‘अ’चे सहा अर्थ
नामाच्या किंवा विशेषणाच्या आधी जोडल्या जाणाऱ्या ‘अ’ला असलेले सहा अर्थ ग्रंथित करणारा श्लोक असा आहे – तत्सादृश्यमभावश्च तदन्यत्वं तदल्पता । अप्राशस्त्यं विरोधश्च नञर्थाः षट् प्रकीर्तिताः...
भाषेतील भर आणि प्रदूषण
भाषा ही नदीसारखी असते. नदी उगमापासून तुटत नसते. पण तिला ओढे, छोट्या नद्या येऊन मिळत राहतात आणि ती पुढे वाहत राहते. पण नदी प्रदूषित होऊ नये म्हणून जागरूक राहणेही आवश्यक असते. नाहीतर काय होते, ते नुकसान आधुनिक मराठी भाषा अनुभवत आहे. भाषा ही प्रदूषित होऊ नये म्हणून जागरूक असले पाहिजे...
आख्यान, व्याख्यान, उपाख्यान आणि उखाणा
शब्दांचे धागे एकमेकांत गुंतलेले असतात. धाग्यांतील रंग वेगवेगळया भाषांतील असतात. आख्यान, व्याख्यान, उपाख्यान हे शब्द ऐकताना सारखे वाटतात. परंतु, हे वेगवेगळे शब्द आहेत. या शब्दांची निर्मिती कशी झाली असेल? उखान्यांचा नाव घेणे याच्याशी काय संबंध आहे ते शब्दशोधच्या या लेखाद्वारे जाणून घेऊया...
लाच (Bribe)
निजाम-उल्मुल्क याचा फिदबी खान नावाचा दिवाण होता. तो इनाम, वतने, सरंजाम, जहागिरी इत्यादी प्रकरणांत सारख्या शिफारसी करत असे. त्यामुळे त्याला चांगलीच प्राप्ती होत असे. त्यावेळी फिदबी खानाने सणसणीत बाणेदार उत्तर दिले...
बादरायण संबंध
स्वत:च्या क्षुद्र ज्ञानाचा व कार्याचा संबंध दुसऱ्या थोर व्यक्तीशी वा कार्याशी जोडणे. तसेच, प्रत्यक्षात काहीही- कसलेही नाते नसताना, ओढूनताणून जवळीक साधण्यासाठी नसती नाती जोडण्याचा यत्न म्हणजे बादरायण संबंध !
साहेब कोणी कोणाला म्हणावे? (What does word saheb mean?)
पंकजा मुंडे वडिलांचा उल्लेख मुंडेसाहेब असा करतात, सुप्रिया सुळेही वडिलांचा उल्लेख तसाच साहेब म्हणून करतात, राजकीय नेते एकमेकांना विधानसभेत साहेब म्हणतात व कार्यकर्तेही त्यांच्या नेत्यांना साहेब म्हणतात. हे नवीनच विचित्र नाव पुढे आले आहे...
भावचिन्हांचा धुमाकूळ (Emojis Obstruction to Language Developement)
समाजमाध्यमांमध्ये विनोदी, गोड दिसणाऱ्या इमोजींचा वापर सहज आणि नित्याचे झाले आहे. विविध हृदये, रडके-दुःखी चेहरे, 'ब्लोईंग किसेस'... आणि अशा अडीचशेहून अधिक भावचिन्हांच्या मदतीने भावना व्यक्त करता येतात. मात्र ती पद्धत साचेबंद होत आहे का? उलट या चेहेऱ्यांमुळे खऱ्या भावना व्यक्त होणे नाहीसे झाले आहे...
इमोजी : चित्रलिपीच्या दिशेने आरंभ (Emojis Indicate the Direction of New Visual Language)
काही चित्रे लिप्यांमध्ये संगणकीय प्रगतीमुळे आणि विविध गरजांमुळे शिरली आहेत. त्यांना इमोजी म्हणजेच भावचिन्हे म्हटले जाते. ती भावचिन्हे कमीत कमी जागा व्यापून अधिकाधिक अर्थ व्यक्त करणारी असतात. त्यांच्या आधारे आधुनिक संदेशन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे, म्हणजेच अनेक चित्रे लिपीत शिरू लागली आहेत आणि त्यांच्या परिणामकारकतेमुळे त्यांचा वापरही वाढू लागला आहे.
भाषा: लोकसंस्कृतीचे वाहन (Culture expresses itself through Language)
भाषा हे लोकसंस्कृतीचे वाहन आहे. भाषेचा जन्म लोकसंस्कृतीतून होत असतो. लोकसंस्कृतीतील वस्तूंचा जसजसा लोप होऊ लागतो तस तसा त्या संदर्भातील भाषेचाही र्हास होऊ लागतो व भाषा नवे रूप घेते.
मराठी प्रमाण भाषा व बोली यांची परस्पर परावलंबिता (Spoken languages make language perfect)
प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांतील फरक काय? सर्वसामान्यपणे असे बोलले जाते की प्रमाण भाषा ती असते जी लिहिली आणि बोललीदेखील जाते. बोलीभाषा ही फक्त बोलली जाते.