ‘मातीचा वास आला!’ या गद्य शब्दात किती सुगंध, उल्हास साठला आहे. सध्याच्या दिवसात किती असोशीने आपण त्या वासाची वाट पहात आहोत. अशाच संवेदना वेगवेगळ्या जागांशी, घरांशी संबधित असतात. आजच्या लेखात मंजूषा देशपांडे यांनी त्यांनी पाहिलेल्या आणि त्यांच्या मनातल्या अंगणांविषयी लिहिले आहे...
गोत्र आणि विवाह संबंध
गोत्र हा शब्द ‘गौक्षेत्र’ या नावापासून बनला गेला. प्रत्येक परिवारास पशुधन चारण्यासाठी गावातील एक ठरावीक क्षेत्र राखीव असे, त्याला गोक्षेत्र म्हटले जाई. त्या परिवाराची ओळख पुढे त्या क्षेत्रावरूनच होऊ लागली. पुढे त्यालाच गोत्र म्हटले जाऊ लागले...
राजाळेच्या जानाई देवीचा यात्रोत्सव
राजाळे गावात मंदिरे जरी अनेक असली तरी जानाई देवीचे स्थान अनन्य आहे. मंदिरामुळे गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. भाविक श्री क्षेत्र राजाळे नगरीत कर्नाटक, विजापूर, अहमदनगर, परभणी, बीड, चंद्रपूर या ठिकाणांहून येत असतात...
राजाळे गावची एकता अभंग
राजाळे गाव सातारा जिल्ह्यात फलटणपासून पूर्वेला बारा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव सधन व विकसनशील आहे..समाजप्रबोधन हेच ब्रीद मानून वैचारिक परंपरा असलेले गाव म्हणून राजाळे गाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे...
द.भि. कुलकर्णी – समीक्षेचा सृजनव्यवहार (D.B. Kulkarni Review Creator)
द.भि. कुलकर्णी हे ज्येष्ठ समीक्षक म्हणून ख्यातनाम होते. त्याचमुळे त्यांची निवड त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यात 2010 साली झाली होती. समीक्षक...
विष्णूचे उपासक – वैष्णव संप्रदाय (Vishnu Worshiper – Vaishnava sect)
विष्णू आणि त्याचे राम व कृष्ण हे दोन मुख्य अवतार यांची आराधना करणारा तो वैष्णव संप्रदाय. नारायण-विष्णूमधील नारायण या देवाचा उल्लेख प्रथम ‘शतपथ ब्राह्यण’...
चौथे साहित्य संमेलन – 1906
न्यायमूर्ती गोविंद वासुदेव कानिटकर हे चौथ्या ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष होते. ते संमेलन पुणे येथेच 1906 साली भरले. गोविंद वासुदेव कानिटकर यांचा नावलौकिक साहित्य, संगीत आणि विद्या या तिन्ही क्षेत्रांत होता. ते चित्रकलेचे चाहते होते. त्यांचा अभ्यास वेदांताचा व इंग्रजी वाङ्मयाचा होता. ते साक्षेपी विद्वान म्हणून ख्यातकीर्त होते...
तांबूल संस्कृती : पानविडा आणि सौंदर्य (Tambul Culture Panvida and Beauty)
तांबूल अर्पण करण्याचा विधी भारतामध्ये देवांपासून पितरांपर्यंत, पूजेपासून श्राद्धापर्यंत आहे. ‘पान’ हे पृथ्वीवर सांडलेल्या अमृतातून निर्माण झालेल्या नागवेलीचे आहे असे मानले जाते. आयुर्वेदाच्या चरक,...
नक्षत्रवाती
भारतातील चालीरीती, व्रते, पूजा या परंपरेने, प्रांतानुरूप, जाती-समुदायनिहाय चालत आलेल्या आहेत. त्या बहुतेक सर्व निसर्गाच्या बदलांशी निगडित आहेत. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, फुले, फळे...