काळ सरतो, माणसे अंतरतात. पण, त्यांच्या आठवणी मात्र अजरामर राहतात. दादा कोंडके यांच्यासारख्या कसलेल्या, हजरजबाबी कलाकाराने घेतलेली फिरकी, केलेल्या कोट्या आयुष्यभराची पुंजी होऊन जातात.
निजाम-उल्मुल्क याचा फिदबी खान नावाचा दिवाण होता. तो इनाम, वतने, सरंजाम, जहागिरी इत्यादी प्रकरणांत सारख्या शिफारसी करत असे. त्यामुळे त्याला चांगलीच प्राप्ती होत असे. त्यावेळी फिदबी खानाने सणसणीत बाणेदार उत्तर दिले...
रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील महालक्ष्मी मंदिराची जी इमारत आहे, तिच्यावर दाक्षिणात्य आणि मोगलकालीन कलेचा ठसा आढळतो. तेथील ध्वनीवर्धन, उगवतीच्या व मावळतीच्या सूर्यकिरणांचा देवीच्या चरणांना होणारा स्पर्श, झरी, पोळी या आगळ्यावेगळ्या गोष्टी मंदिराचे सौंदर्य वाढवतात...
पंडित शंकर अभ्यंकर हे साताऱ्याचे. त्यांचा जन्म झाला तेव्हा वडिलांनी गडू आणि पळी वाजवली. तो जन्मनाद ही शंकरराव यांच्या पुढील ‘संगीत आयुष्या’ची नांदी ठरली ! त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ," गुरुकृपेने संगीतात एवढे शिकलो की त्यावेळी मनात सुरू झालेली आनंदाची मैफल सुरूच आहे. या मैफलीला भैरवी नाही...”
समाजातील छोट्यात छोट्या समुदायाची संस्कृतीसुद्धा महत्त्वाची असते. आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणाऱ्या मध्यमवर्गाने ती संस्कृती त्याच्या पदराला खार लावून घेऊन टिकवण्याची गरज आहे. तो काही स्वार्थत्याग नाही; ती असते सुसंस्कृत होण्यासाठी त्या मध्यमवर्गानेच केलेली गुंतवणूक...
ज्या लोकांना जातीनिहाय आरक्षण नको आहे, त्यांना त्यांची जात ‘माणूस’ अशी लिहिता आली पाहिजे. ज्यांना हिंदू धर्म ठेवायचा आहे, पण जातिभेद पाळायचा नाही, त्यांना आवश्यक असेल तेथे धर्म ‘हिंदू’ आणि जात ‘माणूस’ अशी नोंद करता आली पाहिजे. जातिभेद नाहीसे किंवा निदान कमी करण्यासाठी ते महत्त्वाचे पाऊल असेल…
स्वत:च्या क्षुद्र ज्ञानाचा व कार्याचा संबंध दुसऱ्या थोर व्यक्तीशी वा कार्याशी जोडणे. तसेच, प्रत्यक्षात काहीही- कसलेही नाते नसताना, ओढूनताणून जवळीक साधण्यासाठी नसती नाती जोडण्याचा यत्न म्हणजे बादरायण संबंध !
ज्या आईने मातृभाषा शिकवली तीच भाषा जर मुलगा विसरून गेला, तर मुलाचा परिवार, समाज, विद्या व देश यांच्याशी संबंध तुटतो. मातृभाषा विसरणे यासारखा दुसरा मोठा कोणताही शाप नाही !
सीमावादाचे मूळ आहे मॅकमोहन रेषा. चीनने ती कधीही मान्य केलेली नाही. ब्रिटिशांनी निर्माण केलेला तो वाद मिटवण्यासाठी देवघेव करावी लागेल, त्याशिवाय तो कधीही मिटणार नाही...
सय्यदभाई यांनी मुस्लीम समाजातील पुरुषसत्ताक ‘तिहेरी तलाक’विरुद्धचा लढा 1990 च्या दशकात आणि एकविसाव्या शतकातही चालूच ठेवला. त्यांनी तिहेरी तलाकमुळे मुलांसह घरी परत आलेली बहीण खतिजा हिचा जगण्यासाठीचा संघर्ष जवळून पाहिला होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी मुस्लिम समाजातील धार्मिक कर्मठपणाविरुद्ध लढा दिला. मुस्लिम समाजाचे प्रबोधन हे त्यांनी आयुष्याचे ध्येय मानले होते...