13 POSTS
प्रल्हाद कुलकर्णी हे इंग्रजीचे प्राध्यापक. ते कोल्हापूरच्या विवेकानंद संस्थेच्या कॉलेजमधून निवृत्त झाले. त्यांनी इंग्रजी लेखक विल्यम गोल्डिंग यांच्या कादंबऱ्या या विषयावर पीएच डी पदवी संपादली. त्यांची मराठीत आठ व इंग्रजीत चार पुस्तके प्रसिद्ध आहेत. निवृत्तीनंतर, त्यांचा भटकंती आणि तत्संबंधी लेखन हा छंद बनला आहे. त्यांनी भारतविद्या, मोडीलिपी व पर्शियन भाषा या विषयांचाही अभ्यास केला आहे. त्यांनी ‘साहित्याचे पश्चिम रंग’ हे सदर ‘तरुण भारत’मध्ये पाच वर्षे लिहिले होते.