Home मराठी भाषा मराठीकारण

मराठीकारण

मराठी (व एकूणच स्थानिक) भाषा व संस्कृती ही मुळात टिकणार कशी हा प्रश्न जाणकार (मराठी) जनांना भेडसावत असतो. त्याच बरोबर भाषा व संस्कृती यांच्या संवर्धनाच्या गोष्टीही काही डोक्यात असतातच. त्याकरता क्रियाशील मंडळी त्यांच्या त्यांच्या परीने वेगवेगळ्या तऱ्हांची कामे करत असतात. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ आणि त्याचे माध्यम ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ यांमार्फत आम्ही असे ठरवत आहोत, की जगातील साऱ्या कर्तबगार मराठी जनांना, त्यांच्या कार्याला एका सांस्कृतिक दुव्याने जोडून घ्यावे – त्यांच्याकडील माहितीचे व ज्ञानाचे आदानप्रदान व्हावे आणि अशा तऱ्हेने मराठी माणसाचे शक्तिसामर्थ्य प्रकटावे. तेच ‘मराठीकारणा’चे स्वप्न ! शिवाजी राजांना रयतेचा राजा म्हटले जाते, ते वेगळे काय होते? ते स्वप्न जगभर पसरलेल्या मराठी समाजाने साकारण्याचे आहे. जागतिकीकरणाच्या काळात मराठी समाजाच्या इष्ट वृत्तिप्रवृत्ती, स्वभावविशेष, सवयी, इच्छाआकांक्षा जपल्या तर जाव्यातच; पण त्याबरोबर त्यांना जागतिक चित्रात अढळ व अव्वल स्थान मिळावे ही भावना आहे. बदलत्या काळात मराठी भाषा बदलणार, नवे रूप घेणार, ते जाणून घ्यावे आणि त्याच वेळी मराठी भाषेचे संवर्धन सार्वजनिक पातळीवर निकोप पद्धतीने व्हावे यासाठी ‘इंटरअॅक्टिव्ह’ पद्धतीने प्रयत्नशील राहवे यासाठी तीन सदरे योजली आहेत.

मराठी भाषा शब्दशोध शब्‍दार्थ

महापालिकेत मराठी : मृणाल यांची मोहीम (Marathi in Municipal Corporation of mumbai : Mrunal...

मी वसुधा सहस्रबुद्धे. माझे माझ्या देशावर, महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर प्रेम आहे. परंतु मधल्या काळात राजकारणात इतक्या विचित्र अनाकलनीय घटना घडल्या, की मला भारतीय नागरिक म्हणून वाईट वाटले. त्यावेळी जनसेवेचे व्रत घेतलेल्या मृणाल गोरे यांची आठवण झाली. सध्याच्या तरुण पिढीला गोरे यांच्या निःस्पृह, निर्भय व आदर्श व्यक्तिमत्त्वाची ओळख करून द्यावी असे वाटले. अशा प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा परिचय एकपात्री प्रयोगातून सर्वांसमोर मांडावा असा प्रयत्न आहे. मनात असा विश्वास वाटला, की आजही एखादे असे व्यक्तिमत्त्व निर्माण होईल, की जे सर्वांना एकत्र घेऊन फक्त जनतेसाठी काम करेल ! त्यामुळेच मी मृणाल गोरे यांचे संघर्षपूर्ण जीवन काही प्रसंगांतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे...

मराठी जगवायची कशी, विस्तारायची कशी?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या प्रसारासाठी पुढाकार घेऊन जबाबदारीने सातत्यपूर्ण काम करण्याची गरज आहे. ह्या दृष्टीने मुंबई येथील सोमैया विद्यापीठात, भाषा आणि साहित्य तसेच ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विदयमाने ‘मराठी जगवायची कशी, विस्तारायची कशी?’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मराठी भाषेतून संभाषण व संवाद करणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहे. त्यामुळे तसे प्रयत्न करावेत व मराठीचा विस्तार साधावा असा अभिप्राय व्यक्त झाला. या कार्यशाळेला एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली...

अभिजात दर्जा मिळाला… आता पुढे काय?

