Home वैभव

वैभव

नोंद गावोगावच्‍या सांस्‍कृतिक संचिताची – ऐतिहासिक आणि सांस्‍कृतिक वारशाची!

आसूद गावची पुरातन पाणी वाटप व्यवस्था

2
आसूद हे गाव डोंगरउतारावर आहे. त्या गावच्या भगिरथ-पुत्रांनी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा उपयोग करून ‘गंगा अंगणी’ आणली ! त्यामुळे गावात अष्टौप्रहर पाणीच पाणी झाले. ती अनोखी पाणी वाटप योजना तीनशे वर्षे चालू आहे. त्या पुरातन पाणी वाटप व्यवस्थेत फारसा बदल झालेला नाही. पाण्यावरून कोणी वाद करत नाहीत. कारण ती गोष्ट न्याय्य पद्धतीने चालवली जाते…

दापोलीचे केशवराज मंदिर (Dapoli’s unique Keshavraj Temple)

0
केशवराज मंदिर हे दापोलीचे मोठे आकर्षण आहे. त्याला धार्मिक व भाविक असे महात्म्य लाभले आहेच; त्याबरोबर, पर्यटनाच्या दृष्टीनेही ते ठिकाण विलोभनीय वाटते. मंदिरातील विष्णुमूर्ती सुंदर आहे. त्या विष्णुमूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्म या आयुधांच्या धारण करण्याच्या क्रमावरुन चोवीस प्रकार पुराणात (अग्नी, पद्म, स्कंद) सांगितलेले आहेत...
for frame

पुण्याची ग्रामदेवता – तांबडी जोगेश्वरी

ऐतिहासिक असल्यामुळे पुण्यात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत, भिकारदास मारुती, पत्र्या मारुती, जिलब्या गणपती, चिमण्या गणपती अशा चित्रविचित्र नावांसाठीही ती प्रसिद्ध आहेत. पण पुण्याचे ग्रामदैवत...
त्र्यंबकेश्वर येथील मंदिरही हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे उदाहरण आहे

हेमाडपंती स्थापत्यशैली

1
चुन्याच्या किंवा कसल्याही पदार्थाच्या साहाय्यावाचून केवळ एका ठरावीक पद्धतीने दगडावर दगड ठेवून किंवा दगडांना खाचा पाडून हे बांधकाम केले जात असे. मंदिरांच्या शिखरांची घडण...
carasole

कला साधना केंद्र आणि वाटेवरच्या काचा

अमोल चाफळकर हे सोलापूर येथील एक नामांकित आर्किटेक्ट. पण त्यांचे प्रेम इमारती बांधण्याइतके, किंबहुना काकणभर जास्तच चित्रांवर, शब्दांवर, सुरांवर आणि शिल्पांवर. त्यांच्या या प्रेमातूनच...
carasole

वाडेश्वरोदय – शिवकालिन संस्‍कृत काव्‍य

‘वाडेश्वर’ किंवा ‘व्याडेश्वर’ नावाने कोकणातील गुहागर (तालुका - गुहागर, जिल्हा -  रत्नागिरी) येथे प्राचीन देवस्थान आहे. संपूर्ण काळ्या पाषाणाचे ते भव्य मंदिर पुरातन आहे....

मनमाड आणि गुप्तसर साहिब गुरुद्वारा

महाराष्ट्रातील नांदेड खालोखाल मनमाडमधील गुरुद्वाराला अखिल शीख समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे स्थान आहे. ते गुरुद्वाराला प्रेरणा आणि प्रार्थना स्थळ म्हणून फार मानतात. गुरु गोविंद सिंह नांदेड येथे का आले असावेत याबाबत दोन मतप्रवाह आढळून येतात. एक म्हणजे, महाराष्ट्रातील संत नामदेव यांचे पंजाबमधील महत्कार्य आणि त्यांना तेथे, पंजाब प्रांतात मिळालेला ‘संत शिरोमणी’ असा दर्जा. यांमुळे गुरू गोविंद सिंह संत नामदेवांच्या मूळ स्थानी, नांदेडमध्ये आध्यात्मिक किंवा धार्मिक कारणामुळे आले असावेत असे मानले जाते...
_VinayakdadaPatil_GeleLihaycheRahun_1.jpg

गेले लिहायचे राहून – विनायकदादा पाटील यांची अनुभवगाथा

‘गेले लिहायचे राहून’ हे विनायकदादा पाटील यांच्या ललित लेखनाचे पुस्तक. ते लेखन प्रसंगाप्रसंगाने झाले. ते संपादकांनी सूत्रबद्ध पद्धतीने मांडल्याने आकर्षक झाले आहे. ‘गेले लिहायचे...
-devle-gav

देवळे : देवालयांचे गाव (Devle – Temples Village)

3
देवळे हे देवालयांचे गाव म्हणून संगमेश्वर तालुक्यात प्रसिद्ध आहे. त्या गावात खडगेश्वर, गावदेवी काळेश्वरी, विठ्ठल मंदिर, भैरी भवानी, रवळनाथ, श्रीकृष्ण, गणेश, मारुती पार, कालिका...
_Bhusa_Shegadi_1.jpg

भुस्सा शेगडी

गृहिणींना इंधन मिळवण्यासाठी सात दशकांपूर्वी, स्वातंत्र्यपूर्व काळात खूप हाल सोसावे लागले. त्यांनी त्याकरता डोळ्यांतून टिपेही गाळली आहेत. उच्चवर्गीय, सुस्थित महिलादेखील त्यातून वगळल्या गेल्या नव्हत्या....