Home व्यक्ती आदरांजली बी.जे. खताळ : सच्चा गांधीवादी… सच्चा माणूस (B. J. Khatal)

बी.जे. खताळ : सच्चा गांधीवादी… सच्चा माणूस (B. J. Khatal)

महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला आणि त्यात पराकोटीचा प्रामाणिकपणाकठोर शिस्त आणि तत्त्वनिष्ठा हे निकष लावून काही लोकांची नावे नोंद करावी असे म्हटले तर ती यादी बी.जे. खताळ या नावापासून सुरू होण्यास हवी. त्यांनी राज्याच्या विविध मंत्रिपदांवर बहुतांश काळ काम केले. त्यांनी निवृत्तीनंतर स्वतःला योगासनेविपश्यनावाचन-चिंतन यांत गुंतवून घेऊन वयाच्या एकशेएकाव्या वर्षापर्यंत विविध विषयांवर लिखाण केले… 

सकाळची वेळ होतीनगर जिल्ह्यातील प्रवरानगर साखर कारखान्याच्या फाट्यावरून सायरन वाजवत पोलिसगाडी आणि त्या मागोमाग मंत्रिमहोदय यांच्या गाड्या धावत होत्या. मंत्रिमहोदयांच्या खासगी सचिवाचे लक्ष बाहेर गेले. खुद्द मंत्रिमहोदयांची मुले त्या फाट्यावरील बस थांब्यापासून शाळेच्या दिशेने धावत होती. शाळा फाट्यापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर होती. सचिवाने मंत्रिमहोदयांना सांगितले, “साहेबमुलं पळत शाळेत चालली आहेतगाडी थांबवू का ?” मंत्रिमहोदयांनी चेहऱ्यावरील रेषही हलू न देता उत्तर दिले, “सरकारने ही गाडी मंत्र्यासाठी दिली आहेमंत्र्याच्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी नाही !” सचिव बिचारे गप्प झाले.

ही गोष्ट तेथेच संपत नाही. मंत्रिमहोदय प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरानगरच्या माध्यमिक विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाला हजर राहिलेभाषण केले. कार्यक्रम संपला. सगळेजण मंत्रिमहोदयांना निरोप देण्यासाठी त्यांच्या गाडीकडे निघाले. तेवढ्यात मंत्रिमहोदयांनी शाळेच्या प्राचार्यांना विचारले. तुमच्याकडे शाळेत उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना दंड किंवा शिक्षा काय केली जाते? मंत्रिमहोदयांना काय अपेक्षित आहे हे प्राचार्यांना समजेना. त्यांनी सांगितलेकी आम्ही विद्यार्थ्यांना विशिष्ट रकमेचा दंड करतो.” मंत्रिमहोदयांनी खिशातून पैसे काढले आणि प्राचार्यांकडे दिले. माझी दोन्ही मुले शाळेत आज उशिरा आलीत्यांनी वेळ पाळली नाही… तुमच्या नियमानुसार दंडाची ही रक्कमदंड मिळाल्याची पावती मुलांबरोबर पाठवून द्या.

ते मंत्री म्हणजे बी.जे. खताळ पाटील. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला आणि त्यात पराकोटीचा प्रामाणिकपणा, कठोर शिस्त आणि तत्त्वनिष्ठा हे निकष लावून काही लोकांची नावे नोंद करावी असे म्हटले तर ती यादी बी.जे. खताळ या नावापासून सुरू होण्यास हवी. त्यांनी राज्याच्या विविध मंत्रिपदांवर काम 1962 पासून ते 1985 पर्यंतचा बहुतांश काळ केले. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या धांदरफळ खुर्द येथे 26 मार्च 1919 रोजी झाला. घरात पाटीलकी वडिलोपार्जित होती. त्यांनी धांदरफळ येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यावर मॅट्रिकची परीक्षा बडोदा येथील गायकवाड महाविद्यालयातून 1938 साली पास केली आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यांना व्यापक समाजजीवनाची ओळख तेथेच झाली. त्यांनी कला शाखेची पदवी बडोद्यात घेतली आणि वकिलीचे शिक्षण पूना लॉ कॉलेजमध्ये पूर्ण केले. खताळ आणि दत्ता देशमुख पुण्यात एकाच खोलीत राहायचे.