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. त्यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठरवलेले होते. 2004 मधील निकष 2005 मध्ये सुधारित करण्यात आले. ते चार निकष जी भाषा पूर्ण करेल, त्या भाषेला हा अभिजाततेचा दर्जा मिळतो. त्यानुसार आतापर्यंत प्रारंभी तमिळ (2004) आणि संस्कृत (2005) भाषेला असा दर्जा मिळाला. त्यानंतर तेलुगु (2008), कन्नड (2008), मल्याळम (2013) आणि उडिया (2014) याही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. हे निकष 2024 मध्ये सुधारित करण्यात आले. त्यानुसार मराठीसोबत पाली, प्राकृत, बांगला आणि आसामी या भाषांनाही हा अभिजात दर्जा देण्यात आला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर दोनशे-तीनशे कोटी रुपये वगैरे मिळणार नाहीत. दूरदृष्टी ठेवून प्रकल्प आखावे लागतील तेव्हाच काही कोटी रूपये मिळू शकतील. त्यासाठी अभ्यासकांनी विचार करण्यास हवा...

मराठी – अभिजात भाषा !

5
भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्यावर तिचा विकास-संवर्धन-अभिवृद्धी यासाठी राज्य सरकारला दरवर्षी तीनशे ते पाचशे कोटी रुपयांचे अनुदान मिळते. महाराष्ट्र सरकारने मराठीसाठी अभिजाततेचा दावा केंद्र सरकारकडे (2012-2013) करून, अटी सिद्ध करण्याचे काम केले. ते काम साहित्यिक-संशोधकांच्या एका अभ्यास समितीने पूर्ण केले. मराठी भाषेने 2013 साली केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर अकरा वर्षांनी मराठीला तो दर्जा प्राप्त झाला आहे. मराठीसोबत अजून चार भाषांना तो दर्जा त्याच दिवशी मिळाला. मग मराठी ही देशातील सातवी अभिजात भाषा की अकरावी? भारताच्या राज्यघटनेने मान्यता दिलेल्या बावीस भाषांपैकी अकरा म्हणजे अर्ध्या भाषा आता अभिजात ठरल्या आहेत...

‘अ’चे सहा अर्थ

नामाच्या किंवा विशेषणाच्या आधी जोडल्या जाणाऱ्या ‘अ’ला असलेले सहा अर्थ ग्रंथित करणारा श्लोक असा आहे – तत्सादृश्यमभावश्च तदन्यत्वं तदल्पता । अप्राशस्त्यं विरोधश्च नञर्थाः षट् प्रकीर्तिताः...

भाषेतील भर आणि प्रदूषण

भाषा ही नदीसारखी असते. नदी उगमापासून तुटत नसते. पण तिला ओढे, छोट्या नद्या येऊन मिळत राहतात आणि ती पुढे वाहत राहते. पण नदी प्रदूषित होऊ नये म्हणून जागरूक राहणेही आवश्यक असते. नाहीतर काय होते, ते नुकसान आधुनिक मराठी भाषा अनुभवत आहे. भाषा ही प्रदूषित होऊ नये म्हणून जागरूक असले पाहिजे...

आख्यान, व्याख्यान, उपाख्यान आणि उखाणा

0
शब्दांचे धागे एकमेकांत गुंतलेले असतात. धाग्यांतील रंग वेगवेगळया भाषांतील असतात. आख्यान, व्याख्यान, उपाख्यान हे शब्द ऐकताना सारखे वाटतात. परंतु, हे वेगवेगळे शब्द आहेत. या शब्दांची निर्मिती कशी झाली असेल? उखान्यांचा नाव घेणे याच्याशी काय संबंध आहे ते शब्दशोधच्या या लेखाद्वारे जाणून घेऊया...

लाच (Bribe)

निजाम-उल्मुल्क याचा फिदबी खान नावाचा दिवाण होता. तो इनाम, वतने, सरंजाम, जहागिरी इत्यादी प्रकरणांत सारख्या शिफारसी करत असे. त्यामुळे त्याला चांगलीच प्राप्ती होत असे. त्यावेळी फिदबी खानाने सणसणीत बाणेदार उत्तर दिले...

बादरायण संबंध

0
स्वत:च्या क्षुद्र ज्ञानाचा व कार्याचा संबंध दुसऱ्या थोर व्यक्तीशी वा कार्याशी जोडणे. तसेच, प्रत्यक्षात काहीही- कसलेही नाते नसताना, ओढूनताणून जवळीक साधण्यासाठी नसती नाती जोडण्याचा यत्न म्हणजे बादरायण संबंध !

साहेब कोणी कोणाला म्हणावे? (What does word saheb mean?)

पंकजा मुंडे वडिलांचा उल्लेख मुंडेसाहेब असा करतात, सुप्रिया सुळेही वडिलांचा उल्लेख तसाच साहेब म्हणून करतात, राजकीय नेते एकमेकांना विधानसभेत साहेब म्हणतात व कार्यकर्तेही त्यांच्या नेत्यांना साहेब म्हणतात. हे नवीनच विचित्र नाव पुढे आले आहे...