मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरच्या आवारात लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्या गर्दीला कारणही तसे होते. थिएटरचे मालक अबुशेठ यांनी तमाशा रसिकांसाठी एक आगळावेगळा प्रयोग केला होता. थिएटरच्या आवारात एका छान सजवलेल्या राहुटीत पठ्ठे बापुराव आणि पवळाला नटूनथटून बसवले आणि त्यांना बघण्यासाठी तिकिट ठेवले ! मुंबईतील प्रेक्षकांना त्या जोडीबद्दल मोठी उत्सुकता होती. त्यामुळे लोकांनी रांगा लावून तिकिटे काढली. त्यांनी राहुटीत प्रवेश केला, की त्या दोघांना डोळे भरून बघायचे आणि दोन्ही हात जोडून नमस्कार म्हणायचे. बापुराव आणि पवळा यांनी हलकेसे स्मित जरी केले तरी बघणाऱ्याला धन्य वाटे. कलाक्षेत्राच्या इतिहासात केवळ कलाकाराला बघण्यासाठी तिकिट लावण्याचा प्रयोग एकदाच झाला, आधुनिक तमाशासृष्टीचे जनक बापुराव आणि तमाशासृष्टीतील पहिली स्त्री कलाकार पवळाबाई यांना ते भाग्य लाभले...
संगमनेरच्या नगरपालिकेने कामकाज 1860 मध्ये सुरू केले आणि सार्वजनिक सोयीसुविधांच्या बाबतीत एकेक प्रगती सुरू झाली. गाव अगदी छोटे असल्याने गावात आठ महत्त्वाच्या सार्वजनिक जागा निश्चित करून, तेथे लाकडी खांब 1860 साली रोवले गेले. त्या खांबांवर आठ कंदील लावण्यात आले. रोज संध्याकाळी अंधार पडण्याच्या वेळी नगरपालिकेचा एक कर्मचारी येऊन, त्या कंदिलाची काच पुसून तेलपाणी करी आणि कंदील पेटवून जात असे. लोकांना त्या गोष्टीचे मोठे अप्रूप वाटे...
बोधेगावातील ‘बानुबाई’ नामक आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत अशी एक मुस्लिम स्त्री म्हणजेच बन्नोमाँ. त्या शिर्डीचे साईबाबा यांच्या समकालीन असून आध्यात्मिक व योगशक्तीच्या धनी होत्या. बन्नोमाँ देवी बोधेगावचे ग्रामदैवत आहे...
महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला आणि त्यात पराकोटीचा प्रामाणिकपणा, कठोर शिस्त आणि तत्त्वनिष्ठा हे निकष लावून काही लोकांची नावे नोंद करावी असे म्हटले तर ती यादी बी.जे. खताळ या नावापासून सुरू होण्यास हवी. त्यांनी राज्याच्या विविध मंत्रिपदांवर बहुतांश काळ काम केले. त्यांनी निवृत्तीनंतर स्वतःला योगासने, विपश्यना, वाचन-चिंतन यांत गुंतवून घेऊन वयाच्या एकशेएकाव्या वर्षापर्यंत विविध विषयांवर लिखाण केले...
रघुनाथ ढोले यांची झाडांशी घट्ट नाळ जुळलेली आहे. झाडांशी हितगुज करणाऱ्या या मितभाषी माणसाने मानवनिर्मित देवराया निर्माण करण्याचा ध्यास घेतला. आतापर्यंत त्यांनी पंच्याण्णव देवराया आणि बत्तीस घनदाट वने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यांत निर्माण केली आहेत...
नगरी बोली ही ठळकपणे उठून दिसणारी नाही; पण तिच्यात स्वतःचे असे वेगळेपण आहे. अहिराणी, वऱ्हाडी, तावडी, कोकणी, कोल्हापुरीया मराठीच्या बोलींना जसे स्थान लाभले तसे नगरी बोलीला मिळालेले नाही. पण ‘काय करू राह्यला?’,