खताळ यांनी महात्मा गांधी यांनी पुकारलेल्या ‘चलेजाव’ आंदोलनात भाग घेतला. ते राहत असलेल्या ताराबाई वसतिगृहात गुप्त बैठका चालत. पोलिसांनी त्यांच्या खोलीवर छापा घालून झडती घेतली होती. त्यात दत्ता देशमुख यांना अटक झाली. खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील साकूर, नांदूरखंदरमाळ भागात भूमिगत राहून लोकांमध्ये गुप्तपणे ब्रिटिशांविरुद्ध जागृतीचे अभियान राबवले.

त्यांचा विवाह संगमनेरचे पहिले आमदार के.बी. देशमुख (के.बी. हे बडोद्याच्या जागृतिकार पाळेकर यांचे जावई ) यांच्या कन्या प्रभावती यांच्याशी सत्यशोधक पद्धतीने 1943 साली झाला. खताळ यांनी संगमनेरमध्ये वकिली काही काळ केली. त्यांचा नावलौकिक अहमदनगर जिल्ह्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात व थेट कर्नाटकमधील विजापूरपर्यंत झाला. त्यांची नियुक्ती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व सिव्हिल जज म्हणून धुळे जिल्ह्यात 1952 मध्ये झाली. परंतु काँग्रेस पक्षाने त्याच वेळी त्यांना असेंब्लीच्या निवडणुकीला उभे राहण्यास सुचवले. त्यांनी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला व निवडणूक लढवली. पण त्यांना विजय मिळाला नाही.

त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा भाग म्हणून काँग्रेस पक्षातर्फे 1957 साली उमेदवारी नाकारली. त्यांनी संगमनेर सहकारी साखर कारखाना काढण्याचे ठरवले. त्यांनी कारखान्याचे चीफ प्रमोटर म्हणून भागभांडवल 1958 मध्ये गोळा केले. खताळ यांच्या जोडीला सर्वश्री दत्ता देशमुखभाऊसाहेब थोरातभास्करराव दुर्वेदत्ताजीराव मोरेपंढरीनाथ आंबरे आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेली इतर काही मंडळी होती. संगमनेर सहकारी साखर कारखाना दहा वर्षांनी उभा राहिला. त्यांचा 1962 च्या निवडणुकीत विजय झाला व लगेचच राज्याच्या मंत्रिमंडळात समावेशही झाला. त्यांनी त्यानंतर 19671972 व 1980 अशा चार निवडणुकांमध्ये संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधीत्व केले. त्यांपैकी बहुतांश काळ त्यांच्याकडे मंत्रिपद असे. त्यांनी यशवंतराव चव्हाणवसंतराव नाईकशंकरराव चव्हाण अशा नेत्यांसोबत काम केले. पैकी राज्याचे पहिजे नियोजन मंत्री’ म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळालीती विशेष. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक धरणे व शेतकर्‍यांच्याकष्टकर्‍यांच्या हिताच्या योजना ही महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. त्यांच्याच काळात कोल्हापूरचे दुधगंगा-वेदगंगासांगलीचे नांदोलीचांदोलीसातार्‍याचे धोमपुण्यातील चासकमानवर्ध्यातील अप्पर वर्धानांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी आदी धरणांची पायाभरणी झाली. त्यांतील काही धरणे त्यांच्याच काळात पूर्णही झाली. त्यावेळी कोणीच इतक्या धरणांचा विचार केलेला नव्हता. परंतु खताळ यांनी भविष्याची पावले अचूक ओळखली होती.

