वॉल्टर स्पिंक यांना भारताने दुर्लक्षले (Walter Spink was ignored by India)

14
102

वॉल्टर स्पिंक हे अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील कलाइतिहासाचे प्राध्यापक. त्यांनी अजिंठा लेण्यांच्या संशोधनाचा ध्यास घेतला होता. त्यासाठी ते जवळ जवळ पन्नास वर्षे, दरवर्षी दोनदा याप्रमाणे भारतात येत असत. त्या आधारे त्यांनी अजिंठाविषयक क्रांतिकारी मांडणी केली आहे. त्यांचा तो सात खंडांचा इतिहास जगप्रसिद्ध आहे. त्यांना त्यांच्या संशोधनाबद्दल जागतिक पातळीवर भरपूर कौतुक व मानसन्मान मिळाले. त्याची भलीमोठी यादी आहे. ते 2000 मध्ये निवृत्त झाले तेव्हा मिशिगन विद्यापीठाने त्यांचा चाचाजीअसे शीर्षक दिलेला गौरव ग्रंथ त्यांच्या नकळत छापून तयार ठेवला होता! त्यात लिहिणाऱ्यांमध्ये त्यांचे अनेक भारतीय व परदेशी सहकारी आणि विद्यार्थी आहेत. प्रत्येकाने स्पिंक आणि त्यांनी केलेल्या कामाचा आवाकावैचारिक व्याप्तीत्यांची सौंदर्य टिपण्याची क्षमतासंपूर्ण जगाबद्दलची विशाल अशी सद्भावना हे सर्व शब्दांत पकडता येत नाही असे लिहिलेले आहे. त्यांच्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती त्यांच्या प्रसन्न ऊर्जेचा आणि श्रीमंतीचा एक अंश घेऊनच परतलेली आहे.

ते त्यांना कोणत्याही जुलमाचा मनापासून तिटकारा असल्याने वयाच्या नव्वदाव्या वर्षापर्यंत ट्रम्पविरोधी निदर्शनांना हजेरी लावत असत. त्यांनी सढळ हाताने त्यांच्याकडील संशोधन साहित्यपुस्तके आणि छायाचित्रे विद्यार्थ्यांनासंग्रहालयांना आणि संस्थांना वाटली आहेत. त्यात लाभधारक भारतीय पुरातत्त्वीय सर्वेक्षण (आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, ए एस आय) देखील आहे. एएसआयने त्यांची consultancy वापरलेली आहे, परंतु याच ए एस आय ने त्यांना दहा वर्षे अजिंठ्याच्या ‘प्रमुख’ समजल्या जाणाऱ्या लेण्यांमधून प्रवेशबंदी केली होती ! स्पिंक यांनी त्यांना त्याबद्दल झालेले दुःखअपमान आणि हतबलता मोजक्या आणि नेमक्या शब्दांत लिहून व्यक्त केलेली आहे. पण त्यांनी त्या अडवणुकीचेही संधीत रूपांतर केले. त्यांना ज्या बिनमहत्त्वाच्या’ समजल्या जाणाऱ्या लेण्यांमध्ये जाण्यास आडकाठी नव्हतीतेथेच त्यांना लेण्यांच्या निर्मितिप्रक्रियेबद्दल कळीचे पुरावे सापडले!  

ते सत्याऐंशी वर्षांचे होते, तेव्हा 2015 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या आवारात त्यांच्या सन्मानार्थ एक परिषद भरवण्यात आली होती. त्यात आलेल्या संशोधन निबंधांपैकी काही निवडक निबंधांचे संकलन किंडलवर उपलब्ध आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘कृष्णमंडल’ आणि ‘दि अॅक्सिस ऑफ इरॉस’ या दोन ग्रंथांमधून त्यांच्या भारताबद्दलच्या आत्मीय भावनेची आणि ज्ञानाच्या व्याप्तीची व खोलीची कल्पना येते. त्यांनी लिहिलेले ‘कृष्णमंडल’ हे पुस्तक मास्टरपीस’ समजले जाते.

स्पिंक भारतातील अनेक संस्थांचे आजीव सभासद होते. त्यांना वेळोवेळी त्यांच्या व्याख्यानांचा आणि लेखांचा लाभ मिळत होता. त्यांच्या साईट सेमिनारला झुंबड उडत असे. ते गरीब विद्यार्थ्यांना फुकट प्रवेश देत असत. त्यांचे विद्यार्थी जगभर पसरलेले आहेत आणि ते स्पिंक यांनी जे शिकवले ते शिकवत आहेत. पण भारतात कोणत्याही शाळेतसंस्थेतविद्यापीठातकॉलेजात त्यांचा सुधारित लघु कालक्रम आणि अजिंठ्याबद्दलची विस्तृत मांडणी शिकवण्यात येत नाही. वॉल्टर स्पिंक यांचे निधन वयाच्या एक्याण्णव्या वर्षी, 23 नोव्हेंबर 2019 रोजी झाले. त्यांच्या जाण्याने अजिंठ्याचा आधारस्तंभ कोसळला आहे !

