माणूसपणाच्या वाटेवरील प्रवासी

कुमार शिराळकर हे डाव्या विचारांचे कार्यकर्ते होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या मुख्यत: सीटू या कामगार युनियनचे कार्यकर्ते यांनी मिळून ‘माणूसपणाच्या वाटेवरील प्रवासी’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ औरंगाबाद येथे 7 जानेवारी रोजी आयोजित केला होता. या पुस्तकात ‘मागोवा’च्या मित्रमंडळींना कुमार कसा दिसला याची मांडणी पाच लोकांनी केली आहे आणि बाकी दहा लेख हे आदिवासी कार्यकर्ते व युनियनमधील कार्यकर्ते यांनी लिहिलेले आहेत. प्रत्येक लेख हा कुमारबद्दलच्या कृतज्ञतेने गहिरून लिहिलेला आहे...

कुमार शिराळकर – महाराष्ट्राचे चे गव्हेरा

कुमार शिराळकर या डाव्या विचारांच्या तरुण तडफदार कार्यकर्त्याबाबत दोन लेख आहेत. पहिला शहादा – धुळे येथील श्रीनिवास नांदेडकर व वसंतराव पाटील या कार्यकर्त्याचा व दुसरा मुंबईतील विदुषी छाया दातार यांचा. कॉम्रेड कुमार शिराळकर हे सांगली जिल्ह्यातील मिरजेचे. त्यांचा जन्म 10 जानेवारी 1942 रोजी मिरज येथे झाला...

मी पाहिलेले दैनिकांचे संपादक

रवींद्र पिंगे यांचा दैनिकांच्या संपादकांबद्दलचा जुना लेख. त्यात ते म्हणतात, दैनिकांची वाट पाहणाऱ्यांपैकी मी नव्हेच नव्हे. दैनिके चार दिवस दिसली नाहीत तर माझे मन बिलकुल अस्वस्थ होणार नाही. अनेकदा, वर्तमानपत्र घरात येऊनही मी इतर व्यापांमुळे त्यांच्याकडे पाहतसुद्धा नाही. गेल्या अर्धशतकात मी जी काही वर्तमानपत्रे वाचली, त्यात तीन संपादकांची शैली मला अप्रतिम वाटली: फ्रँक मोराईस, रावसाहेब पटवर्धन आणि ग. प्र. प्रधान. त्यांच्यात अभिजात असा खानदानीपणा आहे. भाषाप्रभुत्व असामान्य आहे. विचारांना नैतिक अधिष्ठान आहे. आविष्कार सौम्य आहे. आवाहन आहे. आव्हान नाहीच आणि आग्रहाचे नावच नाही. तसे घरंदाज लेखन मला भुरळ घालते...

बहनो और भाइयो… (Ameen Sayani)

अमीन सायानी यांचे 21 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. पन्नास वर्षांहून अधिक काळ ज्या आवाजाची जादू या देशातल्याच नाही तर जगभरातल्या भारतीय चित्रपट संगीतप्रेमींच्या हृदयावर चालली ज्या आवाजाने चार पिढ्यांच्या कानांचीच नाही तर मनांचीही मशागत केली आहे. भारतीय चित्रपट संगीत हे मनामनांना जोडणारा अद्भुत धागा आहे.एक्याण्णव वर्षांचे समृद्ध आयुष्य जगून अमीन सायानी गेले. रफी-लता-किशोर या जादुई आवाजांइतकाच त्यांचा जादूई आवाज श्रोत्यांच्या कानात गुंजत राहील...

नारायण मेघाजी लोखंडे – भारतीय कामगार चळवळीचे जनक (Father of the Indian Labour Movement...

नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असे सार्थपणे म्हटले जाते. ते महात्मा जोतीराव फुले यांचे सहकारी होते, रावबहादूर होते. त्यांची भूमिका धर्म, जाती यांवरून कष्टकऱ्यांमध्ये, समाजात फूट पडू नये अशी होती. ते मराठा ऐक्येच्छू सभा, मराठा रुग्णालय यांचे संस्थापक होते. त्यांनी ‘पंचदर्पण’ या पुस्तिकेचे लेखन, ‘सत्यशोधक निबंधमाला’ अथवा ‘हिंदू धर्माचे खरे ज्ञान’ या पुस्तिकांचे लेखन; तसेच, ‘दीनबंधू’तून समाजाभिमुख परंतु परखड लेखन सातत्याने केले...

