Home लेणी
लेणी
मनमाड आणि गुप्तसर साहिब गुरुद्वारा
महाराष्ट्रातील नांदेड खालोखाल मनमाडमधील गुरुद्वाराला अखिल शीख समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे स्थान आहे. ते गुरुद्वाराला प्रेरणा आणि प्रार्थना स्थळ म्हणून फार मानतात. गुरु गोविंद सिंह नांदेड येथे का आले असावेत याबाबत दोन मतप्रवाह आढळून येतात. एक म्हणजे, महाराष्ट्रातील संत नामदेव यांचे पंजाबमधील महत्कार्य आणि त्यांना तेथे, पंजाब प्रांतात मिळालेला ‘संत शिरोमणी’ असा दर्जा. यांमुळे गुरू गोविंद सिंह संत नामदेवांच्या मूळ स्थानी, नांदेडमध्ये आध्यात्मिक किंवा धार्मिक कारणामुळे आले असावेत असे मानले जाते...
कोल्हापूर-गगनबावड्याचे मोरजाई पठार !
मोरजाई परिसरातील भटकंती म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा, पर्वतांचा, संस्कृतीचा, पाण्याचा, अरण्यांचा, स्थापत्यांचा अस्सल अनुभव ! तो अनुभव इतिहासातही जिवंत असण्याचा भाव निर्माण करू शकतो. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर आसळज गावापासून तीन-चार किलोमीटर डावीकडील बाजूस सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक ओढा आहे. मुख्य रस्ता सोडून थोडे आत... गर्द वनराई, निवळशंख पाणी आणि त्यासोबत काही हिनयान पंथीय छोटी, पण टुमदार लेणी असे ते विलक्षण नैसर्गिक पण माणसाचा यथायोग्य हस्तक्षेप झालेले ठिकाण आहे...
वॉल्टर स्पिंक यांना भारताने दुर्लक्षले (Walter Spink was ignored by India)
वॉल्टर स्पिंक हे अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील कलाइतिहासाचे प्राध्यापक. त्यांनी अजिंठा लेण्यांच्या संशोधनाचा ध्यास घेतला होता. त्यासाठी ते जवळ जवळ पन्नास वर्षे, दरवर्षी दोनदा याप्रमाणे भारतात येत असत.
अजिंठ्यात दडलेले ऐतिहासिक रहस्य – डॉ. वॉल्टर स्पिंक (Walter Spink rewrote history of art...
अजिंठा लेण्यांची सर्वाधिक ख्याती तेथील गुहांमधील रंगीत भित्तिचित्रांसाठी आहे. त्या लेणीसमूहात तीसपैकी फक्त पाच लेणी पूर्णपणे चित्रांकित आहेत. तीन लेण्यांमधील रंगचित्रे अर्धवट राहिलेली आहेत...
आगाशिव लेणी (Aagashiv Cave)
कराड शहराच्या नैर्ऋत्येस तेरा किलोमीटर अंतरावर आगाशिव नावाचा डोंगर आहे. त्या डोंगरात चौसष्ट लेणी खोदलेली आहेत. त्या डोंगरावर आगाशिव नावाचे शिवालय आहे. त्यावरूनच लेण्यांना आगाशिव लेणी असे म्हणतात. ती लेणी इसवी सनपूर्व 250 ते...
महाराष्ट्र दगडांचा नव्हे, समृद्ध वारशाचा देश – डॉ. दाऊद दळवी
“महाराष्ट्र हा भारतातील समृद्ध प्रदेश होता. तो ‘दगडांच्या देशा म्हणावा’ असा कधीही दरिद्री नव्हता आणि सुदैवाने आजही नाही. म्हणूनच या प्रदेशाला फार मोठा सांस्कृतिक परंपरा लाभली.” अशा शब्दांत इतिहास संशोधक डॉ. दाऊद दळवी यांनी...