रॉबिन अंड्राडीस
वसईचे तळाण – पक्षीप्रेमींचा आनंद (Bird Watchers Love Vasai’s Talan)
वसईचा तळाण भूभाग म्हणजे पक्षी निरीक्षकांना मोठी पर्वणी असते! तो उथळ पाणथळीचा मोठा भूभाग. वसईच्या रेल्वे लाईनच्या पूर्व-पश्चिम बाजूंला तसा बराच मोठा भाग आहे. तो भाग तेथे असलेल्या मिठागरांमुळे झालेला आहे.