शुभा खांडेकर 9969439986 shubhakhandekar@gmail.com

————————————————————————————–———————————————————

About Post Author

14 COMMENTS

 1. वाॅल्टर स्पिंक या थोर माणसाची माहिती मिळाली. एकतर आपण संशोधन करायचे नाही, दुसरे करत असतील तर त्यांना महत्त्व द्यायचे नाही हे बरोबर नाही. वाॅल्टर स्पिंक यांना विनम्र अभिवादन.

 2. Shubha Khandekar Oh no! These so called sanskruti rakshaks create mess in everything.Hats off this man for his dedication and efforts against all odds.��We Indians often fail to offer gratitude. Any way…

 3. Shubha Khandekar I see a more grave problem. We neither respect nor protect our culture. But when an outsider wants to do it, suddenly we r all possesive and dig out some rotten ritual to prevent him.This is horrible.

 4. Swati Kelkar I think you are off the mark a bit. The priest of the Odisha temples didn't do anything unusual or unexpected. They were being true to their dharma, in whatever way they understood and practised it, for hundreds of years. Spink turned his adversities into advantages, that was his greatness. He also made all his knowledge available by publishing it. The real issue is, what have we done with the huge corpus of knowledge he has left behind for us? Don't the Indians have a right to access it? It is not being taught anywhere in India. Why? And ASI has not acknowledged it at Ajanta. The point is, if ASI is not doing any academic work, how is it authorised to judge academic work, especially work which is so highly acclaimed all over the world? These are the questions that we need to ask, and ask again and again.

 5. Chalo Shubha Khandekar as discussed, let's be the change we want to see. Start with writing stories for children, take the story to schools and colleges. Our education system is huge. Getting any changes takes for ever. Can we look at the possibilities of social media to educate the youth – start a blog, Instagram which is the language of the young. Make it enticing so they want more. You never know where this might lead you. You might just achieve your objective

 6. Sarayu Kamat I hope you remember that I have only two hands and 24 hours and can only do so much and no more! Let others stand up and be counted! But I'm happy with the kind of awareness slowly building up, surely things should get moving once this nasty virus is out of our lives.

 7. हे दुर्दैवी आहे. पण प्रवेश का नाकारला गेला होता?

 8. ज्यांनी नाकारला त्यांनाच माहित! �� पण त्यामुळे स्पिंक यांना वेगळाच खजिना हाती लागला हे त्यांनीच नमूद केले आहे !

 9. Shubha Khandekar त्यातूनही मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं. Respect!

 10. Anupama Deshpande Ignored won't be the right word, but his research work initially was neglected by scholars/ so called scholars. Later on ( after many years) Profs Jamkhedkar, Dhavalikar, Deepak Kannal and few others recognised his work and understood his short chronology of Ajanta. They had long discussions and sensible arguments.Truly speaking no one could disprove his theory. He was able to answer all the queries of several scholars and students.One has to go through his research work thoroughly which is not so easy in the first go.Anyway, though I was in close association with him for more than 30 years, I was able to understand Ajanta to a certain extent.Secondly Pravesh- means initially he was interested in studying Orissan temples, but he was not allowed to enter Jagannath temple ( you know why? ). therefore he took over Ajanta as his research work for which he said that in one way it was good that they did not allow me to enter the temple of Jagannath and happy to work on Ajanta.

 11. Anupama Deshpande Glad you raised it. In Volume 2 footnote 545 Prof Spink has written about how he was banned from entering Caves 1, 2, 16 and 17. It is true that he originally wanted to research on the Lingaraj — not the Jagannath –temple of Odisha but was denied entry because he was a non-Hindu and was told that his entry would cause riots! This turned him away and brought him to Ajanta where he settled for the next 66 years and published 7 bulky volumes. All this is very well documented and well known to people who have followed his work, but due to the word count limitations it is not possible to include every such detail in an article. It is also true that scholars named by Dr Shreekant Jadhav eventually accepted Spink's Short Chronology, but the point is it that it is neither being taught to students nor has the ASI changed its signboards at Ajanta to reflect Spink's monumental research. Here is a link that you might find useful: https://www.livehistoryindia.com/…/histor…/walter-spink/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here