खताळ यांची कठोर शिस्त व नियमांचे काटेकोर पालन हे प्रसिद्ध होते. त्यांनी कोणाच्याही व्यक्तिगत कामासाठी शब्द टाकला नाही. ते म्हणतमी गावाचा किंवा जिल्ह्याचा मंत्री नव्हतोतर राज्याचा मंत्री होतोत्यामुळे माझी जबाबदारी संपूर्ण राज्याप्रती होती. मी गावाच्या नजरेतून राज्याकडे बघत नव्हतोतर राज्याच्या नजरेतून गावाकडे बघत असे. संपूर्ण राज्याला काही देताना नियमानुसार जे गावाच्या वाट्याला येईल तेवढेच गावाला मिळाले पाहिजे. अन्यथामी माझा गाव म्हणून गावाला एखादी गोष्ट जास्तीची दिलीयाचा अर्थ मी राज्यातील कोठल्या तरी दुसर्‍या गावावर अन्याय करून त्याच्या वाट्याचे माझ्या गावाला दिल्यासारखे होईल. त्यांच्या त्या शिस्तीच्या बडग्यामुळे अनेकदा कार्यकर्ते दुखावलेदेखील जात.J

त्यांनी 1980 ची निवडणूक जिंकल्यावर ‘ही माझी शेवटची निवडणूक’ असल्याची घोषणा केली व त्यानुसार 1985 मध्ये निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती स्वीकारली. त्यांनी निवृत्तीनंतर स्वतःला योगासने, विपश्यना, वाचन-चिंतन यांत गुंतवून घेऊन वयाच्या एकशेएकाव्या वर्षापर्यंत विविध विषयांवर लिखाण केले. त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत- अंतरीचे धावे, गुलामगिरी, धिंड लोकशाहीची, गांधीजी असते तर, लष्कराच्या विळख्यातील पाकिस्तान, माझे शिक्षक आणि सध्या राजकीय नेत्यांच्या पक्षांतराची जी लाट आली आहे त्यावर कठोर प्रहार करणारे ‘वाळ्याची शाळा’. त्यांनी वाळ्याची शाळा हे पुस्तक तर वयाच्या एकशेएकाव्या वर्षी लिहिले ! शतकाचे साक्षीदार असलेले बी.जे. खताळ हे 16 सप्टेंबर 2019 रोजी संगमनेर येथे निधन पावले. ते संगमनेर येथे त्यांचा मुलगा डॉ.राजेंद्र खताळ यांच्याकडे राहत होते.

राजेंद्र खताळ – drkhatal@live.com

– संतोष खेडलेकर 9822097809 skhedlekar15@yahoo.co.in

—————————————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

  1. भारताच्या कानाकोपऱ्यात धुरंधर नेते म्हणून बॅरिस्टर,घटना कमिटीचे सदस्य, मा मंत्री खताळ पाटील साहेबांची ख्याती होती! आदर्श नेता म्हणून ते महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखले जात!महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत साहेबांचे मोलाचे योगदान आहे!एकेकाळी राज्याचा मुख्यमंत्री ठरवण्याची ताकद खताळ पाटील साहेबांमध्ये होती! त्यासाठी साहेबांचा शब्द प्रमाण मानला जायचा! आज इतीहासाची पान उचकली तर लक्षात येईल की, राज्याचे पहिले अल्पसंख्याक मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांना मुख्यमंत्रीपद बहाल करण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खताळ पाटील साहेबांना आवर्जून विचारले होते! साहेबांकङून हिरवा कंदील मिळाल्यावर अंतुले साहेब मुख्यमंत्री झाले! एवढी ताकद साहेबांमध्ये होती!गांधीजींच्या चलेजाव चळवळीत साहेबांचा मोलाचा वाटा होता!महाराष्ट्रात व दिल्लीपर्यंत संगमनेरची ओळख साहेबांमुळे झाली! मा पंतप्रधान इंदिरा गांधी नेहमी म्हणत “संगमनेर खताळ साहेब का शहर” आम्हाला साहेबांचा सार्थ अभिमान आहे की आम्ही साहेबांच्या संगमनेरात जन्माला आलो व साहेबांना जवळून बघण्याचे सौभाग्य मिळाले हे मी माझे भाग्य समजतो!

  2. राजकारणातील आदर्श बी.जे.खताळ साहेब! त्यांना आणि त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version