साहित्य

साहित्‍य या विषयाशी संलग्‍न असलेली माहिती, संशोधन, टिका, पुस्‍तक परिचय तसेच परिक्षण या स्‍वरुपाचे लेख या विभागात सादर केले जातात.

पियूची वही : गोष्टीमागची गोष्ट… (Piyu’s journal: The story behind a story...

आईनस्टाईन यांनी लिहिलेले एक सुपरिचित वाक्य आहे ‘जर तुमची मुले बुद्धिमान व्हावीत, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांना परीकथा वाचायला द्या… जर तुम्हाला ती आणखी बुद्धिमान व्हावीत असे वाटत असेल, तर त्यांना आणखी परीकथा वाचायला द्या’. त्यामुळे छोट्या मुलांचे अवकाश वाढीला लागते, कल्पनाशक्ती विकसित होते, अनुभव घेण्याची उर्मी वाढते. संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या ‘पियूच्या वही’ने छोट्यांच्या विश्वात असाच अवचित प्रवेश केला आहे. त्यातल्या छोट्या पियूने जे जे केले ते ते करायला उत्सुक असणारी मुले. गोष्टी छोट्या पण आशयघन बदल घडवू शकणारे छोट्यांचे सगळे अनुभव. त्यातून त्यांच्या स्वतंत्र वह्या निर्माण झाल्या. असे सकस वाचन वाऱ्याच्या वेगाने फैलावले तर मोबाईल आणि इंटरनेटमध्ये अडकून कोसळणारे लहानांचे बाल्य सावरायला नक्की मदत होईल...

ऋतु बरवा : सहा ऋतूंचे सहा सोहळे… ( Rutu Barwa – ...

वातावरणातील ऋतुचक्र सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीमुळे निर्माण होते. म्हणजे ऋतू सूर्यसंक्रांतीवर अवलंबून असतात. ती वस्तुस्थिती महाभारत काळातदेखील माहीत होती. असे असताना, दुर्गाबाईंनी चांद्रमासांवर आधारित ऋतुचक्र का लिहिले हा मला पडलेला प्रश्न आहे... ऋतुचक्राचा मेळ चैत्र, वैशाख वगैरे चांद्रमासांशी बसत नाही. मी मराठवाड्याच्या रखरखीत पठारावर जन्मलो. अठ्ठावन्न वर्षे तिकडेच काढली. पुण्याला आलो तो येथील झाडांच्या ओढीने. पुणे हे सर्वाधिक वृक्षविविधता असलेले, अतिशय वृक्षसमृद्ध असे शहर आहे हे मला वाचून माहीत होते. येथे सह्याद्री आहे. चार नद्या आणि सात धरणे आहेत...

मार्सेलिसची मासीया – रशियन तरुणीचे भारतप्रेम (Massia Bibikoff’s book on an Indian in first...

0
मार्सेलिस हे फ्रान्सच्या किनाऱ्यावरील बंदर म्हणजे सावरकरभक्तांचे तीर्थस्थान आहे. सावरकर यांनी 1910 साली त्याच ठिकाणी समुद्रात उडी घेतली आणि ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटण्याचा प्रयत्न केला. त्या मार्सेलिसमध्ये, सावरकर यांच्या उडीनंतर चारेक वर्षांनी रशियन रेखाटनकार आणि भारतीय संस्थानिक यांच्या मैत्रीची कथा आश्चर्यजनक अशी जन्मली व फुलली. ती कथा शब्दांत तर मांडली गेलीच, पण त्याहीपेक्षा ती चित्रांतून- रेखाचित्रांतून व्यक्त झाली. ते स्वाभाविकपणे घडून आले...

नोरा रिचर्ड्स पंजाबी रंगभूमीची आयरिश आजी (Nora Richards – The Irish Mother of Punjab’s...

1
कबीर बेदीची आई फ्रेडा बेदी. फ्रेडावर दोन पुस्तके आहेत. ती जेव्हा कांगडा जिल्ह्यातील आंद्रेत्ता येथे राहण्यास गेली तेव्हा तिला नोरा रिचर्ड्स नावाच्या आयरिश अभिनेत्रीने मोकळी जमीन दिली. फ्रेडाने तिचे घर तेथे उभे केले. साहजिकच, उत्सुकता निर्माण झाली की ही नोरा कोण? ती हिंदुस्तानात का आणि केव्हा आली होती? आणि ती अभिनेत्री होती तर तिने कांगडासारख्या दूर, निसर्गरम्य जिल्ह्यात राहण्याचे का ठरवले ?

