45 POSTS
डॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्या त्यांच्या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्यांच्याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्वतः लेखक आहेत. त्यांनी 'ओळख पक्षीशास्त्रा'ची हे पुस्तक लिहिले आहे. त्यांना झाडे लावण्याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्या 'कुहू' या पहिल्या मल्टिमिडीया पुस्तकामध्ये आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9822390810
अस्वलाला मराठीत भालू, रीस, नडघ, भल्ल, रिछ, तिसळ अशी नावे आहेत. संस्कृतमध्ये ऋक्ष म्हणजे अस्वल. त्याशिवाय अस्वल चालताना मागे वळून पाहते, म्हणून पृष्ठदृष्टिक; चिडले, की भयंकर ओरडते म्हणून दुर्घोष; तर त्याचे केस लांब व दाट असतात म्हणून दीर्घकेश अशीही नावे आहेत...