मधू दंडवते – झुंजार समाजवादी नेता (Madhu Dandavate- Birth centenary of a socialist leader)

4
मधू दंडवते यांचे नाव संसदेत ठसा उमटवणाऱ्या काही महत्त्वाच्या मराठी नेत्यांमध्ये आवर्जून घेता येईल. ते लोकसभेवर राजापूर मतदार संघातून जवळजवळ वीस वर्षे सातत्याने निवडून आले. त्यांनी जनता पक्षाचे सरकार केंद्रात आले तेव्हा मंत्रिपदही भूषवले. दंडवते यांनी मोरारजी देसाई यांच्या सरकारात रेल्वे मंत्री म्हणून (1977) त्यांचा कार्यकाळ गाजवला. त्यानंतर ते व्ही.पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. ते व्यवसायाने प्रोफेसर होते. मधू दंडवते यांची जन्मशताब्दी 21 जानेवारी 2024 रोजी साजरी झाली...

सुनंदाताई पटवर्धन – एक प्रेरणास्थान

1
सुनंदाताई पटवर्धन यांच्या दुःखद निधनाची (10 जानेवारी 2024) बातमी वाचली आणि हृदयाचा एक ठोका चुकला. सुनंदाताई आणि माझा संपर्क पंधरा वर्षांहून अधिक काळचा. मी रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बन आणि प्रभाकर फाऊंडेशन यांचा प्रतिनिधी म्हणून 2007 च्या सुमारास सुनंदाताई आणि त्यांच्या ‘प्रगती प्रतिष्ठान’ संस्थेच्या संपर्कात आलो. सुरुवातीला जव्हार-मोखाडे भागात आदिवासी मुलांना सायकल वाटप, महिलांना घरघंटी वाटप अशा उपक्रमांतून सुनंदाताई यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली...

वि.स. खांडेकर- एक विसावा (Remembering V.S. Khandekar)

मराठीला पहिले ज्ञानपीठ मिळवून देणारे, मागच्या शतकातले विख्यात लेखक वि.स. खांडेकर यांची 11 जानेवारी 2024 रोजी एकशेपंचविसावी जयंती आहे. कथा, पटकथा, कादंबऱ्या, नाटके, ललितलेख, निबंध, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये खाडेकरांच्या नावावर पंचाहत्तरपेक्षा जास्त लेखनकृती आहेत. आजही त्यांच्या ‘अमृतवेल’, ‘उल्का’, ‘ययाती’, ‘क्रौंचवध’ या कादंबऱ्या वाचकप्रिय आहेत. त्यांच्या एकशेपंचविसाव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे लेखनिक राहिलेले राम देशपांडे त्यांच्या आठवणी सांगत आहेत...

मनकर्णिका ऊर्फ मनू – झाशीची राणी (Queen of Zhansi was Manu before she was...

झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र लिहिण्याचा प्रयत्न, द.ब. पारसनीस यांनी लिहिलेले पहिले चरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील शेसव्वाशे वर्षांत अनेक लोकांनी विविध अंगांनी केला आहे, त्या सर्वांमध्ये प्रतिभा रानडे यांचे ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ हा चरित्र ग्रंथ सर्वांगसुंदर आहे. त्या वेळच्या लोकांच्या भावना; तसेच, आजूबाजूची परिस्थिती याचे उत्तम दर्शन त्या पुस्तकामधून घडते...

इतिहासप्रसिद्ध कर्तबगार चार स्त्रिया (Four warrior women from the history of Maharashtra)

भारतीय इतिहासात चार कर्तृत्ववान, शूर स्त्रिया होऊन गेल्या. पैकी तिघी मराठी होत्या. त्या म्हणजे शिवाजी महाराजांची सून- राजाराम यांची विधवा पत्नी ताराराणी, इंदूरच्या मल्हारराव होळकर यांची विधवा सून अहिल्याबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि कित्तूर संस्थानची विधवा राणी चन्नम्मा. त्या तिघी जणी विधवा होत्या. ताराराणी, अहिल्याबाई यांचा लढा स्वकीयांबरोबर होता. राणी चिन्नम्मा आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यामध्ये खूप साम्य आहे...