Home वैभव ग्रामदेवता

ग्रामदेवता

बिळवसचे सातेरी देवीचे जलमंदिर (Sateri Temple surrounded by water at Bilwas-Konkan)

0
कोकणात सातेरी देवीची मंदिरे अनेक, परंतु मालवण तालुक्यातील बिळवस सातेरी मंदिर हे अधिक प्रसिद्ध आहे, कारण कोकणात आढळणाऱ्या सातेरी देवींच्या मंदिरांपैकी ते एकमेव असे जलमंदिर आहे - त्या देवीचा आषाढ महिन्यात जत्रोत्सव होतो. ती मसुरे गावातील बारा वाड्यांची ग्रामदेवता आहे. श्री सातेरी देवीचे जलमंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वी उभारले आहे !...
carasole1

माढ्याचे विठ्ठल मंदिर आणि मूळ मूर्तीचा वाद

10
पंढरपुरातील विठ्ठलमूर्ती खरी की पंढरपूरजवळच्या माढा गावातील? या डॉ.रा.चिं. ढेरे यांच्या संशोधनावरून ऐंशीच्या दशकात मोठा वाद झाला, पण खऱ्या विठ्ठलभक्ताला त्या वादात रस नाही....
-bhalchandra-maharaj

कणकवलीचे भालचंद्र महाराज

1
भालचंद्र महाराज वास्तव्याला आले म्हणून कणकवली हे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव ‘श्रीक्षेत्र कणकवली’ झाले. भालचंद्र यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी परशुराम ठाकूर...
_Sangam_Mahuli_1.png

संगम माहुली

1
संगम माहुली या गावी मराठा इतिहासाच्या खुणा आढळतात. ते ठिकाण साताऱ्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. ते कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर असल्यामुळे त्या गावाचे दोन भाग पडतात - अलीकडे 'संगम माहुली' आणि पलीकडे 'क्षेत्र माहुली'. छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे नदीच्या काठी आहेत...

बेणीखुर्दचे कालभैरव- योगेश्वरी मंदिर (Benikhurd’s Kalbhairav- Yogeshwari Temple)

1
कालभैरवाची मंदिरे महाराष्ट्रात ठिकठिकाणी आहेत. त्यांची नावे ज्योतिबा, भैरोबा, खंडोबा आणि रवळनाथ अशी आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील बेणीखुर्द येथील कालभैरव- योगेश्वरीचे देवस्थान ही त्या आसमंतातील लोकांची ग्रामदेवता आहे, मात्र ते कुलदैवत शेरे, दळी, कुष्टे आणि बाहेरून कोकणात येऊन स्थायिक झालेले खेर व हर्डीकर ह्या घराण्यांचे आहे. खेरांचे मूळ गाव अंबाजोगाई. ते अंबाजोगाईकडून कोकणात आले, म्हणून तेथील देवता जोगेश्वरी-कालभैरव ही त्यांची कुलदेवता झाली...

श्री दत्त मंदिर: अचलपूरचा भुलभुलैया (Shri Datta Temple of Achalpur)

अचलपूर येथील दीडशे वर्षे जुने दत्त मंदिर हे भुलभुलैया मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराला धार्मिकतेबरोबर ऐतिहासिक व प्राचीन महत्त्व आहे. मंदिराचे बांधकाम शेसव्वाशे वर्षांपूर्वीचे असावे...

दिग्रसचे दत्तगुरू मंदिर

0
दिग्रस तालुक्यातील प्रसिद्ध दत्तमंदिर दत्तोबा या नावाने ओळखले जाते. ते रामकृष्ण तायडे यांच्या शेतात आहे. ते दिग्रस शहरापासून साडेबारा किलोमीटर अंतरावर बेलोरा गाव परिसरात येते. त्या शेतात दत्तमंदिर असल्यामुळे शेताचे नावही दत्तोबा असे पडले आहे. तो विदर्भाचा यवतमाळ जिल्हा. दत्तोबा हे स्थान माहूरगड आणि कारंजा लाड या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गावांपासून प्रत्येकी पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे...

फलटणचे श्रीराम मंदिर

फलटणचे श्रीराम मंदिर जब्रेश्वर मंदिराच्या उत्तरेला आहे. ते मंदिर सगुणाबाई निंबाळकर यांनी शके 1696 मध्ये बांधले. मुख्य मंदिरापुढील लाकडी मंडपाचे बांधकाम मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांनी शके 1797 मध्ये केले. मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ व सभामंडप अशी आहे...
_EtihasikSandarbhacge_Natepute_4.jpg

ऐतिहासिक संदर्भांचे नातेपुते

नातेपुते हे गाव सोलापूर, सातारा व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. पूर्वेला अकलूज, पश्चिमेला फलटण, दक्षिणेला दहिवडी, उत्तर दिशेला बारामती ही सरासरी...

राजाळेच्या जानाई देवीचा यात्रोत्सव

राजाळे गावात मंदिरे जरी अनेक असली तरी जानाई देवीचे स्थान अनन्य आहे. मंदिरामुळे गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. भाविक श्री क्षेत्र राजाळे नगरीत कर्नाटक, विजापूर, अहमदनगर, परभणी, बीड, चंद्रपूर या ठिकाणांहून येत असतात...