सह्याजीराव सतीश चाफेकर (Satish Chaphekar – Man with Thousands of Autographs)

स्वाक्षऱ्यांसाठी डोंबिवलीला एक घर आहे ! घराचे नाव आहे ‘हे माझे घर, शब्दाचे’; अन् या अवलिया घरमालकाचे नाव आहे सतीश चाफेकर. ते घर म्हणजे आहे एका छोट्या फ्लॅटची टुमदार खोली, पण तिच्या भिंती भरल्या आहेत सह्यांनी मान्यवरांच्या, ‘स्टार्स’च्या, खेळाडूंच्या. अगदी सचिनची आई रजनी तेंडुलकर आणि कवी ग्रेस यांनी त्या खोलीत येऊन त्यांची त्यांची सही केली आहे. त्या खेरीज, चाफेकर यांनी पस्तीस-छत्तीस डायऱ्या, क्रिकेटच्या कितीतरी बॅटा, टी शर्ट, छत्र्या, मास्क अशा संबंधित अनेकविध साहित्यावर सह्या घेतलेल्या आहेत आणि त्या तेथे जपून-राखून ठेवल्या आहेत. त्यांचे मोल कोट्यवधी रुपयांचे, खरे तर अनमोल आहे. सतीश चाफेकर यांचे नाव ‘लिम्का बुक’च्या विक्रमवीरांच्या यादीत सहा वेळा नोंदले गेले आहे...

शि.द. फडणीस : हास्यचित्रांची वैश्विकता (S D Phadnis – Painter who spreads smile through...

0
शि.द. फडणीस शंभर वर्षांचे झाले. म्हणजे त्यांचा शताब्दी वर्षांत प्रवेश होत आहे. त्यांचा जन्म 29 जुलै 1925 चा. त्यांचा आता आतापर्यंत सार्वजनिक कलाजीवनात सहभाग असे; अजूनही व्यक्तिगत गाठीभेटी, संभाषणे करतात. फडणीस यांनी त्यांच्या हास्यचित्रांद्वारे मराठी माणसांच्या मनात हास्य गेल्या शतकाची साठ-सत्तर वर्षे पसरवले, आनंदच आनंद निर्माण केला ! त्यांनी मासिके-दिवाळी अंकांमध्ये, कथा-कादंबऱ्यांसाठी; इतकेच नव्हे तर शालेय व महाविद्यालयीन पुस्तकांच्या मुखपृष्ठांसाठी मनोवेधक व्यंग/हास्यचित्रे काढली. ती विलक्षण लोकप्रिय झाली. शि.द. यांच्या ‘मिस्कील गॅलरी’ स्वरूपाच्या चित्रांनी मराठी आणि एकूण भारतीय हास्य व व्यंग चित्रकलेत ठसठशीत ठसा निर्माण केला आहे...

बालशिक्षणाच्या प्रणेत्या : ताराबाई मोडक ! (Tarabai Modak : Pioneer of Child Education)

ताराबाई मोडक पद्मभूषण; त्यांच्या शिष्य अनुताई वाघ पद्मश्री- एकाच कार्यात गुंतलेल्या गुरुशिष्य जोडीला पद्म सन्मान मिळाल्याचे उदाहरण विरळा. त्या गुरूशिष्यांनी कोसबाड येथे बालशिक्षणविषयक अनेक प्रयोग 1956 सालापासून केले. त्यांनी त्यांच्या प्रयोगांमध्ये मॉण्टेसरी पद्धतीची शिक्षणविषयक मूलतत्त्वे घेऊन, त्यांच्या कार्यपद्धतीत फेरफार केले. शिक्षकांना व ग्रामीण कारागिरांना तयार करता येतील अशी शैक्षणिक साधने रचली. ‘कुरण शाळा’, ‘उद्योग शाळा’, ‘निसर्ग भ्रमण’, ‘लेखन-वाचन वर्ग’ असे उपक्रम योजले. त्यांनी तर ‘अंगणवाडी’ व ‘बालवाडी’ या संकल्पना समाजात रुजवल्या ! ताराबाईंनी सुरू केलेल्या ‘शिक्षण पत्रिका’ मासिकाला नव्वद वर्षे पूर्ण झाली आहेत...

समर्पण – डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची जीवनगाथा (Samarpan, Biography of Dr. Dwarkanath Kotnis)

1
डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे नाव आज साठीत असलेल्या पिढीला सहज माहीत असते. अनेकांनी व्ही. शांताराम यांचा ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’ हा सिनेमाही पाहिलेला...