धरणगाव – बाजार व संस्कृती यांनी उत्सव संपन्न ! (Dharangaon – can culture prevail...

धरणगाव हे शहरवजा गाव जळगाव जिल्ह्याच्या मूळ एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठे गाव होय. ते मोठे असल्यामुळे, खरे तर, धरणगाव हेच तालुक्याचे गाव वाटे. त्याप्रमाणे एरंडोल तालुक्याचे विभाजन 2008 मध्ये होऊन स्वतंत्र धरणगाव तालुका अस्तित्वात आला. धरणगावची नगरपालिका 1867 मध्ये स्थापन झाली होती...

दापोलीतील साहित्यजीवन

‘श्यामची आई’, ‘गारंबीचा बापू’ या साहित्यकृतींमुळे दापोलीचा ठसा साहित्य क्षेत्रात उमटला. दापोली हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे. तेथील तरुण वर्ग मुंबई-पुण्याकडे ‘करिअर’साठी जात आहे. असे असतानाही दापोलीचा निसर्ग, तेथील जीवन बाहेरगावी गेलेल्या तरुणांच्या मनातून जात नाही. ती ते त्यांच्या साहित्यातून प्रकट करतात. खुद्द दापोलीत राहणारे साहित्यिकही त्यांच्या परीने त्या करता धडपडत असतात. त्यांचा आढावा...

मॅक्सिन बर्नसन – शिक्षणातील दीपस्तंभ (Maxine Berntsen – Life long efforts for model school)

मॅक्सिन बर्नसन या नॉर्वेजिअन अमेरिकन विदुषी तरुण वयात भारतात आल्या आणि भारताच्याच झाल्या. त्यांचे शिक्षण क्षेत्रात काम मोलाचे समजले जाते. मॅक्सिन बर्नसन या त्यांच्या पीएच डी च्या अभ्यासाची तयारी करत असताना त्यांच्या कॉलेजमध्ये इरावती कर्वे व्याख्यान दौऱ्यावर आल्या होत्या. इरावती कर्वे यांनी त्यांना फलटणला जाण्यास सुचवले. तेथे त्यांची मुलगी जाई निंबकर राहत असे. म्हणून त्या फलटण या गावी 1966 साली आल्या. तीच मॅक्सिनबाईंची कार्यभूमीही झाली !

विवेकचूडामणि – मराठी अनुवाद घडला हे खरे !

मी कवी किंवा साहित्यिक म्हणून आद्य शंकराचार्य यांच्या वाङ्मयाशी जोडला जावा असे ‘पुण्य’ घडल्याचे आठवत नाही. पण खरोखरीच, आले देवाजीच्या मना... तसे घडले आणि माझ्या हातून ‘विवेकचुडामणि’ या महान संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद होऊन गेला ! एकदा गंमत घडली ! माझी गजल ‘दैनिक सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली. ती वाचून गझल गायक भीमराव पांचाळे यांनी लिहिले, की ती कविता ‘व्योमगंगा वृत्ता’त आहे. तोपर्यंत त्या नावाचे वृत्त आहे, हे माझ्या गावीही नव्हते ...

मराठी भाषा-साहित्य : अचलपूरचे योगदान

अचलपूर तालुक्याने मध्यप्रदेश या हिंदीभाषिक राज्याच्या सीमेवर असतानासुद्धा मराठी भाषा केवळ जगवली नव्हे तर वाढवलीसुद्धा आहे. अचलपूर परिसरातील बोलीचे सौंदर्य, तिचे उच्चारविशेष, रूपविशेष, तिचे आगळेपण भाषातज्ज्ञसुद्धा मान्य करतात. मूळात अचलपूरला मोठी वाङ्मयीन परंपरा लाभलेली आहे. ती मराठी भाषेच्या वृद्धीकरता पूरक ठरलेली आहे...

तोरू दत्त – पहिली हिंदुस्थानी इंग्रजी कादंबरीकार (Toru Dutt – First Indian Novelist in...

0
तोरू दत्त ही पहिली हिंदुस्थानी इंग्रजी कादंबरीकार. तिचे काव्यही युरोपात अठराव्या शतकात गाजले. तिने फ्रेंच भाषेतही लेखन केले. तिचे एकूण दत्त कुटुंब हेच लोकविलक्षण होते. त्यांनी विल्यम कॅरे या इंग्रजी धर्मप्रसारकास आश्रय दिला; स्वत: ख्रिश्चन धर्म स्वीकारला, इंग्लंडला स्वत:ची मातृभूमी मानले आणि प्रेम मात्र हिंदुस्थानवर केले व हिंदुस्थानी जनतेची काळजी वाहिली...