मराठी घरात लग्न किंवा मुंज यांसारखे मंगल कार्य ठरले, की लगेच केळवणाची आमंत्रणे येण्यास सुरुवात होते. केळवण हा लग्न, मुंज यांसारख्या मंगलकार्यापूर्वी होणारा समारंभ आहे. त्यामध्ये वधू आणि वर यांच्या स्वतःच्या घरी स्वतंत्रपणे थाटाने मेजवानी करून नातेवाईकांना जेवायला घातले जाते. तसेच, नातलगही त्यांच्या त्यांच्या घरी वधूला किंवा वराला मेजवानी देतात आणि भोजनोत्तर घरचा अहेरही देतात. त्याला यजमानांनी केळवण केले असे म्हटले जाते...