सोफिया कॉलेट – राममोहन यांची निष्ठावंत (Sophia Collet – Rammohan Roy’s Devoted Follower)

0
सोफिया डॉब्सन कॉलेट ही स्त्री ब्रिटनमध्ये एकोणिसाव्या शतकात होऊन गेली. तिने भारतीय राजा राममोहन रॉय यांच्या कार्याचा ध्यास असा घेतला, की मला राधा आणि कुब्जा या मिथकांची आठवण झाली!

ब्रिटिश मिशनरी आणि मराठी म्हणी (British Missionaries and Marathi Proverbs)

7
जगाच्या पाठीवर ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणाऱ्या मिशनरी लोकांनी जगभरातील लोकांच्या शारीरिक प्रकृतीची काळजी तर घेतलीच, पण ते जेथे जेथे गेले तेथील लोकांशी एकरूपही झाले!

गणपत लक्ष्मण कोण होते? (Ganpat Laxman’s Writing Published After One Hundred Fifty Years!)

मुंबई व आसपासच्या भागातील हिंदू कुटुंबे 1840 च्या आगेमागे कशी होती? घरात वातावरण कशा प्रकारे होते? मुलांचे संगोपन कशा प्रकारे केले जात असे? घरातील स्त्रियांची स्थिती कशी होती?

दुलिपसिंगांचे स्वेच्छा धर्मांतर व शीखांचा इतिहास (Duleep Singh’s Conversion to Christianity and Sikh History)

0
हिंदुस्थानात ख्रिस्ती धर्माचा प्रसार पंधराव्या शतकापासून सुरू झाला. मात्र ज्या ब्रिटिशांनी हिंदुस्तानावर दीडशे वर्षे राज्य केले, त्या ब्रिटिश सरकारने व त्यांचे पूर्वसुरी ईस्ट इंडिया कंपनी यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराला अधिकृत रीत्या पाठिंबा देणे फार उत्साहाने कधी केले नाही.

दिवटा

आदिमानवाने अग्नी निर्माण केला तेव्हा तो इतर प्राण्यांपासून वेगळा आणि श्रेष्ठ ठरला. त्याच वेळी,अग्नीमुळे मानव निसर्गापासून दूरही झाला. त्याने हळुहळू निसर्गव्यवहारात हस्तक्षेप सुरू केला. मानवाने प्रगती शिकार केलेले मांस अग्नीवर भाजण्यापासून ते अग्नीचा प्रकाशासाठी उपयोग करण्यापर्यंत साधली.

हातखंडा

काम हमखास पार पाडण्याचे कौशल्य अंगी असणे म्हणजे हातखंडा. तर हातखंड म्हणजे मधून मधून सोडवणूक करणारा, मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); तसेच अडल्यावेळी उपयोगी पडेल अशी व्यक्ती.

हळदिवी (Haldivi)

हळदिवा किंवा हळदिवी याचा शब्दकोशातील अर्थ हळदीच्या रंगाचा, पिवळा असा आहे. शब्द आरती प्रभू यांच्या कवितांमध्ये अनेकदा दिसतो. प्रामुख्याने ‘जोगवा’ या काव्यसंग्रहातील कवितांमध्ये. हळदिवी हा शब्द किती वेगवेगळ्या संदर्भात आणि तरीही चपखलपणे त्या कवितांमध्ये आला आहे.

ख (Kha)

‘ख’ हे वर्णमालेतील एक अक्षर असले तरी ‘ख’ हा एकाक्षरी शब्दही आहे. ख म्हणजे आकाश. त्यावरून आकाशातील ग्रहांना खगोल आणि त्यांच्या अभ्यासाला खगोलशास्त्र असे म्हटले जाते. ‘ख’ म्हणजे आकाशात, ‘ग’म्हणजे गमन करणारा असा तो खग (पक्षी).

साहित्य संमेलन – उस्मानाबादने धडा शिकवला! (Sahitya Sammelan – Osmanabad teaches a lesson)

0
साहित्य संमेलनाच्या संयोजनाचा सुवर्णमध्य गाठण्याची जरूरी आहे असा निष्कर्ष चर्चेअखेरीस निघाला. चर्चा उस्मानाबादमधील संमेलनानिमित्ताने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ व ‘ग्रंथाली’ यांनी योजली होती. मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष, लेखक उषा तांबे आणि कवी-लेखक-पत्रकार विजय चोरमारे हे चर्चेच्या केंद्रस्थानी होते.
_d._b_kulkarani

द.भि. कुलकर्णी – समीक्षेचा सृजनव्यवहार (D.B. Kulkarni Marathi Critic)

द.भि. कुलकर्णी हे ज्येष्ठ समीक्षक म्हणून ख्यातनाम होते. त्याचमुळे त्यांची निवड त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यात 2010 साली झाली होती. समीक्षक ही त्यांची पहिली ओळख, तर जाणकार संगीत श्रोता आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक हे त्यांचे आणखी काही खास पैलू. द.भि. कुलकर्णी हे समाजातील वास्तव स्पष्ट शब्दांत मांडत. ते वाचकांना सांगत असे, की “आजच्या विज्ञानयुगात असून तुम्ही वैज्ञानिक दृष्टी स्वीकारत नाही, तर मनोरंजनाची दृष्टी स्वीकारता. तुम्ही दूरदर्शनवर करमणुकीचा कार्यक्रम पाहत असाल तर त्याचा आनंद घेणे बरोबर आहे, मग ते नृत्य असो, संगीत असो किंवा नाटक, सिनेमा, क्रिकेटची मॅच, काहीही. पण तुम्ही करमणूक म्हणून भूकंप, अवर्षण, अपघात, दहशती हल्ले यांची दृश्येही पाहत असाल तर तुमची संवेदना बोथट झाली आहे, असे मी समजतो...