नाटककार-संपादक विद्याधर गोखले

1
विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीचे 2024 हे वर्ष आहे. 1960 ते 1980 ही दोन दशके मराठी संगीत नाटक म्हणजे विद्याधर गोखले असे जणू समीकरणच होते. मराठी संगीत नाटक ही मराठी संस्कृतीलाच नव्हे तर जागतिक रंगभूमीला असलेली देणगी आहे. गोखले यांनी पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर अध्यापन काही वर्षे केले. त्यानंतर त्यांनी ‘दैनिक लोकसत्ता’मध्ये नोकरी पत्करली. अनेक वर्षे ‘लोकसत्ता’मध्ये काम करून पत्रकारितेमधील कारकीर्द गाजवली. त्यांनी ‘लोकसत्ता’मध्ये संपादक म्हणूनही जवळजवळ पाच वर्षे काम केले...

गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ विंदा करंदीकर (Vinda Karandikar)

0
मराठीतल्या मोजक्याच ज्ञानपीठ विजेत्यांपैकी असलेल्या विंदा करंदीकर यांचे साहित्यिक कर्तृत्व मोठे आहे. अमृतानुभवापासून ते नवकवितेपर्यंत त्यांची प्रतिभा आणि लेखणी लीलया फिरली आहे. त्यांनी कवितेच्या आशयामध्ये आणि रूपबंधांमध्ये अनेक प्रयोग केले. जबाबदारीच्या भावनेतून, मराठीच्या अभ्यासकांसाठी भाषांतरे केली. अशा या चतुरस्त्र साहित्यिकाची 14 मार्च रोजी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने गीता जोशी यांनी विंदांच्या साहित्याचा धावता आढावा घेतला आहे...

मधु दंडवते – उत्स्फूर्त, विनोदी, तिरकस…

2
दिल्ली येथील संसद भवनात ठसा उमटवणाऱ्या महत्त्वाच्या काही मराठी व्यक्तींमध्ये प्रोफेसर मधू दंडवते यांचे नाव घ्यावे लागेल. मधू दंडवते लोकसभेवर 1971 ते 1990 या दोन दशकांत सातत्याने निवडून आले. सत्ताधारी पक्षात असोत अथवा विरोधी बाकांवर बसलेले असोत, दंडवते यांनी त्यांच्या अभ्यासू वृत्तीने आणि कुशल वक्तृत्व कलागुणांनी संसद गाजवली. मधू दंडवते यांनी त्यांच्या उत्स्फूर्त आणि विनोदी परंतु मार्मिक भाषणांनी राजकीय वर्तुळात ठसा उमटवला...

मधू दंडवते – झुंजार समाजवादी नेता (Madhu Dandavate- Birth centenary of a socialist leader)

4
मधू दंडवते यांचे नाव संसदेत ठसा उमटवणाऱ्या काही महत्त्वाच्या मराठी नेत्यांमध्ये आवर्जून घेता येईल. ते लोकसभेवर राजापूर मतदार संघातून जवळजवळ वीस वर्षे सातत्याने निवडून आले. त्यांनी जनता पक्षाचे सरकार केंद्रात आले तेव्हा मंत्रिपदही भूषवले. दंडवते यांनी मोरारजी देसाई यांच्या सरकारात रेल्वे मंत्री म्हणून (1977) त्यांचा कार्यकाळ गाजवला. त्यानंतर ते व्ही.पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. ते व्यवसायाने प्रोफेसर होते. मधू दंडवते यांची जन्मशताब्दी 21 जानेवारी 2024 रोजी साजरी झाली...

वि.स. खांडेकर- एक विसावा (Remembering V.S. Khandekar)

मराठीला पहिले ज्ञानपीठ मिळवून देणारे, मागच्या शतकातले विख्यात लेखक वि.स. खांडेकर यांची 11 जानेवारी 2024 रोजी एकशेपंचविसावी जयंती आहे. कथा, पटकथा, कादंबऱ्या, नाटके, ललितलेख, निबंध, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये खाडेकरांच्या नावावर पंचाहत्तरपेक्षा जास्त लेखनकृती आहेत. आजही त्यांच्या ‘अमृतवेल’, ‘उल्का’, ‘ययाती’, ‘क्रौंचवध’ या कादंबऱ्या वाचकप्रिय आहेत. त्यांच्या एकशेपंचविसाव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे लेखनिक राहिलेले राम देशपांडे त्यांच्या आठवणी सांगत आहेत...

मनकर्णिका ऊर्फ मनू – झाशीची राणी (Queen of Zhansi was Manu before she was...

झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र लिहिण्याचा प्रयत्न, द.ब. पारसनीस यांनी लिहिलेले पहिले चरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील शेसव्वाशे वर्षांत अनेक लोकांनी विविध अंगांनी केला आहे, त्या सर्वांमध्ये प्रतिभा रानडे यांचे ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ हा चरित्र ग्रंथ सर्वांगसुंदर आहे. त्या वेळच्या लोकांच्या भावना; तसेच, आजूबाजूची परिस्थिती याचे उत्तम दर्शन त्या पुस्तकामधून घडते...