तानुबाई बिर्जे यांनी ‘दीनबंधू’ या वृत्तपत्राचे संपादकपद एकशेवीस वर्षांपूर्वी यशस्वीपणे भूषवले होते ! महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्या पहिल्या स्त्री संपादक मानल्या जातात. श्रीराम गुंदेकर त्यांच्या 'सत्यशोधकी साहित्याचा इतिहास' या ग्रंथात म्हणतात, "त्या ब्राह्मणेतर पत्रकारितेतील पहिल्या स्त्री संपादक आहेत. कदाचित मराठी पत्रकारितेतील स्त्री म्हणून पहिलेपणाचा मानही त्यांनाच मिळू शकेल !"